वादळ
आज मला खूप मोकळं मोकळं वाटत होतं. गेल्या कित्येक दिवसांपासून मनाची सुरु असलेली घालमेल संपली होती एकदाची !!
गेले काही महिने जे आम्ही वेगळे राहत होतो त्याचं फलित आज एका कागदावर काळ्या अक्षरात माझ्याकडे आलं होतं. मला खरच हे हवं होतं का ? त्याने एकदा तरी मला विचारायला हवं होतं. पण तो त्याचा स्वभावच नव्हता. माझ्याही अंगवळणी पडलं होतं सगळं.
मला नक्कीच नको होतं, हे असं अर्ध्यात डाव मोडून जाणं. पण डावच तो !! एकटी मी तरी कसा मांडू शकणार होते ? अन्यथा आत्ताच्या, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, मी त्याची वाट पहात राहिले नसते. त्याला माझ्या आयुष्यात होणाऱ्या सगळ्या घडामोडी सांगितल्या नसत्या.
त्याच्या दृष्टीने हे सगळं संपलं होतं. आणि मी ?? माझं मन अजूनही हे सगळं संपवायला का तयार होत नव्हतं ?? दैव पण कसं असतं, सगळ्या गोष्टी आयुष्यात सुरळीत चालू आहेत असं वाटत असताना अचानक नवीन वादळ निर्माण होतं, त्याची धूळ अजून खाली बसत नाही तोपर्यंत आणखी काहीतरी ..
8 दिवसांपूर्वी मी, माझ्या आईसोबत पाहिलेले माझ्या उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण केले. त्याच्या पदवी ग्रहण समारंभाला सामोरे जाण्यापूर्वी सुद्धा, मी इंद्रंना माझ्या मोबाईल वरून मेसेज पाठवला होता, माझ्या आयुष्यातला एक महत्वाचा क्षण, त्यांच्यासाठी किमान आनंदाचा असेल असे वाटून. त्यांनी जरी माझ्याशी नाते तोडले असले तरी मला त्यांच्याशी जुडलेली किंबहुना जोडलेली नाळ तोडायची नव्हती. मी कितीदाही माझ्या मनाला समजावले तरी, यशस्वी होत नव्हते. मी खूपच जास्त गुंतले होते कि गुरफटले होते त्यांच्यात !!
स्वतःच्या मनाला सतत "रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा" या ओळी सांगत होते. पण मनच ते, सत्याला मानायला तयारच होत नव्हते.
आज मला खरच खूप मोठ्याने रडावे वाटत होते. घटस्फोटाचे कागद हातात घेऊन मी पूर्णतः रिती झाले होते. आधाराची खूप जास्त गरज भासत होती. या अत्यंत अवघड क्षणाला सामोरे जाताना, माझ्या सोबतीला माझं असं कुणीच नव्हतं. इतकी का मी एकटी पडले होते ? एवढ्या मोठ्या जगात कुणालाच कसा वेळ नव्हता मला क्षणभर आधार द्यायला ??
याद्या
2392
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
हा अनुभव नसावा अशी इच्छा
मुक्तक असेल तर उत्तम
खुप वाइत वात्ले
कितिहि वाइत वात्ले तरि शेव्ति
In reply to खुप वाइत वात्ले by मीनाक्षी देवरुखकर
ख्खिक ,
In reply to कितिहि वाइत वात्ले तरि शेव्ति by अन्या दातार
अर्ध्यावरती
सत्य घटनेवर आधारित