Skip to main content

काकाच्या सासर्‍याला आजोबा म्हणावे का?

लेखक हुप्प्या यांनी बुधवार, 23/11/2011 01:18 या दिवशी प्रकाशित केले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10831210.cms सध्या महाराष्ट्राच्या दोन राजघराण्याच्या पुतण्यांमधे शाळकरी पोरांना शोभेशी भांडणे चालू आहेत. अदापः ह्यांना शेतीतले काय कळते? कधी नांगर तरी पाहिलाय का? राठा: ह्यांना क्रिकेटमधले काय कळते? ह्यांचे बापजादे क्रिकेट खेळायचे का? अदापः होयच मुळी! माझे आजोबा भारताच्या टीममधे होते? राठा: साहेबांचे सासरे तुमचे आजोबा कसे? उद्या तुम्ही दारासिंगला आजोबा म्हणाल. अदापांचे उत्तर वाचायला उद्याचा मटा नक्की वाचा. जनतेचे कल्याण व्हावे ह्या उदात्त विचारानेच हे कलगीतुरे झडत आहेत ह्याविषयी मला शंका नाही. पण ह्या निमित्ताने एक नवा काथ्या कुटू या की काकाच्या सासर्‍याला काय म्हणावे ? आजोबा, मामा, काका की अजून काही? मीही माझ्या तमाम काकांच्या सासर्‍यांची चौकशी सुरू करतो!

वाचने 3340
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

आजोबा म्हणायला काही हरकत नसावी .. :) तसही साधारण कुठल्याही मध्यमवयीन व्यक्तींना काका, मामा, काकु, मावशी आणि वयस्क व्यक्तींना आजी किंवा आजोबा म्हणतातच ना..

@ मनीषा हाच निकष 'सगळीकडे' लावण्यास आमचे काही मित्र आतुर आहेत.... शिक्कामोर्तब करायचं का? ;) - 'तुझं ते माझं, माझं ते तर माझंच' प्रेमी प्यारे

गंभीर संवाद. दोघेही नेते महाराष्ट्रातील जनतेचे कल्याण करण्यास उत्सुक असल्याने ह्या प्रश्नावर मिपावर सखोल चर्चा अपेक्षित. माझ्यामते काकाच्या सासर्‍याला कासोबा म्हणावे.

अहो त्यात काय एवढं...? राजकारणात गरजेनुसार कोणालाही काहीही म्हणता येतं... एरवी नात्यातले असले काय नी नसले काय? ते म्हणतात नै का.... ना-त्यातले.. ना-ह्यातले...ते सगळे राजकारणातले. ;-)

टगे म्हणतात ते खरे माना.. नाहितर दंडुके खावयास तयार व्हा...

काकांच्या सासर्‍याला तुम्ही काय म्हणता ? आजोबाच ना काही लोक मावशीच्या मिस्टरांना सुद्धा काका म्हणतात अहो मग ते तुमचे काका नव्हेत असे म्हणायचे का

जनतेला मामा बनवला जात आहे !