✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

'एका दिशेचा शोध' - पुस्तक परिचय

त
तिमा यांनी
Sun, 11/20/2011 - 14:23  ·  लेख
लेख
'एका दिशेचा शोध' हे संदीप वासलेकर यांनी लिहिलेले नवीन पुस्तक आहे. लेखक हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे एक विचारवंत आहेत. मुंबईत त्यांची ' स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुप' नांवाची आंतरराष्ट्रीय संस्था आहे. जगातील अनेक राष्ट्रप्रमुखांशी त्यांचा सतत संवाद असतो. डोंबिवलीच्या एका छोट्या शाळेपासून सुरु झालेला त्यांचा जीवनप्रवास हा थक्क करणारा आहे. या पुस्तकात भारताच्या उज्वल भविष्यासाठी अनेक मुद्यांवर सांगोपांग चर्चा केलेली आहे. या जगातील आपल्या देशासारखी वा त्याहूनही वाईट स्थिती असलेल्या देशांनी, त्यातून बाहेर पडून आपली सर्वांगीण प्रगति कशी करुन घेतली याविषयीची माहिती अत्यंत उदबोधक आहे. पुस्तकात अनेक प्रकरणे आहेत . त्यातील विशेष उल्लेखनीय, सिंहासन, आंधळी कोशिंबीर, हिमालयाला जेंव्हा ताप येतो, ही वाटतात. आपला देश सुधारणे हे केवळ राज्यकर्त्यांचे काम नसून त्याची सुरवात आपल्या स्वतः पासून केली पाहिजे हे मुख्य सार आहे. ज्या देशातल्या सिंहासनावर लोकांचा अंकुश असतो, ज्या सिंहासनाला पायर्‍या असतात, किंबहुना ज्या देशातली सिंहासने छोटी असतात ते देश मोठे होतात, ही वाक्ये लक्षांत रहाण्यासारखी आहेत. दहशतवादावरही लेखकाने आपली मते व अनुभव विस्तृतपणे मांडले आहेत. दहशतवादाचा मुकाबला हा बळाने कदापि यशस्वी होणार नाही तर त्यासाठी वाट चुकलेल्या या युवकांशी संवादानेच यावर मात करता येते हे अनेक उदाहरणांवरुन लेखकाने पटवून दिले आहे. आपल्या देशातली शिक्षणपद्धती, शेतकर्‍यांच्या समस्या यावरही लेखकाकडे ठोस उपाय आहेत. आश्चर्य याचेच वाटते की अनेक देशांचे राज्यकर्ते वासलेकरांना चर्चेला बोलावतात तर भारतात असूनही आपले सरकार त्यांचा उपयोग का करुन घेत नाही ? पुस्तक एकदा जरुर वाचावे असेच आहे. एका दिशेचा शोध लेखकः संदीप वासलेकर राजहंस प्रकाशन किंमत : रू.२५०/-
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
माध्यमवेध
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
3739 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

छान पुस्तक परिचय...

दादा कोंडके
Sun, 11/20/2011 - 14:50 नवीन
धन्यवाद ति.मा.
  • Log in or register to post comments

इंटरेस्टींग आहे.

आत्मशून्य
Sun, 11/20/2011 - 15:43 नवीन
अनेक देशांचे राज्यकर्ते वासलेकरांना चर्चेला बोलावतात
थोडा अजून प्रकाश टाकता येइल काय ?
  • Log in or register to post comments

प्रकाश

तिमा
Sun, 11/20/2011 - 16:12 नवीन
'स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुप' ही वेबसाईट बघावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

आपल्याकडील हिरे आपल्यालालाच

डॉ.श्रीराम दिवटे
Sun, 11/20/2011 - 19:34 नवीन
आपल्याकडील हिरे आपल्यालालाच गवसत नसतात ही तर खरी आपल्या राज्यकर्त्यांची शोकांतिका आहे. पुस्तक परिचय आवडला.
  • Log in or register to post comments

एका दिशेचा शोध

काव्यवेडी
Sun, 11/20/2011 - 20:57 नवीन
हे पुस्तक मी पण वाचले आहे. सर्वानी जरुर वाचावे असेच आहे.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा