ऊर्ध्वरेता
ऊर्ध्वरेता
एकदा श्रीकृष्णाला भेटावयाला दुर्वास ऋषी आपल्या शिष्यगणासकट आले. यमुनेच्या पलिकडे वनांत त्यांनी मुक्काम ठोकला. श्रीकृष्णाची शिवाचे अंश असलेल्या दुर्वास ऋषींवर अनन्य भक्ती होती. तेव्हा दुर्वासांच्या भोजनाकरिता श्रीकृष्णाच्या सर्व स्त्रीया भोजना़ची ताटे घेऊन निघाल्या. नदीपाशी येतात तो त्यांनी पाहिले की यमुना दुथडी भरून वहात आहे. आता काय करावयाचे? पलीकडे कसे जावयाचे ? त्या परत कृष्णाकडे आल्या व त्यांनी आपली अडचण त्याला सांगितली. तो म्हणाला " जा, यमुनेला सांगा की श्रीकृष्ण ब्रह्मचारी असेल तर आम्हाला वाट दे ". स्त्रीया नदीपाशी आल्या व त्यांनी श्रीकृष्णाचा निरोप सांगितला. आणि काय आश्चर्य, यमुना दुभंग झाली व त्यांना पलीकडे जाण्यास वाट मिळाली. त्या सर्व जणींनी दुर्वासांसकट सर्वांना पोटभर, नव्हे, जरा जास्तच भोजन दिले.मग त्या परत निघाल्या. नदीपाशी येतात तो यमुना परत पहिल्यासारखी तुडुंब भरून वाहते आहे. त्या घुटमळलेल्या पाहून दुर्वासांनी विचारले " काय झाले ? " त्यांनी त्यांची अडचण सांगितली. मग दुर्वासांनी विचारले " तुम्ही आलात कशा ? " त्यांनी कृष्णाने यमुनेला दिलेला निरोप सांगितल्यावर दुर्वास म्हणाले " जा, यमुनेला सांगा, दुर्वासांनी आज उपास केला असेल तर तू आम्हाला वाट दे ." यमुनेला तो निरोप मिळाल्यावर ती परत दुभंग झाली व स्त्रीया राजधानीत परतल्या.
आता शंकराचा अंश असलेले दुर्वास श्रीकृष्णांच्या स्त्रीयांनी आणलेले अन्न खावून "उपाशी" राहिले हे थोडेफार कळू शकते. पण सोळा हजार एकशे आठ स्त्रीयांचा नवरा "ब्रह्मचारी"? हे कसे काय बुवा ? याला उत्तर असे की योगेश्वर श्रीकृष्ण "ऊर्ध्वरेता " होता. असा पुरुष कितीही स्त्रीयांशी संबंध ठेवून ब्रह्मचारीच रहाणार. (श्रीकृष्णाला सांब वगैरे मुले कशी हे मला विचारू नका. मी आपला तुम्हाला गोष्ट सांगणारा कथेकरी. बर्याच जणांना अशा सुरस गोष्टी माहीत नसतात म्हणून सांगतो बापडा !) तर सांगावयाचा मुद्दा हे " ऊर्ध्वरेता" प्रकरण योगासारख्या "तांत्रिक" पंथात भाव खाऊन होते.
मानवाच्या आदि काळापासून हे तंत्र प्रकरण जगभर लोकप्रिय आहे. जा गोष्टी आपणाला कळत नाहीत त्यांबद्दल विचारपूर्वक निर्णय घेणे सर्वसामान्य माणसाला जमत नाही. त्याच्यावर तंत्रमंत्रासारख्या अनाकलनीय गोष्टींचा पगडा लवकर बसतो. उपनिषदांतील तर्कज्ञानापेक्षा तो
ओम र्हिं क्लिं म्हणणार्या मांत्रिकाच्या पगड्याखाली लवकर जातो. भारतात वेदकाळापासून हे चालू आहे. अथर्व वेद हे त्याचेच उदाहरण म्हणावयास हरकत नाही. बौद्ध व जैन धर्मही त्याच्या तावडीतून सुटले नाहीत. ज्ञानदेवकाळी बौद्ध, कौल, शाक्त, शैव,नाथ,असे अनेक पंथ या
तांत्रिकांच्या जाळ्यामध्ये सापडलेले होते. गोरखनाथ हे "ऊर्ध्वरेता" म्हणून प्रसिद्ध होते. लुईपा या तांत्रिक सिद्धाने आपल्या सिद्धीच्या प्रभावाने एका राजाला व त्याच्या प्रधानाला आपले शिष्य बनवले व वेश्येचा उपभोग घेण्यासाठी मोबदला म्हणून राजाला तिच्याकडे बारा वर्षे गहाण टाकले व प्रधानाला मद्यप्राशनाचा मोबदला म्हणून कलालाकडे ! आणि असा हा लुईपा महासिध्द ! आज गोष्ट सांगावयाची आहे ती "नाथपंथाची."
जालंदर नाथांचा शिष्य कान्हपाद हा असाच एक सिध्द व ऊर्ध्वरेता म्हणून प्रसिध्द. आपल्या सातशे शिष्यांना घेऊन ही स्वारी हिंडत असे.
त्यात आपले सिध्दीचमत्कार दाखवण्याची हौसही मोठी. एकदा कान्हपाद एका योगिनीच्या बागेत उतरला. तिथल्या नारळाच्या झाडांवरचे नारळ आपल्या दृष्टीपाताने शिष्यांच्या हाती दिले. योगिनीला घुस्सा आला. तिने आपल्या सिध्दीने ते हातातले नारळ परत झाडांवर चढवले. या चमत्कारांच्या मारामारीत शेवटी तिने कान्हपादाला "रतियुध्दाचे" आव्हान दिले. त्यात आपला पराभव होतो आहे असे पाहिल्यावर तिने आपल्या गुरूयोगिनीचा सल्ला विचारला. व तिच्या सांगण्याप्रमाणे इंद्रियभागी हिरकणी ठेवली. मग या ऊर्ध्वरेतनाच्या प्रक्रियेत कान्हपाद ठार झाला इति अलम.
शरद
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वर
अर्थ..
यक्क...
खुलासा
राग...
हो.
घुस्सा
शरद साहेब
नाथपंथ
शरद साहेब
अहो कथेकरी बुवा, एव्हढी कथा
गुरूचरित्र
गुरुचरीत्र
लायकी?
गौतम बूध्दाचे उदाहरण वीवीध चर्चेत मीच या आधी बरेचदा दिले आहे
अजून एक महत्वाच.
असल्या भोंगळ ज्ञाना वर
बला टली !!
:)
जो जे वांछिल तो ते लाभो! मे
अहो शरदकाका, इथे सगळे अधोरेते
उर्ध्वरेतामागचे शास्त्र आधी
माहिती बद्दल धन्यवाद!
शरदबोवा आपल्या कथा आवडल्या.
+१
@JAGOMOHANPYARE तसं आपण बरोबर बोललात.
अननरंग?? अनंगरंग रतीशास्त्र
ऊर्ध्वरेता व्हायला नाही जमलं
अनगरंग
जामोप्या यांनी म्हटल्यासारखेच
काही लोकांना नाही.
कायदा
वाईट वाटले.
हाहाहा!
मारुती सुद्धा ऊर्ध्वरेता
मारुती
ओ मास्तर!
निळ्या ?
पर्स्पेक्टीव्ह
ओक्के सायर
@ परा अरे मागे एका प्रतिसादात
शरदकाका गोश्ट आवड्ली
नसबंदी केली असली तर काय
त्याला
नसबंदी करतात म्हणजे ज्या
:)
छळ आहे
गोष्ट-माहिती रंजक आहे