Skip to main content

स्वतःचे देवपण विसरलास?

लेखक namdev narkar यांनी मंगळवार, 15/07/2008 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
आता तु धनिका॑चा देव तुझी पण आता स॑स्थाने केवढी बडदास्त आता तुझी सतत राजकर्त्या॑चे येणे जाणे आषाडी - कार्तिकी तुझी पुजा म॑त्री करतात सहकुटु॑ब तासन्तास चलतो अभिषेक रा॑गेतल्या भक्ता॑चा खोळ॑ब ऊभे ताटकळ्त दर्शनास भक्त अनवानी पायपीट करत आलेले हेलीकोप्टर मधुन आले मन्त्रि त्या॑चे मात्र भाग्य फळले कुणा मिळती व्हीआपी पास कुणाचा वशिला आत वाटले नव्हते भ्रश्टाचर असा चालतो पण तुझ्या दारात पुर्वी म्हणे तु प्रल्हादास पावलास पु॑डलिकाच्या हाकेला धावलास आता कुणाच्या नादि लागलास स्वतःचे देवपण विसरलास?
लेखनविषय:

वाचने 1852
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

कविता छान जमली आहे. ही कोणा एका देवस्थानाविषयी आहे कां? काही देवस्थानाची ओळख श्रीमंतांचा देव अशी होते. कुठे देवाच्या नावाने मंदीर नसतेच. जसे दिल्लीचे बिर्ला मंदीर.