साहित्यः
१ मध्यम आकारचे बीट साल काढून
१ मध्यम आकाराचा टोमॅटो
१ छोटा बटाटा साल काढून
कोथींबीरीच्या कोवळ्या काड्या (तुम्ही सेलरी ही वापरु शकता)
१ छोटा कांदा बारीक चिरून
३-४ लवंगा
२-३ दालचिनीचे तुकडे
२-३ तमालपत्र
१ टीस्पून काळीमिरीपूड
मीठ चवीनुसार
थोडीशी चिरलेली कोथींबीर
२ टीस्पून तुप
पा़कृ:
बीट, टोमॅटो, बटाटा व कोथींबीरीच्या काड्या उकडून घेणे. गार झाल्यावर त्याची मिक्सरमधून प्युरे करून घेणे.
एका भांड्यात तुप गरम करुन त्यात लवंगा, दालचिनी व तमालपत्र घालणे.मग त्यात चिरलेला कांदा घालून परतणे.
कांदा मऊसर शिजला की त्यात बीटची प्युरे घालणे. लागेल तसे पाणी घालणे.
उकळी आली की त्यात चवीनुसार मीठ व काळीमिरीपूड घालणे. थोडेशी कोथींबीर ही शिजताना घालणे म्ह्णजे स्वाद छान येतो.
कोथींबीर घालून गरमा-गरम बीट सुप ब्रेड स्टीक बरोबर सर्व्ह करणे.
नोटः आवडत असल्यास वरुन थोडे फ्रेश क्रिम घालणे.
उकळी आल्यावर त्यातील लवंगा, दालचिनी व तमालपत्र काढून ही सुप सर्व्ह करु शकता.
वाचने
7792
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
भन्नाट दिसत आहे.
वाह... मस्तच ! (स्वीट कॉर्न
काय मस्त रंग आलाय !
वा मस्तच गं... तस मला बीट
थंडीसाठी योग्य पेयकृतीबद्दल
एका मैत्रिणीनं बिटाचे रसम्
In reply to थंडीसाठी योग्य पेयकृतीबद्दल by रेवती
सुंदर..
लप लप लप.
आहाहा.........!!!
शेवटच्या फोटोचं कलर
बघते करुन घरी!! मस्तच
बीट आवडत नव्हते.