Skip to main content

बीटाचे सुप

लेखक सानिकास्वप्निल यांनी शुक्रवार, 18/11/2011 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १ मध्यम आकारचे बीट साल काढून १ मध्यम आकाराचा टोमॅटो १ छोटा बटाटा साल काढून कोथींबीरीच्या कोवळ्या काड्या (तुम्ही सेलरी ही वापरु शकता) १ छोटा कांदा बारीक चिरून ३-४ लवंगा २-३ दालचिनीचे तुकडे २-३ तमालपत्र १ टीस्पून काळीमिरीपूड मीठ चवीनुसार थोडीशी चिरलेली कोथींबीर २ टीस्पून तुप . पा़कृ: बीट, टोमॅटो, बटाटा व कोथींबीरीच्या काड्या उकडून घेणे. गार झाल्यावर त्याची मिक्सरमधून प्युरे करून घेणे. एका भांड्यात तुप गरम करुन त्यात लवंगा, दालचिनी व तमालपत्र घालणे.मग त्यात चिरलेला कांदा घालून परतणे. . कांदा मऊसर शिजला की त्यात बीटची प्युरे घालणे. लागेल तसे पाणी घालणे. . उकळी आली की त्यात चवीनुसार मीठ व काळीमिरीपूड घालणे. थोडेशी कोथींबीर ही शिजताना घालणे म्ह्णजे स्वाद छान येतो. . कोथींबीर घालून गरमा-गरम बीट सुप ब्रेड स्टीक बरोबर सर्व्ह करणे. . नोटः आवडत असल्यास वरुन थोडे फ्रेश क्रिम घालणे. उकळी आल्यावर त्यातील लवंगा, दालचिनी व तमालपत्र काढून ही सुप सर्व्ह करु शकता.

वाचने 7792
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

सुपला उकळी येई पर्यंत कोण थांबणार? त्या आधीच सर्व्ह करुन घेणार :-)

वा मस्तच गं... तस मला बीट आवडत नाही. पण सुप बघुन ट्राय करावस वाटतय. बघु, एकदा करुन बघेन. :)

In reply to by रेवती

एका मैत्रिणीनं बिटाचे रसम् नुकतेच शिकवले आहे त्याची आठवण झाली. ------------------------------------------- येउदेत रसम..ची कॄती... ---------------------- बिटाचे सूप भन्नाट ह ..

ही काहीतरी जडीबूटीची आयूर्वेदीक भानगड वाटत आहे., या सूपाने उर्जा वाढणार हे नक्कि.

काय पण हि हेल्दी रेसीपी........ आणि फोटो पण सु....रे...ख. विशेषतः सुप कलरफुल आणि बाकी समद.... black n white

शेवटच्या फोटोचं कलर काम्बिनेशन जबराच, पहिला आणि शेवटुन दुसरा कलर थोडा डार्क वाटतोय. आणि पाकृ बद्दल काय बोलणार, आईनं आणि बायकोनं बिट बिट बिटलंय तरी बिट दाताखाली बिट करुन घशातुन पोटात घालायचं च्यालेंज मी अजुन बिट करु शकलो नाही., त्यामुळं पास. अवांतर - अगदी जपुन ठेवलंय ओ तुपाचं भांडं, तुळशीबागेत किती हट्ट करुन घेतलं होतं मागच्या वेळी.

न आवडनार्‍या बीटची खुप चांगली रेसिपी दिलीस. पया॓ग करायला हरकत नही. महत्वाचे हे खुप पा॓ष्टीक आहे.