कौन बनेगा पंचमहामनी करोड़पती
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
कौन बनेगा पंचमहामनी करोड़पती
कौन बनेगा करोडपतीची सांगता झाली आणि भारताच्या तरुणाईचे आशावादी चित्र भावले. उंची वस्त्र प्रावरणे आणि बटबटीत दागदागिन्यात मढवलेल्या व्यक्तिरेखांनी घडवलेल्या नीच, पाताळयंत्री कारवायांमुळे घरोघरी हेवेदावे करत सामान्य समाज जगत असतो असे आभासी चित्र एकीकडे बनत असताना कौन बनेगा करोडपतीने (कौ.ब.क.) सुखद धक्का दिला आहे.
कौबकच्या हॉटसीटमधे बसलेल्या व्यक्ती शहरी कमी, गावा-खेड्यातील अधिक होत्या. त्यांच्यावर तयार केलेल्या चित्रफितीतून ते प्रत्यक्षात कुठे, कसे राहातात-वागतात, याच दर्शन होत होते. उत्तरे देताना त्यांच्या शारीरिक हालचालीतून एक प्रकारचा ठामपणा जाणवत असे. एखादे उत्तर खात्रीने माहित नसेल तर त्यात दिलेल्या पर्यायातील कोणते पर्याय नक्की नसतील ते ठरवून चतुराईने ते मार्ग काढत. अनेकदा प्रेक्षककक्षातून दिल्या गेलेल्या योग्य उत्तरातून तेथे बसलेल्या आमंत्रिताना ती उत्तरे माहित असल्याचे चित्र दिसत होते. तज्ज्ञ व्यक्तींनी अचूक मार्गदर्शन करून अल्प काळात आपली छाप पाडली.
स्त्रियांच्या धीट सहभागातून त्यांनी संकोचीवृत्तीवर मात केली असल्याचे दिसत होते. मिळणाऱ्या पैशाचा विनियोग कसा करणार या हमखास प्रश्नाचे उत्तर देताना विपरीत परिस्थितीतून मार्ग काढत मी इथवर आलोय आहे आता घरातील अन्य सदस्यांवर ती वेळ येऊ नये म्हणून त्यांच्यात आनंददायक प्रेरक परिवर्तन घडवण्यात मी हे धन वापरीन असे म्हणणारे अनेक जण होते. त्यातून त्यांनी अप्पलपोटेपणा न दर्शवता प्रगल्भ विचारीपणाचे दर्शन करवले. प्रथितयश कलाकारांनी मिळवलेले धन सामाजिक कार्याला देऊन आपली बांधिलकी प्रदर्शित केली.
या कार्यक्रमात उस्फूर्तपणा होता. संवाद पाठ करून म्हटलेले नव्हते. सभाधीटपणा, उत्तरातील चतुराई, हिन्दीत त्या त्या प्रदेशातील बोलीचा गोडवा प्रेक्षकांना बांधून ठेवायला कारणीभूत झाला होता.
या सर्वांला पार्श्वभूमी होती अमिताभ बच्चन यांची. त्यांच्या प्रत्येक कृती, वर्तन, संभाषणतून आदर्श व्यक्तिमत्व कसे असते - असावे, याचा वस्तुपाठ मिळत होता. त्यांच्या मुखातून हिंदीभाषा गौरवान्वित झाली.
कौबक शेवटी टीव्हीशो असल्याने उत्कंठा वर्धनासाठी प्रकाश-ध्वनी योजनांचे प्रयोजन उचित वाटले. आता या कार्यक्रमाचा पुढील भाग भारतीयांना असाच प्रेरणादायी होईल अशी आशा वाटते.
प्रतिक्रिया
अगदी मनातले लिहिलेत ओकसाहेब.
+१
शाहरुखखान आणि अन्य सेलेब्रिटी
धन्यवाद
पुर्ण पणे सहमत.
जे झाले ते खूप चांगले झाले.
होय
नक्की काय वेगळा होता हे जाणुन
क्या करोगे इन पैसोंका?
सगळी TRP ची गणित आहेत.
काहीतरी चुकतंय
एका अजब नमुन्याचे दर्शन
ओक साहेब
कार्यक्रम आवडला
हम्म्म
काय रे शतमुर्खा,
मी
सहमत
शशिकांतजी सूरेख, अशाच आशयघन,
शशिकान्त'जी... छान लेख! आज
आय्ला!