Skip to main content

मिठीत कळी उमलली

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 17/11/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मिठीत कळी उमलली
राया तुम्ही प्रेमाची फुलबाग केली तुमच्या मिठीत कळी उमलली वाट कितीक पाहीली थकलं डोळं आज उशीरा का येनं केलं? रुजूवात कराया मोहोर उठवा गाली तुमच्या मिठीत कळी उमलली सजवून माझी काया नखरा केला जवळ घेता तुम्ही गोड गुन्हा झाला नजरेचा तिर मारता अंगी वीज चमकली तुमच्या मिठीत कळी उमलली कमरपट्टा उगा मला का रुतू लागला? शालू अवजड झाला आज का अंगाला? चोळी ऐन्याची नको तिथं उसवली तुमच्या मिठीत कळी उमलली - पाषाणभेद १६/११/२०११
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1962
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

लावणी आणि कविता यामध्ये कुठेतरी आहे हि रचना! आवडली.

कमरपट्टा उगा मला का रुतू लागला? शालू अवजड झाला आज का अंगाला? चोळी ऐन्याची नको तिथं उसवली तुमच्या मिठीत कळी उमलली..... हा....SSSSS थंडी वाढली हो शाहीर...आंग बेचैन झालं की वो... येकदम रोमेंटीक ल्हिलसा की राव :LOVE: