साहित्यः
फिलो शीट्स - बाजारात तयार मिळतात. २ पॅकेट
ऑलिव्ह ऑइल - १ वाटी
काजु - १ वाटी
आक्रोड - १ वाटी
बदाम - १ वाटी
पिस्ता - १ वाटी
दालचिनी पावडर - १ चमचा
वेलची पावडर - १ चमचा
साखर - २ वाटी
मध - १/२ वाटी
स्टार फुल - ३
लवंग - १०-१२
केक करायचे एक भांडे
कृती:
१. काजु, आक्रोड, बदाम व पिस्ता हे सगळे एकत्र करावे. त्यात ४ चमचे साखर, दालचिनी पावडर व वेलची पावडर टाकुन मिक्सर मधे एकदा फिरवुन घ्यावे. त्याची खुप बारीक पावडर करु नये.
२. केक करायच्या भांड्यामधे खाली ऑलिव्ह ऑइल लावावे.
३. त्यात १ शीट टाकावी. भांड्याच्या आकाराप्रमाणे बाकीची शीट कापुन घ्यावी. त्याला वरतुन परत ऑलिव्ह ऑइल लावावे.
४. अशा प्रकारे ४ शीट्स लावुन घ्याव्यात.
५. त्यावर अर्धी सुक्यामेव्याची भरड टाकुन सपाट करुन घ्यावे.
६. त्यावर परत ४ शीट्सचे थर लावावा. प्रत्येक शीट्स नंतर ऑलिव्ह ऑइल लावावे.
७. त्यावर उरलेली भरड टाकुन वरती परत ४ शीट्सचा थर लावावा व ऑलिव्ह ऑइल लावावे.
८. सगळ्यात शेवटा ह्याचे सुरीने चोकोनी तुकडे करावेत. प्रत्येक चोकोनात मधे १-१ लवंग लावावी.
९. आता हे भांडे ओव्हन मधे १५० degree celcius वर १ तास ठेवावे. त्याचा वरतुन ब्राउन रंग झाला पाहिजे.
१०. ह्या १ तासात पाक करावा. त्यासाठी एका भांड्यामधे २ वाटी पाणी, साखर व मध एकत्र करावे. त्याचा १ तारी पाक करुन घ्यावा. हा पाक होत असतानाच त्यात स्टार फुल टाकावे.
११. १ तासानी ओव्हन मधुन बकलावा बाहेर काढावा. त्यावर पाक ओतावा व झाकुन ठेवावे.
१२. २ तासात सर्व पाक त्यामधे मुरेल. बकलावा खायला तयार आहे.
वाचने
13212
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
तोंपासु
अ प्र ति म! क्या बात है!
चाखता येत नाही म्हणुन सध्या
मला फार आवडतो बकलावा! पण त्या
गोड पाककृती... शोधुन बघतो
फोटू मस्त! हा प्रकार एकदा
_/\_
बकलावा
पण तेवढा तो 'शीट' शब्द बदला
In reply to बकलावा by सन्जोप राव
अप्रतिम!
मस्त ! स्टार फुल - ३ हे
मस्तच आहे. तोंडाला पाणी
मस्त
बकलावा !!!!!!!!!!!
छान !!
खल्लास !
पराशेठ, काय्काय शोधून ठेवलंत
In reply to खल्लास ! by परिकथेतील राजकुमार
तोंपासु
एकदम मस्त लागते हे.
काहि शंका
बुकलावा!!
मस्तच........... प रा, पदार्थ
छान कल्पना !
In reply to मस्तच........... प रा, पदार्थ by प्यारे१
रात्रीच्या निवार्याची सोय
In reply to छान कल्पना ! by परिकथेतील राजकुमार
खीक्क...
In reply to छान कल्पना ! by परिकथेतील राजकुमार
पाहिलंच नव्हतं.
In reply to छान कल्पना ! by परिकथेतील राजकुमार
सगळ्यांचे धन्यवाद. फिलो
धन्यवाद
In reply to सगळ्यांचे धन्यवाद. फिलो by Mrunalini
सहीच!
असेच म्हणते...पहिल्यांदाच
In reply to सहीच! by स्मिता.
येताना करुन घेउन या, तो
खल्लास!!
थोडासा गंडलाय का? ऑलिव्ह ऑईल
बकलावा....
__^__
हो... तुप पण चालेल. पण ह्यात