Skip to main content

खेळी.

लेखक स्वाती फडणीस यांनी मंगळवार, 15/07/2008 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
खेळी. पळत होते मी........ नियती चकवत होती. तेजाळ कवडसे!! कधीच हाती न येणारे. मग ठरवल, बास!. आता नाही पळायचे, पुरे झाला उन-सावल्यांचा खेळ, आणि थांबले. एका जागी निश्चल. जिंकल्या सारखी. : : : खुप उशिरा कळलं, ती ही तिचीच खेळी. पुन्हा बरोबर पडलेली. ======================== स्वाती फडणीस......................१९-०१-२००८
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 5704
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

नियतीने केलेला गेम आवडला. छान कविता.

स्वातीताई , खूप छान कविता.. खेळी आवडली नेहमी प्रमाणे आमचा दुसरा प्रतिसाद इथे वाचा (खेळकर)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

सुंदर विडंबन आवडले..

सुंदर ओळी! एकदम आवडून गेल्या! मस्त -('मिसळ'लेला) ऋषिकेश

:)मनापासून आभार

वेगळा विचार आवडला!:) चतुरंग

In reply to by प्राजु

अश्या ओळींच्या संचाला (बहूतेक) कविता म्हणतात.. :P

In reply to by स्वाती फडणीस

कविता आवडली. आणि अश्या ओळींच्या संचाला (बहूतेक) कविता म्हणतात.. आपली खिलाडू वृत्तीही. ("यमक" वर खाली आपण दिलेला प्रतिसादही असाच ठ्ठॉ करायला लावणारा.) - सर्किट

स्वाती छान लिहिलस्.......तुझी फॅन म्हणुन १ सांगते..... १ -२ ठिकाणी यमक नाही ग जुळले.......पण भाव खुप छान व्यक्त केलास्.......मी तुझ्या पुढच्या कवितेच्या प्रतिक्शेत आहे.......

पळत होते मी........ नियती चकवत होती. तेजाळ कवडसे!! कधीच न येणारे हाती . मग ठरवल, बास!. आता पळायचे नाही , पुरे झाला उन-सावल्यांचा खेळ, आणि थांबले. निश्चल एका जागी . जिंकल्या सारखी. : : : खुप उशिरा कळलं, ती ही तिचीच खेळी. पुन्हा बरोबर पडलेली. ======================== स्वाती फडणीस......................१९-०१-२००८

चूका सुधारायला प्रवृत्त केल्या बद्दल :)

आवडली कविता. शुभेच्छा. :)