✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

असा मी तसा मी-१

अ — अविनाश खेडकर, Wed, 11/16/2011 - 02:19
नमस्कार मिसळ्पावकरांनो, मी माझ्या चारोळ्या (असा मी तसा मी नावाखाली) या ठिकाणी वेगवेगळ्या भागात प्रकाशित करीत आहे कृपया प्रतिक्रिया व चुकांवर मार्गदर्शन अपेक्षित..... तुला पावसात पाहिल्यावर मन तुझ्यात हरपलं तु ओळख विसरलीस अन् ते डोळ्यातुन झिरपलं .................................................................... मरण दाराशी आल तेव्हा त्याला एक सांगायच होतं माझ जगुन झालय आता तिच्यासाठी जगायच होतं .................................................................... चुकुन माझा पाय एकदा गरीबित घसरला त्या दिवसापासुन समाज माझ अस्तित्वच विसरला ..................................................................... पोटातील कावळे आता चांगलेच कळतात इथली सर्व माणसं त्यासाठीच तर पळतात ...................................................................... गावकुसाला एकांतच सारा अन् तुझे केस वार्‍यावर काळजाला कसतरी आवरलं पण मन नव्हत थार्‍यावर ...................................................................... तु आलिस अन् भाव स्पर्श बोलके झाले तु गेल्यावर मात्र शब्दही मुके झाले ...................................................................... तु जा म्हणशील तर मी नक्की जानार आहे तु म्हणुच नकोस ती वाट सरणावर आहे. ..................................................................... घेण्याचं माहित नाही देणं मात्र ठाऊक होतं तुझ्यापुरतं मन माझं नेहमीच भाऊक होतं. ...................................................................... वळवांचा पाऊस पाहून तुझी आठवण आली तु दुखावलेल्या भावनांची डोळ्यांत गर्दी झाली. ..................................................................... कुण्या नाक्यावर एक कुत्र प्राण जाऊन पडलं होतं मांस त्याचं खाण्यासाठी दुसरं कुत्र दडलं होतं. ..................................................................... सांजकाळी कातरवेळी सांग अशी का बावरलीस? मजविना जगण्याच्या कल्पनेलाही घाबरलीस? ........................................................................ जीवनात एक वेळ मलाही प्रेम करायचय तिच्या कोर्‍या काळजावर माझ नाव कोरायचय ........................................................................ कायद्याची पुस्तके आता वकिलाच्या पोटासाठी न्यायालयात न्याय झाला लाल हिरव्या नोटांसाठी .......................................................................
  • असा मी तसा मी भाग-२
  • असा मी तसा मी भाग-३
  • असा मी तसा मी--भाग-४

Book traversal links for असा मी तसा मी-१

  • असा मी तसा मी भाग-२ ›

प्रतिक्रिया द्या
2431 वाचन

💬 प्रतिसाद (9)

मस्त !!!

फिझा
Wed, 11/16/2011 - 10:01 नवीन
मस्त !!! अहेत चारोळ्या !!
  • Log in or register to post comments

मस्त... घेण्याचं माहित

मदनबाण
Wed, 11/16/2011 - 10:10 नवीन
मस्त... :) घेण्याचं माहित नाही देणं मात्र ठाऊक होतं तुझ्यापुरतं मन माझं नेहमीच भाऊक होतं. वा... और भी आने दो... (४ओळी प्रेमी) :)
  • Log in or register to post comments

डोक्याला शॉट लावणारे लेख मी

मदनबाण
Wed, 11/16/2011 - 10:17 नवीन
डोक्याला शॉट लावणारे लेख मी काही वाचत नाही चारोळी दिसली समोर तर वाचल्या शिवाय राहत नाही. ;)
  • Log in or register to post comments

वाह!!

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 11/16/2011 - 10:32 नवीन
सर्व चारोळ्या सुंदर आहेत. एकीला वेगळं काढून दाद दिली तर इतर सर्व चारोळ्यांवर अन्याय होईल. तरी त्यातल्या त्यात:
चुकुन माझा पाय एकदा गरीबित घसरला त्या दिवसापासुन समाज माझ अस्तित्वच विसरला
हि तर अप्रतिम!!
  • Log in or register to post comments

चारोळ्या-

विदेश
Wed, 11/16/2011 - 13:58 नवीन
सर्व चारोळ्यात डावी / उजवी करणे अवघड . चांगल्या आहेत.
  • Log in or register to post comments

प्रतिक्रियांबद्ल सर्वांचे

अविनाश खेडकर
Wed, 11/16/2011 - 15:53 नवीन
प्रतिक्रियांबद्ल सर्वांचे मनापासुन धन्यवाद
  • Log in or register to post comments

मस्त.. अजुन येऊ द्यात

सुहास झेले
Wed, 11/16/2011 - 16:23 नवीन
मस्त.. अजुन येऊ द्यात :) :)
  • Log in or register to post comments

अप्रतिम..

प्रभाकर पेठकर
Wed, 11/16/2011 - 16:50 नवीन
अप्रतिम चारोळ्या. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

मस्त चारोळ्या

गणेशा
Wed, 11/16/2011 - 21:35 नवीन
मस्त चारोळ्या
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा