मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भरली कारली.

ज्योति प्रकाश · · पाककृती
साहित्यः-४ कोवळी लहान कारली.व तळण्यासाठी तेल. सारणासाठी साहित्यः-२ चमचे भाजलेले तीळ, २ चमचे भाजलेले बेसन्(एक चमचा तेलावर भाजवे.) २ चमचे भाजलेले सुके खोबरे. १ चमचा धणेपूड. १ चमचा जिरेपूड. अर्धा चमचा आमचुर पावडर. अर्धा चमचा लाल तिखट. चिमूटभर हिंग. पाव चमचा हळद. १ चमचा बदिशेप. चवीपुरती साखर. १ चमचा खसखस. मिठ. कृती :-कारली धुवून घ्यावी.पाठ किसणीने किसून प्लेन करून घ्यावी.प्रत्येक कारल्याला उभा छेद करून घ्यावा. आणि आतील बिया काढून साफ करावे.आतल्या बाजुने मिठ चोळून ठेवावे.तीळ,खोबरं एकत्र कुटून घ्यावे.त्यात धणेजिरे पूड्,तिखट्,साखर्,भाजून कुटलेली खसखस्,तेलावर भाजलेले बेसन व मिठ घालून मिश्रण एकत्र करावे.मिश्रण कारल्यात भरून कारल्याला गच्च दोरा बांधावा. व कारली कुरकुरीत तळावी. वाढण्यापूर्वी दोरा काढून टाकावा.

वाचने 11236 वाचनखूण प्रतिक्रिया 15

पिंगू Tue, 11/15/2011 - 17:36
पाककृती चविष्ट असणार यात काही शंका नाही. बाकी मोबाईल कॅमेर्‍याने फोटो काढतान जरा काळजी घेतली की असे धुरकट फोटो येणार नाहीत. - पिंगू

सविता००१ गुरुवार, 11/17/2011 - 18:35
हीच पाक्र.इथे आहे, वैदेहीताईच्या ब्लॉगवर .:http://chakali.blogspot.com/2011/07/bharli-karli.html

In reply to by सविता००१

५० फक्त Sun, 11/20/2011 - 18:07
+१००० टु सविता००१ तुमची पण नजर जबरा आहे, मला हे वल्लीनं पण सांगितलेलं होतं. काही शब्दांचा फरक सोडला तर सेम टु सेम आहे, अगदी सामानाची यादी पण तशीच्या तशी आहे. म्हणजे दोन चित्रातले १२ फरक ओळखा असतं ना तसं आहे हे. साहित्य रे कृतीच्या तिस-या पॉईंटातल्या पहिल्या ओळिपर्यंत तेच आहे सगळं. ही खावी कशाबरोबर आणि खालच्या दोन टिपा द्यायच्या राहिल्यात. पण याबद्दल काय सांगतं मिपाचं धोरण माहित नाही याबद्दल कुणी काही सांगेल का ?