भरली कारली.
साहित्यः-४ कोवळी लहान कारली.व तळण्यासाठी तेल.
सारणासाठी साहित्यः-२ चमचे भाजलेले तीळ,
२ चमचे भाजलेले बेसन्(एक चमचा तेलावर भाजवे.)
२ चमचे भाजलेले सुके खोबरे.
१ चमचा धणेपूड.
१ चमचा जिरेपूड.
अर्धा चमचा आमचुर पावडर.
अर्धा चमचा लाल तिखट.
चिमूटभर हिंग.
पाव चमचा हळद.
१ चमचा बदिशेप.
चवीपुरती साखर.
१ चमचा खसखस.
मिठ.
कृती :-कारली धुवून घ्यावी.पाठ किसणीने किसून प्लेन करून घ्यावी.प्रत्येक कारल्याला उभा छेद करून घ्यावा.
आणि आतील बिया काढून साफ करावे.आतल्या बाजुने मिठ चोळून ठेवावे.तीळ,खोबरं एकत्र कुटून
घ्यावे.त्यात धणेजिरे पूड्,तिखट्,साखर्,भाजून कुटलेली खसखस्,तेलावर भाजलेले बेसन व मिठ घालून
मिश्रण एकत्र करावे.मिश्रण कारल्यात भरून कारल्याला गच्च दोरा बांधावा. व कारली कुरकुरीत तळावी.
वाढण्यापूर्वी दोरा काढून टाकावा.

वाचने
11236
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
पाकृ छान.. पण फोटो
In reply to पाकृ छान.. पण फोटो by प्राजु
असंच म्हणते.
असच
झकास आवडती पाकृ... जियो...
मस्तच!!!
सुंदर ह....करुन पहातेच
पाककृती चविष्ट असणार यात काही
झकास! कारली म्हणजे लै खास!
वा... चिंचेचा कोळ+कांदा
छान
सुरेख!!!!
छान आहे पाककृती
छान
In reply to छान by सविता००१
+१००० टु सविता००१ तुमची पण
In reply to +१००० टु सविता००१ तुमची पण by ५० फक्त
तिकडचे फोटो मात्र राइट क्लिक