✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पब्लिक प्रोव्हिडंड फंड (PPF) स्कीम मधील बदल

स
सोत्रि यांनी
Tue, 11/15/2011 - 14:43  ·  लेख
लेख
केंद्र सरकारने नुकतीच पब्लिक प्रोव्हिडंड फंड (PPF) स्कीम मधे काही बदल केल्याची घोषणा केली. हा निर्णय छोट्या गुंतवणूंकदारांमधे उत्साह आणण्यासाठी केला आहे असे सांगण्यात आले आहे. तर काय बदल उत्साहवर्धक बदल आहेत हे बघुयात: 1. 70,000 ही गुंतवणुकीची मर्यादा 100,000 वर नेण्यात आली आहे. - जे लोकं 'डेट' मधे गुंतवणूक करतात त्यांना 'डेट' प्रकारातील गुंतवणुक वाढवता येईल - जे लोकं 'इक्वीटी' मधेही गुंतवणूक करतात आणि पोर्ट्फोलिओ 'डेट' प्रकारातही डायव्हर्सीफाय आता करू ईच्छितात त्यांना 'डेट' प्रकारातील गुंतवणुक वाढवता येईल 2. व्याजदर 8% वरून 8.6% असा शुधारित केला आहे. - हे व्याज चक्रवाढ व्याज असते. त्यामुळे ह्या स्कीममधील थोडीशीही दरवाढ मस्त परतावा देउन जाते - आता 8.6% ने 'यील्ड' काय येइल हे जाणकारांनीच स्पष्ट करावे हे उत्तम 3. ह्या खात्यावर मिळणारे व्याज हे Exempt-Exempt-Exempt ह्या मॉडेलनुसार करमुक्त असणार आहे. - नो TDS ही भावनाच किती छान वाटते नं :) नक्कीच हे बदल उत्साहवर्धक आहेत.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15107 वाचन

💬 प्रतिसाद (48)

प्रतिक्रिया

अहाहा....

पिलीयन रायडर
Tue, 11/15/2011 - 14:49 नवीन
काय धागा आहे!!!! दिल खुश हो गया!!! असलं काही वाचायला मिळतच नाही हो आजकाल.... अता मस्त पैकी महिना किती हजार टाकले की काही वर्षानी किती करोड मिळ्तील अशा मस्त पैकी चर्चा होउन जाउ देत...
  • Log in or register to post comments

चांगली बातमी

स्मिता.
Tue, 11/15/2011 - 15:00 नवीन
बातमी छान आहे... वाचून आनंद झाला. आता माझा बेसिक प्रश्नः जर पीएफ खाते बंद असेल तर पीपीएफ मध्ये पैसे गुंतवता येतात का?
  • Log in or register to post comments

जर पीएफ खाते बंद असेल तर

सोत्रि
Tue, 11/15/2011 - 15:44 नवीन
जर पीएफ खाते बंद असेल तर पीपीएफ मध्ये पैसे गुंतवता येतात का?
पीएफ आणि पीपीएफ ह्या दोन्हीही सर्वस्वी भिन्न अशा स्कीम्स आहेत. त्यांचा एकेमेकींशी काहिही संबंध नाही. दोन्ही खाती वेगळी असल्यामुळे आणि एकमेकांवर अवलंबून नसल्यामुळे नक्कीच पीपीएफ मध्ये पैसे गुंतवता येतात. काही कारणामुळे पीपीएफ खातेच जर बंद असेल तर दंड भरून खाते नियमीत करून त्यामध्ये पैसे गुंतवता येतात. - ( छोटा गुंतवणुकदार ) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

अरे वाह.. चांगली बातमी आहे

विशाखा राऊत
Tue, 11/15/2011 - 15:02 नवीन
अरे वाह.. चांगली बातमी आहे
  • Log in or register to post comments

स्वागत...

दादा कोंडके
Tue, 11/15/2011 - 15:04 नवीन
पीपीएफ बद्दल खूप उशिरा जाग आली. कुणीतरी (आयशीआयशीआयने) कान भरले होते की आता रिस्क घेउ शकता तर म्युच्युअल फंडात गुंतवा. तीन वर्षानंतर बघतो तर काय मुद्दलीपेक्षाही फंड वॅल्यु कमी! त्याला फोन करून विचारलतर तुम्ही मार्केटबघून प्रोफाईल का बदललं नाही म्हणून मलाच शिव्या दिल्या. म्हणलं, "अबे, तेव्हडी अक्कल आणि वेळ असता तर शेअर्स मध्येच गुंतवले नसते का?" नंतर परत म्हणाला की नवीन स्किम आली आहे त्यात आम्हीच मार्केट बघून बदल करतो. आता हे दुसरं वर्ष आहे. शहाण्या माणसाने पैसे पोस्टातच गुंतवावे हे पटलय आता. :)
  • Log in or register to post comments

(आयशीआयशीआय) ला का शिव्या

निवेदिता-ताई
Tue, 11/15/2011 - 22:09 नवीन
(आयशीआयशीआय) ला का शिव्या देताय???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

डेट \ इक्विटी

शाहिर
Tue, 11/15/2011 - 16:51 नवीन
मंजी रे काय भाउ ?? जरा मर्हाटी मंदी डीटेल सांग ना
  • Log in or register to post comments

हे अकाउंट कसे ओपन करायचे ?

हितु
Tue, 11/15/2011 - 17:09 नवीन
हे अकाउंट कसे ओपन करायचे ?
  • Log in or register to post comments

एसबीआय बॅन्क किंवा जवळच्या

सोत्रि
Tue, 11/15/2011 - 17:53 नवीन
एसबीआय बॅन्क किंवा जवळच्या पोस्ट ऑफिस मधे हे खाते उघडता येते. खाते उघडण्यास लागणारी कागदपत्रे: 1. पॅन कार्ड 2. फोटो आयडी 3. रहिवासी दाखला - लाईट बील किंवा तत्सम कागदपत्र 4. पूर्ण भरलेला पीपीएफ फॉर्म (हा बॅन्केत किंवा पोस्टात मिळेल) - (पीपीएफ खाते असलेला) सोकाजी अवांतर:
वांग न आवडनारा !!!
हे 'वांग' म्हणजे भाजीतले का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हितु

फक्त एसबीआय नव्हे...

पिलीयन रायडर
Tue, 11/15/2011 - 18:13 नवीन
..तर सर्व Nationalized bank मध्ये हे खाते काढता येते.. कारण माझ्या नवर्‍याचे IDBI तर माझे HDFC मध्ये आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

HDFC आणि Nationalized ??

शाहिर
Tue, 11/15/2011 - 18:57 नवीन
हरे हरे .. काळाच्या फारच मागे पडलो आम्ही :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

खरय तुमचं..

पिलीयन रायडर
Tue, 11/15/2011 - 19:33 नवीन
मी चुकुन लिहिलं ते... पण मला म्हणायच असय की ह्या बॅन्कांमध्ये सुद्धा खाते काढता येते... Public-sector banks that have computerised branches have been allowed to handle Public Provident Fund and Senior Citizens Savings Scheme for the convenience of the public. The government has also allowed institutionally promoted private sector banks – ICICI Bank, IDBI Bank, HDFC Bank and UTI Bank – to handle PPF and senior citizen scheme. असं मी वाचलय हो... आणि माझं खातं पण आहे तिथे...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर

धन्यवाद !! पुण्यात आले की

हितु
Tue, 11/15/2011 - 18:19 नवीन
धन्यवाद !! पुण्यात आले की पहिले हेच काम करणार !! ""अवांतर: वांग न आवडनारा !!! हे 'वांग' म्हणजे भाजीतले का?"" होय !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

वांगे न आवडनारा !!! ऐवजी जर

वपाडाव
Wed, 11/16/2011 - 14:10 नवीन
वांगे न आवडनारा !!!
ऐवजी जर कोंब आलेला असं लिहिलं असतं तरी चाल्लंच असतं की !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हितु

सुवार्तेबद्दल धन्यवाद!

रेवती
Tue, 11/15/2011 - 17:59 नवीन
सुवार्तेबद्दल धन्यवाद! मनाला गुदगुल्या झाल्या हे नाकारत नाही.;)
  • Log in or register to post comments

इपीएफ, पीपीएफ भिन्न आहेत "पी

आशु जोग
Tue, 11/15/2011 - 22:02 नवीन
इपीएफ, पीपीएफ भिन्न आहेत "पी पी एफ उघडण्यासाठी काय करावे लागते" छान प्रश्न आहे इच्छा असेल तर पीपीएफ सापडेल. अनेकांना पीपीएफ हे जरा मागास वाटते म्यु फं किंवा शेअर पेक्षा आहे त्यांना इथे कमी परतावा वाटतो * दोन पीपीएफ उघडता येत नाहीत
  • Log in or register to post comments

छान बातमी दिलीत हो

निवेदिता-ताई
Tue, 11/15/2011 - 22:12 नवीन
छान बातमी दिलीत हो
  • Log in or register to post comments

पिपिफ इज बेस्ट फॉर १५ वर्षे,

५० फक्त
Tue, 11/15/2011 - 22:48 नवीन
पिपिफ इज बेस्ट फॉर १५ वर्षे, पण दहा वर्षांचं म्हणत असाल तर सध्य एस्बिआय आर्डि अकाउत देतंय ९% ने. (९.२५% फॉर सिनियर सिटिझन) दर महिन्याला १००० ची आर्डि केली तर दहा वर्षात १२०००० चे १९१०८७/- होतात म्हणजे इफेक्तिव्ह१३ ६७ % यिल्ड होते. वर तीन वर्षानंतर या अकाउंटवर ओडि लोन काढता येते जमा रकमेच्या ८०% पर्यंत इफेक्टिव्ह रेट ०.७५ %, द चिपेस्ट रेट ऑफ इंटरेस्ट. इथं पण एकुण रक्कम करमुक्त आहे (संदर्भ -https://www.corpbanknet.com/Recurr_deposit_Calc.html). पिपिएफ मध्ये १० वर्षांनी १९४२००/- होतात पण ते सगळे दहाव्या वर्षी एकरकमी काढता येत नाहीत. आणि पिपिएफचा रेट ऑफ इंटरेस्ट बदलु शकतो, पिपिफच्या अकाउंटवर लोन मिळु शकत नाही. (संदर्भ - http://www.ratekhoj.com/ppf-calculator.php) या बाबतीत सगळ्यात बेस्ट आयडिया म्हणजे एचार वाल्याला पटवुन पगारातला इपिएफ मॅक्स लिमिट्ला वाढवुन घेणे, कारण यात आपली कंपनी बेसिकच्या १२% त्यात टाकत असते. पण यामुळे रिटर्न्स मध्ये फार काही दाखवता येत नाही, १०००००/- च्या लिमिट मध्ये. आणि हे फुकटातलं सेव्हिंग असतं कारण यासाठी अकाउंट उघडा आणि मेंटेन करा असल्या भानगडी कंपनीच करते.
  • Log in or register to post comments

या बाबतीत सगळ्यात बेस्ट

मराठी_माणूस
Wed, 11/16/2011 - 09:37 नवीन
या बाबतीत सगळ्यात बेस्ट आयडिया म्हणजे एचार वाल्याला पटवुन पगारातला इपिएफ मॅक्स लिमिट्ला वाढवुन घेणे, कारण यात आपली कंपनी बेसिकच्या १२% त्यात टाकत असते तुम्हाला व्हीपिएफ म्हणायचे आहे का? कारण कंपनीचा हिस्सा ठरलेला असतो त्यात बदल होउ शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

येस सर, आपलाच हिस्सा. आपण

५० फक्त
Wed, 11/16/2011 - 10:23 नवीन
येस सर, आपलाच हिस्सा. आपण बेसिक + डिएचा किती % द्यायचं हे आपल्या हातात असतं, पण कंपनीचा हिस्सा १२%च राहतो. फक्त हा हिस्सा वाढवणं करियरच्या सुरुवातीच्या काळात फार चांगले रिटर्नस देउन जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

RD उर्फ रिकरींग डिपॉझीटला कर

मनिष
Wed, 11/16/2011 - 09:57 नवीन
RD उर्फ रिकरींग डिपॉझीटला कर लागू आहे - फक्त होत TDS नाही. ९% मधून ३०% वजा केले तर ६.३ होतात. अगदी १०% वजा केले तर ८.१ होतात (शिवाय सेस लागेलच, त्यामुळे अजूनच कमी) ज्याच्यापेक्षा पीपीएफ चे ८.६% जास्त आकर्षक आहे. म्हणूनच गॅरंटीड रीटर्न्ससाठी पीपीएफ बेस्ट! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

मी पुन्हा चेक करतो एस्बिआय

५० फक्त
Wed, 11/16/2011 - 10:28 नवीन
मी पुन्हा चेक करतो एस्बिआय मध्ये, माझ्यासाठी यावर एक सोल्युशन आहे, आता मी अकाउंट काढतो माझ्या आईच्या नावानं सिनियर सिटिझन म्हणुन जास्त व्याज मिळतं आणि त्या खात्याला नॉमिनी माझ्या मुलाला करतो, म्हणजे ज्यावेळी अकाउंट मॅच्युअर होईल तेंव्हा सुद्धा कुणालाच टॅक्स बसणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

टॅक्स लायेबिलीटी दर वर्षी

मनिष
गुरुवार, 11/17/2011 - 21:46 नवीन
टॅक्स लायेबिलीटी दर वर्षी मिळणार्‍या व्याजावर असते रे! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

इन द हँड्स ऑफ

अन्या दातार
गुरुवार, 11/17/2011 - 22:26 नवीन
इन द हँड्स ऑफ रिसिपियंट असते ना. वरच्या केसमध्ये अकाऊंट ५०फक्त यांच्या आईच्या नावे आहे.आता त्या काही नोकरी वगैरे करत नाहीत असे गृहित धरु शकतो (सिनिअर सिटीझन असल्याकारणाने) पीपीएफ अकाऊंटवरील व्याजाच्या हक्कदारही त्याच असणार. त्यामुळे २,५०,०००/- पर्यंतचे त्यांचे इन्कम करमुक्त असणार, ज्यात या व्याजाचाही अंतर्भाव होतो. केस २: मृत्युनंतर नॉमिनी म्हणून ५० यांच्या मुलाचे नाव आहे. समजा, पीपीएफ अकाऊंट मॅच्युअर व्हायच्या आत खातेधारकाचा मृत्यु झाला तर मॅच्युरिटीनंतरची सगळी संपत्ती नॉमिनीच्या नावे होईल, पण त्याच्यावरचा टॅक्स ५० फक्त यांना भरावा लागेल (क्लबिंग ऑफ इन्कमच्या क्लॉजप्रमाणे). त्यातल्या त्यात दिलासा म्हणजे रु. १५००/- मात्र त्यांना डीडक्शन मिळेल. अकाऊंट मॅच्युअर झाल्यानंतर जर रक्कम रु. २,५०,५००/- पेक्षा जास्त असल्यास खातेधारकास टॅक्स भरावा लागेल. त्यामुळे ५०फक्त म्हणतात ते जास्त योग्य आहे. अजुन एक उपायः मायनर चाईल्डच्या नावे पीपीएफ अकाऊंट उघडून दरवर्षी फक्त रु. १५००/-भरायचे. जाता जाता एक टॅक्स बचतीचा उपाय. :) (मिपावर मी लिहिलेला पहिलाच इतका मोठा प्रतिसाद असेल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

करेक्ट स्पष्टीकरण आहे हे.

५० फक्त
Fri, 11/18/2011 - 08:25 नवीन
करेक्ट स्पष्टीकरण आहे हे. धन्यवाद रे अन्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

हा बदल कधी पासुन अमंलात येणार

मराठी_माणूस
Wed, 11/16/2011 - 09:31 नवीन
हा बदल कधी पासुन अमंलात येणार आहे . म्हणजे मि जर ह्या वर्षी ७०००० आधीच भरले असतील तर मि अजुन ३०००० मार्च २०११ च्या आत भरु शकतो का?
  • Log in or register to post comments

लहानपणापासून

तिमा
गुरुवार, 11/17/2011 - 19:22 नवीन
लहानपणापासूनच पीपीएफ मधे पैसे भरावे, म्हणजे म्हातारपणी मुद्दल आतच राहून, फक्त व्याजाच्या रकमेवर आरामात रहाता येते.
  • Log in or register to post comments

पोस्ट आणि बँक मधील पी पी एफ

आशु जोग
Wed, 11/23/2011 - 21:35 नवीन
पोस्ट आणि बँक मधील पी पी एफ यामधे सेवा अधिक कोणाची चांगली असते.
  • Log in or register to post comments

गरजेप्रमाणे उत्तर

अन्या दातार
Wed, 11/23/2011 - 21:47 नवीन
तुमची आर्थिक गरज जी स्किम जास्त चांगल्या तर्‍हेने पूर्ण करेल, ती सेवा अधिक चांगली. :) दुर्दैवाने इथे एकच फिक्स उत्तर नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

दोन्ही सरकारी कारभार

सोत्रि
Wed, 11/23/2011 - 22:41 नवीन
दोन्ही सरकारी कारभार असणार्‍या संस्था आहेत. त्यामुळे एकीला झाकावी अन दुसरीला काढावी असा मामला आहे. :) खरंतर बॅन्केला काही फायदा नसतो अश्या अकाउंट्समुळे त्यामुळे प्रचंड टाळाटाळ केली जाते सर्व्हिस देताना - ( एस्बीआयचच्या सर्व्हिसने प्रचंड वैतागलेला ) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

प्रचंड वैतागलेला

कुंदन
Wed, 11/23/2011 - 23:06 नवीन
कशाल वैतागताय.... एक्दाच पैसे भरायचे , एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात. नंतर फकत पासबुक अपडेट करायचे एकदा. सारखे सारखे कशाला जायचे त्यांना त्रास द्यायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

दातार इथे स्कीम दोन्हीकडे

आशु जोग
Wed, 11/23/2011 - 21:59 नवीन
दातार इथे स्कीम दोन्हीकडे एकच असते दोन्ही पी पी एफ एकच असतात फक्त आउटलेट्स भिन्न असतात
  • Log in or register to post comments

या धाग्या बाबत एक शंका

आशु जोग
Mon, 10/08/2012 - 23:44 नवीन
या धाग्या बाबत एक शंका अनेक प्रतिसादांमधे शीर्षक, स्वाक्षरी इ. दिसते आहे पण प्रतिसादामधील आशय, कंटेंट दिसत नाहीये.
  • Log in or register to post comments

पी पी एफ अकौंट एका बँकेकडून

आशु जोग
Mon, 10/08/2012 - 23:44 नवीन
पी पी एफ अकौंट एका बँकेकडून दुसर्‍या बँकेकडे ट्रान्स्फर करायचे असेल तर आधीच्या बॅकेने काय करायला हवे. दोन्ही बँका(ब्रांचेस) एकाच शहरात आहेत. अर्थिक वर्षाच्या मधेच ट्रान्सफर साठी अर्ज केला आहे. तर रक्कम पाठवताना ड्राफ्टने पाठवावी की चेकने. ड्राफ्ट चार्जेस घ्यावे का ? रक्कम देताना व्याजासकट रक्कम द्यावी की व्याज केवळ वर्षाअखेरच दिले जावे असे काही प्रश्न आहेत
  • Log in or register to post comments

कशाला ट्रान्स्फर करताय.

प्रकाश घाटपांडे
Wed, 04/17/2013 - 20:14 नवीन
कशाला ट्रान्स्फर करताय. एसबीआय मधे असेल तर आता ऑनलाईन पैसे भरता येतात. http://www.jagoinvestor.com/2011/12/ppf-account-online-investing-netbanking.html नंतर वर्षातुन/दोनवर्षातुन एकदा आपले पासबुक अपडेट करायचे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

अहो

आशु जोग
Wed, 04/17/2013 - 20:43 नवीन
अहो म. बॅकेला वैतागलो. भरलेले पैसे पासबुकात दिसतच नाहीत. माणसं अति उर्मट, कुठल्याही छोट्या क्वेरीसाठी अनेक टेबले हिंडवणार. पी पी एफ साठी बँकेत फार जावे लागत नाही. तरी एवढे ! सेविंग्ज अकौंट वाल्यांचे तर काय होत असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

मुदतपुर्तीची रक्कम

प्रकाश घाटपांडे
Tue, 10/09/2012 - 10:33 नवीन
का हो? पीपीएफ ची मुदपुर्ती झाल्यानंतर मिळणारी रक्कम पुर्णपणे करमुक्त आहे का? वर म्हटलय की रक्कम अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर टॅक्स भरावा लागेल. आता त्यात काही नवीन सुधारणा झाल्यात असे ऐकतोय ते खर आहे का? अवांतर. बहुतांशी प्रतिसादातील मजकूर दिसत नाही
  • Log in or register to post comments

@वर म्हटलय की रक्कम अडीच

अत्रुप्त आत्मा
Tue, 10/09/2012 - 15:39 नवीन
@वर म्हटलय की रक्कम अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर टॅक्स भरावा लागेल. आता त्यात काही नवीन सुधारणा झाल्यात असे ऐकतोय ते खर आहे का?>>> +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

पीपीएफचा सध्याचा

चतुरंग
Tue, 10/09/2012 - 23:52 नवीन
व्याजदर ८.८% आहे (१ एप्रिल २०१२ पासून). संपूर्ण व्याज हे करमुक्त असते - अडीच लाखाची लिमिट नाहीये.
  • Log in or register to post comments

माझ्या परेशानीचे उत्तर भेटले

आशु जोग
Wed, 10/10/2012 - 00:16 नवीन
माझ्या परेशानीचे उत्तर भेटले असते तर उपकृत झालो असतो
  • Log in or register to post comments

अरे मी तर माझे PPF चे अकांउंट

पाषाणभेद
गुरुवार, 10/11/2012 - 07:33 नवीन
अरे मी तर माझे PPF चे अकांउंट मागेच बंद केले होतो. आता चालू करायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments

पी एफ एक्सेल शीट हवीय

वामन देशमुख
Tue, 04/30/2013 - 12:18 नवीन
बेसिक पगार, नोकरी करणाऱ्याचा हिस्सा, कंपनीचा हिस्सा, पी एफ मुद्दल, पी एस मुद्दल, व्याज, एकूण शिल्लक राशी इ. सर्वांचा अंतर्भाव असलेली सर्वंकष एक्सेल शीट कुणाजवळ असेल तर कृपया लिंक द्या किंवा मला व्यनि करा .
  • Log in or register to post comments

माझे मत

दिपस्तंभ
Wed, 05/01/2013 - 23:14 नवीन
माझे माहिति प्रमाणे, आपण फक्त एसबीआय बॅन्क आणि जवळच्या पोस्ट ऑफिस मधेच हे खाते उघडता येते. बाकी बॅन्कामधे हि सुविधा नाहि. तसेच,एसबीआय बॅन्क मधे हि अट आहे कि बचत खाते असल्या शिवाय पीपीएफ खाते उघड्ता येत नाही......
  • Log in or register to post comments

माझे माहिति प्रमाणे, आपण फक्त

सुहास
गुरुवार, 05/02/2013 - 00:39 नवीन
माझे माहिति प्रमाणे, आपण फक्त एसबीआय बॅन्क आणि जवळच्या पोस्ट ऑफिस मधेच हे खाते उघडता येते. बाकी बॅन्कामधे हि सुविधा नाहि.
नाही. एसबीआय आणि पोष्टांव्यतिरिक्त आणखी इतरही ब्यान्कांमध्येही ही (पीपीएफ अकाऊंट)सोय आहे. उदा. आयसीआयसीआय आणि युनियन (या ब्यान्कांमध्ये मी स्वतः चवकशी केलीय आणि आयसीआयसीआयमध्ये पीपीएफ अकाऊंट २-१/२ महिन्यापूर्वी उघडलेय). -- सुहास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपस्तंभ

चुक..

पिलीयन रायडर
गुरुवार, 05/02/2013 - 12:35 नवीन
माझे आयडिबीआय मध्ये आहे.. २ वर्षा पासुन.. Public-sector banks that have computerised branches have been allowed to handle Public Provident Fund and Senior Citizens Savings Scheme for the convenience of the public. The government has also allowed institutionally promoted private sector banks – ICICI Bank, IDBI Bank, HDFC Bank and UTI Bank – to handle PPF and senior citizen scheme.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपस्तंभ

आणि हो..

पिलीयन रायडर
गुरुवार, 05/02/2013 - 12:41 नवीन
आणि हो.. माझे त्या बँकेत बाकी कुठलेही खाते नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

आयसीआयसीआय आणि युनियन

सुहास
गुरुवार, 05/02/2013 - 00:37 नवीन
माझे माहिति प्रमाणे, आपण फक्त एसबीआय बॅन्क आणि जवळच्या पोस्ट ऑफिस मधेच हे खाते उघडता येते. बाकी बॅन्कामधे हि सुविधा नाहि.
नाही. एसबीआय आणि पोष्टांव्यतिरिक्त आणखी इतरही ब्यान्कांमध्येही ही (पीपीएफ अकाऊंट)सोय आहे. उदा. आयसीआयसीआय आणि युनियन (या ब्यान्कांमध्ये मी स्वतः चवकशी केलीय आणि आयसीआयसीआयमध्ये पीपीएफ अकाऊंट २-१/२ महिन्यापूर्वी उघडलेय). -- सुहास
  • Log in or register to post comments

बातमी छान आहे... वाचून आनंद

निवेदिता-ताई
गुरुवार, 05/02/2013 - 13:58 नवीन
बातमी छान आहे... वाचून आनंद झाला.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा