Skip to main content

सोल्ट डो वॉल हेन्गिंग आणि क्ले आर्ट!!

सोल्ट डो वॉल हेन्गिंग आणि क्ले आर्ट!!

Published on बुधवार, 09/11/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
काल सोल्ट डो पासून वॉल हेन्गिंग बनवले. आधी या पद्धती बद्दल माहिती नव्हती. इंटरनेट वर या पद्धतीची माहिती मिळाली.ख्रिसमस साठी सजावटीच्या वस्तू बनवण्यासाठी याचा उपयोग करता येतो असे कळले. त्यातून मला वॉल हेन्गिंग ची कल्पना सुचली. :) कणिक बनवणे खूपच सोपे आहे आणि सोल्ट डो वर काम करायला खरेच खूप मजा येते. मी वापरलेले प्रमाण: २ कप गव्हाचे पीठ १ कप मीठ १ कप पाणी कणिक घट्ट माळून घ्यावी आणि बनवलेल्या वस्तू ओव्हन मध्ये १५०-२०० डिग्री फेरेनाएत वर ३-४ तास बेक करावे. थंड झाल्यावर अक्रालिक रंगानी रंग द्यावा. ओवेन मध्ये बेक करण्याआधीचे वॉल हेन्गिंग.. वेलकम वॉल हेन्गिंग फोटो फ्रेम रंगीत मातीपासून काही डॉल बनवल्या..पहिलाच प्रयत्न होता..त्यामुळे एवढ्या सुबक नाही बनल्या..समजून घ्या.. ;)
लेखनविषय:

याद्या 9672
प्रतिक्रिया 34

तुम्हाला वेळ कधी मिळतो हो हे सगळे प्रकार (पक्षी उपद्व्याप ;) ) करायला? इथे साधा चहा करुन प्यायचेही जीवावर येते माझ्या.

In reply to by पूनम ब

ए पुनम तै मला पण अशा वस्तु बनवायला आवड्तील ,माझ्याकडे कलर्स आहेत पण बेक करायला ओव्हन नाहिये मग बेक करन्याकरिता काही दुसरे ऑप्शन आहे का? प्लिज सान्ग :)

In reply to by पियुशा

बेक करण्यासाठी मला दुसरा ऑप्शन सुचत नाही आहे :( पण तुम्ही रंगीत माती पासून अशा कलाकृती बनवू शकता..मातीला आकार देणे हि सोपे जाते आणि वेळ पण कमी लागतो..:)

In reply to by पियुशा

एखाद्या भांड्यात ठेवुन तंदुरमध्ये सोडुन द्या.... अर्ध्या तासात मस्त बेक होउन बाहेर येतील.... तंदुर ही प्रत्येक कोपर्‍यावरच्या हाटेलात असते....

In reply to by वपाडाव

ओ नगरच्या ना तुम्ही मग हुरड्याला लावतेत तसली आगटी टाका की एखादी, तुमच्या पॅक्टरीत असेलच की एकादी भट्टी.

In reply to by ५० फक्त

@ ५० फक्त तुमच्या पॅक्टरीत असेलच की एकादी भट्टी. नै ओ भट्टी असायला ही काय फॉण्ड्री नाय ,चकाचक एक्ष्पोर्ट कुम्पनि हाय हुरड्याला लावतेत तसली आगटी लावायला टाईम हाये अजुन ;) @ वल्ली अन व प्या धन्स बर्र का ;) लय मोलाची माहिती दिलीत

In reply to by पियुशा

व्हाल काय माय करो मध्ये भाजता का काय मग ? बरं उग अवांतर नको, ते हुरडा पार्टीचं कधी जमवताय ते बोला. उगा गमजा नको. अवांतर - हुरडा पार्टीला प्रत्यक्ष बोलवावे, उगा बॅचलर हुर्डा असले धागे काढु नयेत ही न मर विनंती.,

कला आहे हो पोरीच्या हातात :) आवडल्या गेले आहे एकदम. अवांतर :- ख्रिसमस साठी सजावटीच्या वस्तू बनवण्यासाठी ज्याचा उपयोग करता येतो, त्याचा उपयोग करून गणेशभक्ती करताना तुम्ही इतरधर्मीयांच्या भावना दुखावल्यात असे तुम्हाला वाटत नाही का ? परा फर्नांडीस

ये अलीबाबा की पोटली मे से क्या क्या निकलरेला बावा !!! लैच कलाकार बै तुम्ही... काहीतरी नविन घेउन येताव... आपल्या मेहनतीला, संयमाला सलाम..... (च्यायला किती फुकट आहे ही !!! ;) )

तुमच्या कलेला आपला सलाम!!

पण ३-४ तास बेक करावे म्हटल्यावर जरा.....

अग्गोबाई, कित्ती गोड आहे ग तुझी कला ! पहातचं रहावसं वाटते :-) परत एकदा लहान होऊन तुझ्या कडे भातुकली खेळायला यावसं वाटतंय .... (कधी येऊ ?? )

In reply to by वाहीदा

परत एकदा लहान होऊन तुझ्या कडे भातुकली खेळायला यावसं वाटतंय .... (कधी येऊ ?? )
तुला वेगळे लहान व्हायची गरज आहे का ?

In reply to by कुंदन

धन्यवाद :) वॉल हेन्गिंग आणि फोटो फ्रेम फक्त कणिके पासून बनवली आहे..बाकी बाहुल्या मात्र रंगीत मातीपासून बनवल्या आहेत.. :)

पूनम, सगळ्याच कलाकृती आवडल्या. मस्तच..:)

छान आहेत कलाक्रुती...आपल्याला अजुन १ कल्पना सुचवतो.खडु पासुनही असे बरेच काही करता येइल.एखाद्या मोठ्या प्लेस्टिकच्या मग मधे खडुंचा लगदा करुन भरला अणी त्याची मोठ्ठी मुद पाडली तर त्यात कोरीवकाम करुन,नंतर स्प्रे पेंटींग केलं,वरतुन पुन्हा ब्रश वापरुन रंग दिले तर तेही १ नंबर होइल ...जमल्यास करुन पहा

खालून दूसरी- जाळीदार ओढणीवाली आवडली.

क्लेअ‍ॅनीमेशन बघायला जिवावर यायचं, थॅग्वाड आता थ्रीडीने त्याची जागा घेतली ते, पण आपण केलेलं सगळ मस्त दीसतय.

फार गोड जमल्या आहेत.