Skip to main content

सिंहीण

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी गुरुवार, 10/11/2011 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
खरं तर http://www.misalpav.com/node/19536#comment-348648 इथेच कबूल केलं होतं त्याप्रमाणे लिहीणार होतो पण काही कारणास्तव तेव्हा जमलं नाही. आज सायंकाळी आमच्या दारावरील घंटी वाजली. दरवाजा उघडून पाहिले असता कोणी दिसले नाही परंतू आमच्या पत्रपेटीत खालील कागद आढळला. हा कागद वाचताच माझी एक जुनी आठवण जागी झाली. साधारण दोन दशकांपूर्वीची हकीगत आहे. तेव्हाही असाच एक कागद आमच्या पत्रपेटीत आढळला होता. फक्त तेव्हा वक्तृत्व स्पर्धा होती आणि स्पर्धेचे आयोजक होते लायन्स क्लब ऑफ निगडी, पुणे. स्पर्धेसाठी विषय होता जातीयवाद - समस्या आणि उपाय. कागदावरील आवाहनास अनुसरून लगेचच जुळवाजुळव सुरू झाली. दोन दिवसांत भाषण लिहून काढले आणि पुढचा एक आठवडा पाठांतर व सरावात घालवला. स्पर्धेचा दिवस उजाडला. ज्या क्रमाने स्पर्धेकरीता नावे नोंदविली गेली होती त्या क्रमाने एकेक जण पुढे येऊन व्यासपीठावर भाषण करू लागला. ती भाषणे ऐकताच माझा उत्साह मावळला. बहुतेक सर्वांनीच जातीयवादाचा संदर्भ चालु घडामोडींशी जोडला होता. जातीनिहाय आरक्षण ठेवल्यामुळे गुणवत्तेला डावलले जाऊन अपात्र लोकांना संधी मिळत असून त्यामुळेच समस्या निर्माण होत आहेत व यावर उपाय म्हणजे जातिनिहाय आरक्षण पूर्णपणे नष्ट करून गुणवत्ता हा एकमेव निकष ठेवला जावा असाच सर्व स्पर्धकांचा सूर होता. याउलट माझ्या भाषणात मी जातीयवादाचा संबंध प्राचीन काळाशी जोडून त्याकाळी चातुर्वर्ण्य पद्धतीमुळे शूद्र ठरविल्या गेलेल्या जातींवर इतर तथाकथित उच्च जातींकडून कसा अन्याय झाला वगैरे मुद्दे मांडले होते. जातिभेदामुळेच पानिपतच्या लढाईत मराठे अब्दाली पुढे हरले या गोष्टीचेही दाखले माझ्या भाषणात होते. जातिभेद विसरून सर्वांनी एकजुटीने राष्ट्राची प्रगती साधण्याकरिता कटिबद्ध व्हायला हवे हा संदेशही शेवटी होताच. आपले भाषण आऊड ऑफ डेट आहे हे मला जाणवू लागले तसेच इतर स्पर्धकांच्या तूलनेत माझ्या भाषणात अतिशय साधी व अनाकर्षक वाक्ये होती. इथे स्पर्धकांच्या वाक्यांना टाळ्यावर टाळ्या पडत होत्या आणि माझ्या मनावर निराशेचे सावट पडू लागले होते. तरीही, त्याच मनस्थितीत माझे नाव पुकारले गेल्यावर मी व्यासपीठावर गेलो आणि पाठ केलेले भाषण एका लयीत म्हंटले. अपेक्षेप्रमाणेच पूर्ण भाषणा दरम्यान व भाषण संपल्यावरही सभागृहात स्मशान शांतता होती. इतर स्पर्धकांना हंशा व टाळ्या यांचा भरघोस प्रतिसाद देणार्‍या प्रेक्षकांनी माझ्या भाषणाला अतिशय शांत चित्ताने ऐकून घेतले होते. आपला काय निकाल लागणार हे उमजून मी जागेवर जाऊन बसलो. त्यानंतर परीक्षकांनी आपले मनोगत ऐकवायला सुरूवात केली. त्यांच्या दृष्टीने लोकानुनय करण्यासाठी इतर स्पर्धकांनी जी टाळ्याखेचक वाक्ये भाषणात वापरली होती ती केवळ जनक्षोभ भडकविण्याच्या लायकीची होती. स्पर्धेत अशी भाषणे बाद केली जात असल्याने त्यांचा विचार गुणांसाठी केला गेलेला नव्हता. त्यामुळे अगदी अनपेक्षितरीत्या परीक्षकांनी मला त्या स्पर्धेचा विजेता घोषित केले. त्याच दिवशी सायंकाळी आठ वाजता लायन्स क्लबच्या गेट टुगेदर मध्ये मला पारितोषिक स्वीकारण्यासाठी आमंत्रित केले गेले. सायंकाळी मी कार्यक्रमाला निघण्याआधी आई मला म्हणाली, "नेहमीप्रमाणे बोरिंग कपडे घालु नको. तुझ्याकरिता मी नवीन ड्रेस आणलाय तो घालुन जा." हा नवा कोरा ड्रेस म्हणजे गुलाबी रंगाची बॅगी जीन्स पॅन्ट, जिला गुडघ्यावर खिसा, खिशाला एक फ्लॅप, फ्लॅप वर बोटभर लांबीची पट्टी आणि ती पट्टी अडकविण्यासाठी पुन्हा खिशावर एक स्टील ची रिंग आणि या पॅन्ट सोबत भडक काळ्या रंगाचा टीशर्ट, टीशर्ट वर पोटाजवळ अगदी मधोमध कांगारूच्या पोटपिशवीची आठवण व्हावी इतका मोठा खिसा. हा पोशाख बघूनच मला झिणझिण्या आल्या. पण आईच्या मते क्लबातल्या पार्टीत जायचे म्हणजे असाच "मॉडर्न" ड्रेस हवा. शेवटी अनिच्छेनेच मी तो पोशाख परिधान केला. त्यानंतर माझ्या चेहर्‍यावर बळेच कुठलीशी पावडर थोपली गेली आणि कपड्यांवर परफ्युम शिंपडण्यात आले. कहर म्हणजे पायांत हिरव्या पांढर्‍या रंगातील स्पोर्ट शूज. कारण पार्टीत फॉर्मल शूज बरे दिसत नाहीत. अशा प्रकारे एकदाचा मी माझ्या मातोश्रींच्या अपेक्षेप्रमाणे पार्टी ऍनिमल दिसू लागल्यावरच मला घराबाहेर जाऊ देण्यात आले. तर अशा अवतारात मी एकदाचा गेट टुगेदरच्या स्थळी ठीक आठ वाजता पोचलो. अर्थात तेव्हा तिथे चिटपाखरूही हजर नव्हते. साडेआठ नंतर हळूहळू एक एक करून मंडळी येऊ लागली. हे सर्व क्लबचे सदस्य होते. त्यांच्या आपसात गप्पा रंगु लागल्या. माझ्या ओळखीचे कोणीच नसल्याने मला अवघडल्यासारखे होऊ लागले. थोड्या वेळाने एका व्यक्तिने ओरडून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. हा एक मध्यमवयीने इसम दिसत होता. त्याने हातात एक मोठे कापड घेतले होते. दुसर्‍या हातात सीझ फायर सारखे एक उपकरण होते. अर्थात त्याच्या या वस्तुचे नाव वेगळे होते. त्याच्या म्हणण्याप्रमाणे हे उपकरण त्याच्या वर्कशॉपमध्ये बनले होते आणि आग विझविण्यासाठी सीझ फायरपेक्षा अनेक पटींनी जास्त कार्यक्षम व स्वस्त ही होते. म्हणजे थोडक्यात तो तिथे त्याच्या उत्पादनाची जाहिरात करीत होता. तरी आता वेळ घालवावा म्हणून मी त्याचा उपद्व्याप पाहत होतो. त्याने बराच गाजावाजा करून आधी ते कापड पेटविले आणि डाव्या हातात धरले. नंतर लोकांचे आपल्याकडे पुरेसे लक्ष आहे ह्याची खात्री करून घेत उजव्या हातातील फायर एक्स्टिन्ग्विशरने त्यावर फवारा सोडण्यास सुरूवात केली. भरपूर फवारा सोडूनही ती आग काही आटोक्यात येईना. नंतर त्याच्या डाव्या हाताला चटके बसू लागले. शेवटी लोक ओरडू लागल्यावर त्याने ते जळते कापड खाली फरशीवर सोडले आणि शेवटी त्यास बुटांच्या साहाय्याने विझविले. त्याची फजिती पाहून लोक फिदीफिदी हसत कुजबुजू लागले. एक शॉर्ट फिल्म संपली. चला आता पुन्हा कंटाळवाणी प्रतिक्षा असा विचार करून मी एका रिकाम्या जागी जाउन बसू लागलो तोच मला कोणीतरी "हॅल्लो हॅल्लो" करून बोलावते आहे असे जाणविले. आवाजाच्या दिशेने पाहिले असता, एक तरूणी हात करून मला तिच्या जवळच्या रिकाम्या आसनावर बोलावत असल्याचे दिसले. तिने गरबा/दांडिया खेळताना वापरतात तसा भडक जांभळ्या रंगाचा पोशाख (त्यास चणिया चोली का कायसे म्हणतात. अर्थात हे मला तेव्हा ठाऊक नव्हते) परिधान केला होता. तशाच जांभळ्या रंगाची लिपस्टीक व चेहर्‍यावरही खुपसा मेक-अप केला होता. पापण्या व भुवयांसोबतच डोक्यावरचे केसही रंगविलेले होते. तिच्या आवाजाला एक वेगळाच घोगरा टोन होता (नेमक्या शब्दांत सांगायचं तर तिचा आवाज अगदी राणी मुखर्जीसारखा होता. अर्थात तेव्हा मी राणी मुखर्जीचा आवाज ऐकला नव्हता). त्या अमराठी तरूणीने मला स्वत:च्या शेजारी बसवून हिंदी-इंग्रजी मिश्र भाषेत संवाद सुरू केला जो मी इथे मराठीत देत आहे. ती : हाय. नवीन सभासद का? मी : नाही. वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिक मिळालेय, ते घ्यायला आलोय. ती : व्वॉव! अभिनंदन! काय विषय होता? मी : जातीयवाद - समस्या आणि उपाय. ती : ???? मी : (घसा खाकरून) जातीय... ती : बरं ते जाऊ दे. आज रात्री काय प्रोग्रॅम आहे? मी : रात्री? आता रात्रच नाही काय? आता दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम संपला की सरळ घरी जाऊन झोपणार. ती : (माझ्या डावीकडून स्वत:चा उजवा हात माझ्या उजव्या खांद्यावर ठेवत) बोरिंग! काहीतरीच... ही काय रात्र थोडीच आहे? ही तर सायंकाळ आहे. आणि आताशी सव्वानऊ वाजतायेत. हा कार्यक्रम साडे अकरा आधी संपत नाही. तू काही दहा वाजता घरी पोचू शकत नाहीस. मी : (तिने ज्या पद्धतीने माझ्या खांद्यावर हात ठेवून मला वेढून घेतले होते तो अनुभव मला एकदम नवीनच होता. त्यामुळे अतिशय गडबडून) काय? छे! इतका उशीर. मला घरी रागावतील. मला निघायलाच हवे. (मी उठून उभा राहू लागलो) ती : (हातांनी माझा खांदा दाबून मला खाली बसवत) बस रे! असा कसा जातोस? तुझं प्राईझ नाही का घेऊन जाणार? आणि इतका भितोस काय? साडे अकरा म्हणजे काही उशीर नाही. मी तर त्यानंतर एका डान्स पार्टीला जाणार आहे. इन्फॅक्ट मी तुला तेच विचारणार होते. मला कुणी पार्टनर नाहीये. तू होतोस का माझा डान्स पार्टनर? मी : पण मला दांडिया खेळता येत नाही. ती : (हसत) तूला कोणी सांगितलं मी तिथ दांडिया खेळणार आहे म्हणून? मी : तुमच्या ड्रेस कडे पाहून मला वाटलं तसं... ती : (आणखी मोठ्याने हसत) अरे मला तुम्ही काय म्हणतोस. कॉल मी XYZ (तिने तिचे नाव सांगितले). मी : बरं, पण मला कुठलाच डान्स येत नाही (मला आता तिथून माझी सुटका करून घ्यावीशी वाटत होती). ती : अरे त्यात फारसं काही अवघड नसतं, आणि त्यातूनही काही अडचण आलीच तर मी आहेच की तुझ्याबरोबर. बाय द वे तुझं नाव काय? चे त न खरं तर माझ्या घशाला इतकी कोरड पडली होती की त्यातून एखादा शब्द मोठ्या मुश्किलीने कुजबुजण्याइतपत आवाजातच निघाला असता. अचानक माझा आवाज इतका मोठा कसा झाला? अर्थात मला जास्त वेळ आश्चर्य करावेच लागले नाही कारण पुन्हा तितक्याच मोठ्याने माझ्या नावाचा पुकारा करणारा आवाज आला आणि माझ्यासह इतर अनेकांनी आवाजाच्या दिशेने पाहिले. माझे वडील माझ्याकडे अतिशय रागाने पाहत सभागृहाच्या प्रवेशद्वारातून आत येत होते. मी चटकन त्या तरूणीचा माझ्या खांद्यावरील हात झटकून टाकीत वडिलांपाशी पोचलो. मला घेऊन ते कार्यक्रमाच्या आयोजकांपाशी गेले आणि म्हणाले, "मी चेतनला इथून घेऊन चाललोय." आयोजक उद्गारले, "अहो, असं काय करता? सकाळी स्पर्धेच्या वेळी आमचे सभासद हजर नव्हते. आता सर्वांनाच चेतन त्याचं सकाळचं भाषण ऐकवेल. मग आम्ही त्याला पारितोषिक देऊ." " हे पाहा. तुम्हाला वेळेवर कार्यक्रम सुरू करता येत नाही की संपवता येत नाहीत. तिकडे सगळे त्याची घरी वाट पाहतायेत आणि इथे तुम्ही अजून त्याला थांबवून ठेवायची भाषा करताय. तुमचं बक्षीस बिक्षीस काही नको आम्हाला. हा मी त्याला घेऊन चाललो." माझ्या वडीलांचा उग्र आवेश पाहून आयोजक बावरले. त्यांनी लागलीच पारितोषिकाची ट्रॉफी माझ्या हाती ठेवली आणि मी वडिलांसोबत घरी निघालो. घरी पोचेपर्यंत आणि त्यानंतरही वडील घडल्या प्रसंगाबद्दल काहीच बोलले नाहीत. परंतु जे घडले ते त्यांना निश्चितच आवडले नसणार. त्यानंतर मी ठरविले की जीन्स टीशर्ट असा विदुषकी पोशाख कधीच परिधान करायचा नाही. तेव्हापासून मी पिकनिक असो की पार्टी कायमच कटाक्षाने "फॉर्मल अटायर" परिधान करतो आणि स्पोर्ट शूज ही मॉर्निंग वॉक शिवाय इतर वेळी वापरत नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 73509
प्रतिक्रिया 174

प्रतिक्रिया

In reply to by पियुशा

आम्ही तर कॉले़जात असताना देखील सर्/म्याम ने तय्यार करुन दिलेले आयते भाषण घोकमपट्टी...................
आपणही कॉलेजात गेलो होतो हे दाखवीण्याचा क्षीण प्रयत्न... ;)

In reply to by गणपा

गणपा गुर्जी, आपण कालेजात गेलो होतो हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न नाही तो, आपल्या कालेजात फक्त सर नव्हते तर म्याव म्हणजे म्याम पण होत्या हे दाखवण्याचा स्त्युत्य उपक्रम आहे तो.

In reply to by शिल्पा ब

तुम्ही गोग्गोड असल्याशिवाय कोणतीही तरुणी जवळ येणार नाही...हात लावणं तर दुरच. हा प्रतिसाद मला असल्यास्,शुक्रवारी हापिसात तुम्हाला आवडती वेशभूषा करण्याची परवानगी असते म्हणुन.

In reply to by मदनबाण

बॉरं!! मला वाटलं या लेखाने तुम्ही प्रभावित होऊन बदललात की काय!! बाकी एरवी आठवडाभर तुम्हाला हापिसात युनिफॉर्म असतो का? नै, शाळेत असताना आम्हालाही अशीच एक दिवस सुट असायची हे आठवलं म्हणुन विचारलं.

In reply to by शिल्पा ब

बॉरं!! मला वाटलं या लेखाने तुम्ही प्रभावित होऊन बदललात की काय!! आम्ही दुसर्‍यांना प्रभावित करतो... ;) बाकी एरवी आठवडाभर तुम्हाला हापिसात युनिफॉर्म असतो का? नै, शाळेत असताना आम्हालाही अशीच एक दिवस सुट असायची हे आठवलं म्हणुन विचारलं. इतर दिवशी फॉरमल कपडे घालावेत्...शुक्रवारी यात सुट असते, फक्त टी-शर्ट घातला तर तो कॉलरवाला असावा, असे बंधन आहे. या नियमा विषयी कंपनीने मध्यंतरी इंटर्नल सर्व्हेपण घेतला होता.... थोडक्यात पॉलिसी ! पॉलिसी खेळणे... अप्रेझल,प्रमोशन... या वेळी सर्व पॉलिसी फाट्यावर मारण्यात येतात... हे सांगायला हवे काय ? ;)

In reply to by मदनबाण

इतर दिवशी फॉरमल कपडे घालावेत्...शुक्रवारी यात सुट असते आमच्या कडे पण अशी सुट असते. शुक्रवारी आमच्या कडे झाडुन सगळे , जीन्स , टीशर्ट, स्पोर्टस् शूज अशा गणवेषात येतात, जणू काही तो नियम आहे.

In reply to by मराठी_माणूस

शुक्रवारी आमच्या कडे झाडुन सगळे , जीन्स , टीशर्ट, स्पोर्टस् शूज अशा गणवेषात येतात, जणू काही तो नियम आहे. खी खी खी... पाखरं तर अगदी नट्टा-पट्टा करुनश्यान येतात... या दिवशी असे बनुन येण्यासाठी बहुतेक त्या आठवडाभर तयारीच करत असतात ! असा मला दाट संशय आहे. ;) नविन जॉइन झालेली पाखरं... जाउ दे या विषयी मौन बरे ! ;)

In reply to by मदनबाण

हाहाहा... अगदी अगदी... आम्ही तर ज्युनियर पोरांना कामाला लावून या फुड कोर्टमधून त्या फुडकोर्टमध्ये चकरा मारत असतो... काही चांगलं दिसतंय का ते पाहायला ;)

In reply to by मदनबाण

पाखरांचे ठीक आहे. पण शिंग मोडुन वासरात शिरणार्‍या गाईंची (बैलांची सुध्दा) गंमत वाटते. किमान आपल्याला शोभते किंवा नाही हे पण पहात नाहीत. सुट (सवलत ह्या अर्थि) दिलि म्हणजे तिचा उपयोग केलाच पाहीजे असे काही नाही.

In reply to by मराठी_माणूस

पाखरांचे ठीक आहे. पण शिंग मोडुन वासरात शिरणार्‍या गाईंची खीक... खीखीखी. ;) तरी सुद्धा त्यांना वाटतं की आपण "माल" दिसतो ! ;) उगाच काहीही अंगावर चढवुन मिरवत फिरतात !

In reply to by मदनबाण

इतर दिवशी फॉरमल कपडे घालावेत्...शुक्रवारी यात सुट असते, फक्त टी-शर्ट घातला तर तो कॉलरवाला असावा, असे बंधन आहे.
बहुतेक सगळ्या येमेन्शीमध्ये असंच असतं रे... मी तुमच्या हापिसात होतो तेव्हाही हा नियम होता आणि आता इकडे दुसर्‍या हापिसातही हाच नियम आहे. बाकी आज कुणी पोरीने तुझ्या डाव्या बाजूने तुझ्या उजव्या खांद्यावर तिचा उजवा हात ठेवला तर ते इथे सांगायला विसरु नको बरे. ;)

In reply to by धन्या

बाकी आज कुणी पोरीने तुझ्या डाव्या बाजूने तुझ्या उजव्या खांद्यावर तिचा उजवा हात ठेवला तर ते इथे सांगायला विसरु नको बरे. हॅहॅहॅ... साहेब. घरी दोन घास सुखाचे जेवायला मिळतात्,त्यावर कशाला गदा आणता ? ;)

त्यानंतर मी ठरविले की जीन्स टीशर्ट असा विदुषकी पोशाख कधीच परिधान करायचा नाही. तेव्हापासून मी पिकनिक असो की पार्टी कायमच कटाक्षाने "फॉर्मल अटायर" परिधान करतो आणि स्पोर्ट शूज ही मॉर्निंग वॉक शिवाय इतर वेळी वापरत नाही. याने काही होणार नाही.. जातीचा देखणा लुंगीतही देखणाच दिसतो... त्यामुळे अगदी फॉर्मल अटायर परिधान केलेत तरी एखादी वाघीण पाघळून जवळ येऊन तुमच्या फॉर्मल अटायरचा कंठलंगोट पकडून "ओह कम्मॉन ब्लू आईड टायगर.. लेट मी टीच यू साल्सा.." असं घोगर्‍या आवाजात म्हणेल.. :)

In reply to by गवि

लेख आवडला आहे. >> धन्यवाद. याने काही होणार नाही.. जातीचा देखणा लुंगीतही देखणाच दिसतो... >> यावर आता तुमचा एखादा अनुभव इथे मांडा की. "ओह कम्मॉन ब्लू आईड टायगर.. लेट मी टीच यू साल्सा.." असं घोगर्‍या आवाजात म्हणेल >> पण शंका १. माझे डोळे काळे आहेत. २. शिवाय साल्सा करिता आधी वेटलिफ्टींग शिकावं लागेल ना?

In reply to by चेतन सुभाष गुगळे

:) यावर आता तुमचा एखादा अनुभव इथे मांडा की. तामिळनाडूत असताना लुंगी नेसून पिक्चरला जायचो तेव्हा रस्त्यात असंख्य स्वर्नलथा, अन लक्स्मीप्रिया माझ्याकडे बघूही शकायच्या नाहीत.. तेजस्वीपणा.. दुसरं काय? शिवाय साल्सा करिता आधी वेटलिफ्टींग शिकावं लागेल ना? हा हा हा.. तेही खरंच.. पण ती एकदम शेलाट्या बांध्याची स्लिम असेल तर फार प्रॅक्टिस लागू नये.. पण साल्सा म्हणजे मज्जा राव.. आणि शिकताना तर खूपच मज्जा.. ..चुका होतात नं सुरुवातीला..

In reply to by गवि

>> पण साल्सा म्हणजे मज्जा राव.. आणि शिकताना तर खूपच मज्जा.. ..चुका होतात नं सुरुवातीला.. अरे व्वा, शिकायला पाहिजे. माणूस हा अनंतकाळचा विद्यार्थी असतो असे म्हणतात. (स्लो लर्नर) विमे

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

>>>>>तामिळनाडूत असताना लुंगी नेसून पिक्चरला जायचो तेव्हा रस्त्यात असंख्य स्वर्नलथा, अन लक्स्मीप्रिया माझ्याकडे बघूही शकायच्या नाहीत.. तेजस्वीपणा.. दुसरं काय? अच्छा! तर तो मानूस म्हंजे तुमी व्हता व्हय? आता भ्येटतो तुमाला आन मंग दावतो काय त्ये. आवो म्या पन तवाच तामिळनाडूत व्हतो. नाय म्हंजे आमच्याकल्ड्या गायी म्हशी चारत चारत ग्येलोथो तिथं. आमच्या कायी गायी म्हशींचे नाव बी स्वर्नलथा, अन लक्स्मीप्रिया, नयनथारा, भुवनेस्वरी हायेत. तवा एक मानूस न्हेमी लुंगी वर करूनशान आमच्या गोठ्यावरून रानात जायाचा. त्येच्यानंतर आमच्यावाल्या गायीम्हशी अशा काय बिथरायच्या बाब्बौ का सांजच्याला दुध काय द्येयाच्या न्हायी. त्यो मानूस तुमी व्हता म्हंजे.

तिच्या आवाजाला एक वेगळाच घोगरा टोन होता (नेमक्या शब्दांत सांगायचं तर तिचा आवाज अगदी राणी मुखर्जीसारखा होता. फाटक्या स्पीकरच आवाज = राणी मुखर्जीसारखा आवाज ! ;)

In reply to by मदनबाण

फाटक्या स्पीकरच आवाज = राणी मुखर्जीसारखा आवाज ! >> हो पण अशा आवाजात समोरच्याला संमोहित करण्याची जरब असते. अर्थात हे व्यक्तिगत मत आहे. इतरांना पटेलच असे नाही.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

फाटक्या स्पीकरच आवाज = राणी मुखर्जीसारखा आवाज ! >> हो पण अशा आवाजात समोरच्याला संमोहित करण्याची जरब असते. अर्थात हे व्यक्तिगत मत आहे. इतरांना पटेलच असे नाही. अरे वा..... अनेकांच्या मते माझाही आवाज राणी मुखर्जी सारखा आहे.याचा आज पहिल्यांदा आनंद होतोय! :) याबद्दल अनेक वर्ष वाटत आलेल्या दुखावर आपण फुंकर घातलीत यासाठी धन्यवाद.

In reply to by किचेन

अरे वा..... अनेकांच्या मते माझाही आवाज राणी मुखर्जी सारखा आहे.याचा आज पहिल्यांदा आनंद होतोय! >> चला माझ्या प्रतिसादामुळेही कुणाला आनंद मिळाला तर. टंकनश्रमांचे चीज झाले. याबद्दल अनेक वर्ष वाटत आलेल्या दुखावर आपण फुंकर घातलीत यासाठी धन्यवाद. >> दु:ख करण्यासारखे त्यात काही नाही. आता उलट त्याबद्दल अभिमानच बाळगा.

In reply to by किचेन

अनेकांच्या मते माझाही आवाज राणी मुखर्जी सारखा आहे.याचा आज पहिल्यांदा आनंद होतोय!>> कोणाला कशाचा आनंद होइल सांगता येत नाही बुवा!!! ;)

अतिशय प्रभावशाली लेखन. श्री. गुगळे ह्यांच्या लिखाणात कायमच काही ना काही संदेश दिलेला असतो. 'वयात आलेल्या मुलीचीच नव्हे, तर मुलाची देखील काळजी घ्यायला हवी, त्याला जपायला हवे' हे आपल्याला ह्यातून शिकायला मिळते.

In reply to by परिकथेतील राजकुमार

तुमचीच प्रतिक्षा होती. http://www.misalpav.com/node/19708#comment-351524 इथे मी तुमची आठवण काढली आणि तुम्ही अवतीर्ण झालात. बाकी तुमचा नेहमीप्रमाणेच प्रोत्साहनपर प्रतिसाद पाहून अतिशय आनंद झाला. आपला आभारी

In reply to by Dhananjay Borgaonkar

धनंजय बोरगांवकर. खुप दिवसांनी मिपा वर कॉमेडी लेख वाचला. >> आभारी आहे. अर्थात या मागची प्रेरणा म्हणजे रोहित भिडे यांच्या लेखावरचा स्मिताजींचा प्रतिसाद. तेव्हा त्यांना आणि त्याचबरोबर यशवंत एकनाथ कुलकर्णी व इतरही सदस्यांना याचे श्रेय द्यायला हवे ज्यांनी हा किस्सा इथे मांडण्याची आग्रही मागणी केली होती. असच लिहित जा >> आपल्या सारखे प्रोत्साहन देणारे वाचक असल्यावर भविष्यातही असेच लिहीण्याचा प्रयत्न केला जाईल.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

माझ्या विनंतीला मान देवून इथे किस्सा टाकल्याबद्दल धन्यवाद चेतन! लेख आणि त्यावरचे प्रतिसाद वाचून भरपूर करमणूक झाली.

आपल्याला त्या पोरीच्या चाणाक्ष बुद्धीची दाद द्यावीशी वाटते..... ;) १३.५ वर्षाचे अतिशय विदूषकी दिसणारे पण अगदी निरुपद्रवी पोर (हा सगळा डेटा चे.सु.गुगळे यांचाच) ग्रुपला दाखवायला बरे पडेल असा काहीसा विचार त्या कन्यकेने केला असेल. (थोडेसे भेजा फ्राय सारखे असावे काय परकरन? ;) )

मस्त लेख. असो. एक प्रश्न : आता तरी दांडिया रास खेळु लागलात का नै?

In reply to by विनायक प्रभू

नृत्याविषयी पूर्वीपासूनच नावड आहे, म्हणूनच तिने नृत्याचा विषय काढताच मी तिथून जाऊ लागलो होतो. नृत्याविषयीची ही नावड अजूनही तशीच आहे त्यामुळे पुन्हा कुठल्याही नृत्यप्रकाराच्या वाट्याला गेलो नाही.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

बोंबला. जे आयला दांडिया रास हा नृत्य प्रकार आहे हे तुम्हाला कुणी सांगितले?

अभिनंदन गुगळेसाहेब या शतकोत्तर प्रतिसादी धाग्याबद्दल! जियो. आणि हो - धन्यवाद, आभारी आहे असले शब्द लिहून आपल्या मित्रांना परकं नाही करायचं. You deserve it!

मूळ धागा वाचून जेवढी करमणुक झाली त्यापेक्षा जास्त करमणुक शतकोत्तर प्रतिक्रियांनी झाली. म्हणून लेखकाचे व सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनःपूर्वक आभार!!!

जवळपास २० वर्षापूर्वीचा काळ , लेखकाचे साडे तेरा वय लक्षात घेता आणि पोशाखाचे वर्णन वाचून (गुलाबी पँट, लूझर टि शर्ट - टिपीकल गोविंदा स्टाईल) लेखातील सर्व प्रसंग पटले.

>>त्यानंतर मी ठरविले की जीन्स टीशर्ट असा विदुषकी पोशाख कधीच परिधान करायचा नाही. गुगळेकाका, मला तुमचा निर्णय आवडला. गुलाबी रंगाची जीन्स घालण्यापेक्षा फॉर्मल कधीही बेस्ट !!

वाचनिय विनोदी लेख.

In reply to by चिरोटा

अभिप्रायाबद्दल धन्यवाद चिरोटाजी. अर्थात या लेखाकरिता मी विशेष मेहनतही घेतली नाही. जसं घडलं तसं केवळ वीसेक मिनीटांत टंकलं. माझ्या कल्पनाशक्तीला इथे वाव नव्हता. तरीही केवळ वीस तासांत शतकी प्रतिसाद मिळालेले पाहून मलाही आश्चर्यच वाटलं. कित्येक दिवस विचार करून मेहनत घेऊन टंकलेल्या माझ्या पूर्वीच्या लेखांनाही इतका भरघोस प्रतिसाद मिळाला नव्हता.

तरीही केवळ वीस तासांत शतकी प्रतिसाद मिळालेले पाहून मलाही आश्चर्यच वाटलं. कित्येक दिवस विचार करून मेहनत घेऊन टंकलेल्या माझ्या पूर्वीच्या लेखांनाही इतका भरघोस प्रतिसाद मिळाला नव्हता. ५० रन्स तर तुमच्याच आहेत गुगळे काका ;)

एक तरुणी तुम्हाला नाचासाठी निमंत्रण देते व तिच्या हेतुविषयी तुम्ही घेतलेली शंका शंकास्पद आहे. निदान नाचा व्यतिरिक्त तिचा दुसरा कोणताही हेतु तुमच्याबद्दल होता, हे तुमचा फोटो पाहुन वाटत नाही.

लेख शोधुन काढुन वाचला ... लईच भारी नशीबवान आहात तुम्ही ...आमच्या तर स्वप्नातही असे काही होत नाही :D

परिक्षेत उत्तरे लिहिल्यासारख्या प्रतिक्रीया का देता हो चेतन? लास्ट ईयरला काय गोल्डनला राहिलेलं काय?

जातिभेद विसरून सर्वांनी एकजुटीने राष्ट्राची प्रगती साधण्याकरिता कटिबद्ध व्हायला हवे हेच खरे! अजून एक विनंती: जातिभेदामुळेच पानिपतच्या लढाईत मराठे अब्दाली पुढे हरले या गोष्टीचेही दाखले मिपावर वाचायला नक्कीच आवडतील.

In reply to by आयुर्हित

सिंहीण हा लेख तुमच्यामुळे पुन्हा वाचला. मज पामराच्या मनात सिंहीण लेखाचा विषय वेगळाच आहे असा संशय होता तो आपल्या प्रतिसादामुळं दूर झाला. आभार.

ह्या सिंहीणीला पिंजर्‍यातून बाहेर कोणी काढलं? हसून हसून परत एकदा प्राण कंठाशी आले ना राव. चेतन सुभाष गुगळे यांना "मिपा ब्रम्हे" (आठवा- मुक्तपिठ...ब्रम्हे...लुना...४००० रूपये...) हा पुरस्कार देण्यात यावा अशी नम्र सुचना. हा त्याहून एक कांकणभर सरसच आहे.

In reply to by रामपुरी

बाकी हा लेख वाचल्यापासून "फॉर्मल अटायर" वर "स्पोर्टस शूज" हा "विदूषकी" पोशाख बघायची फार्फार इच्छा आहे. (अति अवांतरः जाण्यापूर्वी चेसुगु ना ते जॉगींग कुठ करतात हे विचारून घ्यायला हवं होतं.. छ्या...)

In reply to by रामपुरी

मला गुलाबी जीन्स आणि "लूझर" (!) टीशर्ट बघायची उत्सुकता आहे. बाकी काही असो, पण लायन्स क्लबचं ऐकीव वर्णन या लेखापेक्षा फारसं दूरचं नाही...

In reply to by आदूबाळ

लायन्स क्लबचं ऐकीव वर्णन या लेखापेक्षा फारसं दूरचं नाही...
=)) लहानपणी मोठ्या लोकांसोबत त्यांच्या मिटींगला जाणे होत असे... तो काळ वेगळा होता म्हणा तरीही जर माझी स्मृती धोका देत नसेल तर आपल्या वाक्याशी संपुर्ण सहमत व्हावे असेच म्हणेन.

धागा आणि इथे दिसत असलेल्या प्रतिक्रिया वाचुन धागा संपादित करायला सं.मं.ला बराच त्रास झाला असेल याची जाणिव झाली. :)

धमाल धागा . . . मस्त लिहिलाय अनुभव ! अजय देवगणच्या सिंघम नंतर थेट चेतन गुगळेंची सिंहिण सुपरहिट ! लेखाखालच्या प्रतिक्रिया वाचून तर हसून हसून मुरकुंडी वळाली ! पैशे वसूल धागा !