Skip to main content

विसरता येत नाही

Published on गुरुवार, 10/11/2011
विसरता येत नाही , असे नसतेच काही मनाला सांधणारी नवी मिळतेच शाई.. किती जाती उन्हाळे , बदलतो चेहराही नव्या ह्या मोसमाची नवी मिळतेच ग्वाही चुकांना टाळताना किती केली हुशारी नवे दिसताच कोणी पुन्हा चुकतेच काही तिला वेटाळूनी मी प्राशिला गंध सारा तिला फोडुनी प्यावे असे उरतेच काही खरे ते शोधताना थके श्रद्धा मनाची भेटतो देव ही पण मनी गळतेच काही तिला राणी म्हणालो तिला देवी म्हणालो किती म्हटले तरीही जरा उरतेच काही नदीपात्रामध्ये मी सोडतो दीपमाळा परि गंगा जळातुन निघे भलतेच काही मानतो कागदाला ... वंदितो लेखणीला परि शब्दात अंतिम असे नसतेच काही अरुण म्हात्रे
लेखनविषय:

याद्या 5151
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

...मला वाटलं गविंच्या छोटीसी बात सारखीच एखादी कथा असेल.

सुंदर कविता.

विशेषतः
चुकांना टाळताना किती केली हुशारी नवे दिसताच कोणी पुन्हा चुकतेच काही
या ओळी दाद घेऊन जातात.

छान कविता थोडिशी गुढ आहे पण आवडली चेतन अवांतरः "फाटके होते खिसे अन् नोटही नव्हती खरी पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची" या तुमच्या जुन्या रचनेतील ओळीं तर जाम आवड्ल्यामुळे तुलनेचा मोह आवरता येत नाही.

मस्त आहे कविता .. फर फार आवडली

कविता छन आहे पन येथे ( जनात-मनात ) का टाकली?