दोनुली-नदीचा काठ
दोनुली
( दोनुली ही संकल्पना कविवर्य वामन रामराव कान्त यांची. या द्विदलात्मक रचना म्हणजे एकाच देठावर पण दोन वेगवेगळ्या दिशांना झेपावणारी पानं. आपण जेव्हा एखादी रचना लिहितो तेव्हा त्या विषयाचा एक अव्यक्त भाव मनात दडुन बसतो...आपण आपल्या बुध्दीला-मनाला पटेल तेवढे लिहुन मोकळे होतो., मात्र हा अव्यक्त भाव लपुन बसतो...कदाचित हा "दोनुली" काव्यसंग्रहाचाच परिणाम असावा..मला माझ्या काही रचनांचा अव्यक्त भाव उमगला आणि मी दोनुली लिहिण्याचा एक प्रयत्न केला.)
नदीचा काठ
१
किरणांनी मोहरलेले नदीतले पाणी
हसत खिदळत काठावर आले
काठ मोहरला...हिरवागार झाला
हळुहळु सारा परिसर कंच हिरवा झाला.
काही दिवसांनी तीच पाण्याची लाट परत आली
"अरे काय सुरेख काठ आहे..थांबु या का थोडे?"
पाणी थांबले आणि..आता या शेवाळ्लेल्या काठवर
हल्ली कोणी येतच नाही.
२
ओढ्याचा बांध तोडुन पाणी खळखळुन
वाहत होते..अखंड
झाडाझुडपातुन..दर्या खोर्यातुन
कपारीतुन...भानच नव्हते त्याला
घनदाट जंगलातुन...वाट तुडवत होते
कधी नीळे.कधी हिरवे....कधी गढुळ होत..
त्यालाच ठाउक नव्हती..त्याची वाट
पाण्याच्या प्रवाहाला एकच ध्यास..एकच ओढ...
सागरभेटीची.
( विनीता देशपांडे)
लेखनविषय:
याद्या
1049
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
मस्त
वादळवाट..........