Skip to main content

दोनुली - प्रश्न

दोनुली - प्रश्न

Published on शुक्रवार, 04/11/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
दोनुली ( दोनुली ही संकल्पना कविवर्य वामन रामराव कान्त यांची. या द्विदलात्मक रचना म्हणजे एकाच देठावर पण दोन वेगवेगळ्या दिशांना झेपावणारी पानं. आपण जेव्हा एखादी रचना लिहितो तेव्हा त्या विषयाचा एक अव्यक्त भाव मनात दडुन बसतो...आपण आपल्या बुध्दीला-मनाला पटेल तेवढे लिहुन मोकळे होतो., मात्र हा अव्यक्त भाव लपुन बसतो...कदाचित हा "दोनुली" काव्यसंग्रहाचाच परिणाम असावा..मला माझ्या काही रचनांचा अव्यक्त भाव उमगला आणि मी दोनुली लिहिण्याचा एक प्रयत्न केला.) प्रश्न १ प्रश्नच प्रश्न, कधी डोंगरा सारखे कधी झाडा एवढे प्रश्नांचा गुंता सुटता सुटत नाही उगवत्या सूर्या सोबत रोज येतात पण तो मावळतांना प्रश्न अस्त होतच नाही आणि मग दिवसेनदिवस वाढत रहातात सोडवायचे कसे ? हा प्रश्न विचारत. २ मी आज सूर्योदयाची वाटच पहात होते उत्तरांची झोळी घेउन. पण हे काय मला सतावणारे प्रश्न कुठे आहेत ? या सोप्प्या प्रश्नांसाठी मी माझी झोळी कशाला रिकामी करु ? विनीता देशपांडे
लेखनविषय:

याद्या 1000
प्रतिक्रिया 1