Skip to main content

दोनुली- पायवाट

लेखक विनीता देशपांडे यांनी शुक्रवार, 04/11/2011 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
दोनुली ( दोनुली ही संकल्पना कविवर्य वामन रामराव कान्त यांची. या द्विदलात्मक रचना म्हणजे एकाच देठावर पण दोन वेगवेगळ्या दिशांना झेपावणारी पानं. आपण जेव्हा एखादी रचना लिहितो तेव्हा त्या विषयाचा एक अव्यक्त भाव मनात दडुन बसतो...आपण आपल्या बुध्दीला-मनाला पटेल तेवढे लिहुन मोकळे होतो., मात्र हा अव्यक्त भाव लपुन बसतो...कदाचित हा "दोनुली" काव्यसंग्रहाचाच परिणाम असावा..मला माझ्या काही रचनांचा अव्यक्त भाव उमगला आणि मी दोनुली लिहिण्याचा एक प्रयत्न केला.) पायवाट १ मातीत मळलेली पायवाट माझ्या पाउलांखालुन हळुहळु सरकत होती निर्मनुष्य...थोडीशी अवघडलेली. मी येणार म्हणुन...की काय पानांची सळसळ थांबली होती वारा पण दुसर्या वाटेन निघुन गेला उशिरा का होईना..उमगले ही वाट तर माझ्या तळहातांच्या रेषेवरुनच जात होती. २ पाउलखुणांचा मागोवा घेत निघुन तर आले या पायवाटेवर माणसांनी गजबजलेल्या या वाटेवर कोणाला वेळच नाही..क्षणभर सगळेच चेहरे विझलेले...मग्न..हरवलेले या वाटेवरचे चैतन्य माझ्या कडे धावत धावत आले "चल तुझे लक्ष्य वाट बघत आहे..गाठ घालुन देतो ". विनीता देशपांडे
लेखनविषय:

वाचने 1630
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

असेच म्हणतो. दोनुलीच्या निमीत्ताने वा.रा.कांतांची आठवण करून दिलीत .आज कोणती कविता आठवून म्हणू हा विचार करतो आहे धन्यवाद.

वा ! काव्यप्रकार आवडला. रामदास म्हणतात त्याप्रमाणे वा.रा. कांतांच्या - बगळ्यांची माळ फुले .... आणि त्या तरुतळी विसरले गीत.. ह्या अतिशय भावमधुर रचना आठवून गेल्या.