विनिता देशपांडे यांचा लेख वाचून मला काही दिवसांपुर्वीची आठवण झाली.. आम्ही काही जणींनी मिळुन संध्याकाळी सी एस टी हून सुटणार्या लेडीज स्पेशल ट्रेन मधे सहज एक प्रश्णावली दिली होती, अनेक जणीनी उत्तर दिलीच, शिवाय अशिक्षित बायकाना ही विचारून त्यांच्या वतीने उत्तरे भरली.. एक खूप छान अनुभव होता, पण निष्कर्ष तेवढा छान नव्हता..आश्चर्य म्हणजे, सगळ्यांच्या उत्तरात अनेक समान गोष्टी होत्या..अर्थात, यात काही सिध्द करणे वा रडगाणे गाणे वा खाजगी गोष्टीत नाक खुपसणे हा उद्देश नव्हता. जरा, सगळ्यांना व्यक्त होण्याची सन्धी देणे आणि मैत्री करणे ,हे अपेक्षित होतं. आणि ते झालं ही.
सर्वात मुख्य म्हणजे- घरातील सर्व जण मला "ग्रुहित" च धरतात.('taken for granted'). ही तक्रार जवळ जवळ बहुतेकींचीच होती. घरातील कुणाच्याच गावी ही ते नसतं. ते मुद्दाम करत नाहीत, पण "मी उशिरा येइन" ,"रविवारी पिकनिक आहे" "गावाहून २ जण आता जेवायला येणार आहेत्-तुला सांगायचं राहीलं" अशी मोघम नि तुटक ,माहीतीवजा वाक्ये नेहेमीच ऐकावी लागतात्.माझे ही काही कार्यक्रम आहेत का ,असं कुणी विचारत पण नाही..काही़जणीनी लिहिलं की झाडूवाला, वॉचमन्,पेपरवाला,रद्दीवाला (आणि अनेक) सगळ्यांची ये-जा मलाच बघावी लागते- बाकी सगळे आपण या घरातील नाहीच असे समजत पेपर वा लॅपटॉप मधे गुंग असतात."मी थकत असेन असं कुणाला वाटत नाही.., वाटत असेल, तसं बोलतात पण मदतीच्या नावाने ठणाणा-"असं ही सांगितलं गेलं.
दुसरं म्हणजे, मला स्वतःला ,स्वतःचा असा वेळ च मिळत नाही.. सगळ्यांचे करता करता वेळच उरत नाही आणि वेळ उरला तर तेव्हा मन आणी शरीर थकून गेलं असतं. "८ वर्ष तंबोरा घरात असुन गवसणी पण काढु शकले नाही", "लिहायला/वाचायला वेळ मिळत नाही" ," दोन लॅपटॉप नि एक डेस्कटॉप असून मोकळं काहीच मिळत नाही" ,"निवांतपणा नाही" "कष्टाची जाण नाही" असा सुर तर दर एक उत्तरामागे होता.
'जो तो आपल्याच विश्वात असतो.. " "प्रत्येकाची खाण्याची वेगळी फर्माईश पुरी करताना नाकी नउ येतात" "मी चार दिवस एकटी कुठे जाते म्हटलं तर एरंडेल प्यायल्यासारखे चेहरे करतात, तू जा, पण आमचं सगळं साग्र्-संगीत करुन जा" अशी उदार मनाने सुट ही देतात कधी तरी.." हे पण सांगतात या सख्या. "रोज, स़काळ्-संध्याकाळ, सर्वांना आवडतील अशा-- म्हणजे मुलाना चमचमीत(म्हण्जे: हॉटेलसारखी), नवर्याला टेस्टी(म्हणजे त्याच्या आईच्या हातची चव असलेली),सासु-सासर्यांना साधी (म्हणजे पचायला हलकी) अशा भाज्या करणे हे सर्वात कसरतीचे काम आहे आहे असं अनेक जणींच मत. "घाई-घाईत डबा भरावा आणी नवर्याने "आज पार्टी आहे, तुला बोलायला विसरलो" -असं म्हटलं की सकाळची धावपळ आठवून तडफडाट होतो.." ही पण एक कॉमन तक्रार.
घरी असणार्या स्रीयाना स्वतःसाठी वेळ जरा जास्त मिळत असला , तरी सगळ्यांच्या अपेक्षा पण फार असतात -असं वाटलं. "तुला काय काम आहे-घरीच तर असतेस" हे वाक्य अनेकांकडुन (अगदी नवर्याकडून ही ) ऐकावं लागतं ही खंत अनेक गृहीणींनी व्यक्त केली . एकीने तर लिहिलं -"घरात जसा टी व्ही असतो, फ्रीज असतो तशी आई असते -कायम स्वरुपी, सेवेला तत्पर -असंच माझ्या मुलांना वाटतं".
अशि़क्षित बायकांमधे नवरा दारू पितो नि मारतो हे १/२ अपवाद वगळता समान, मुलं शिकत नाहीत, मवालेगिरि करतात, सारखे पैसे मागतात याच तक्रारी. कदाचित, या संघर्षामुळे तिला स्वतःचा विचार ही करायला मिळत नसावा.. एक भाजीवाली भेटली. म्हणाली " असं लिवुन्शान काय होत नाय. मी त्या मुडद्याला म्हटलं, सा म्ह्यने देते, सुधार नायतर मी चालले पोरं घेवुन. नाय ऐकलं, मग मी बी आले हिथ अनं जगते पोरं घेवुन. मरे ना का तिकडे तो ".( पुर्ण संवाद सौम्य व थोड्या शब्दात लिहिला आहे -तिने दादर ला जो तोंडाचा पट्टा चालू केला तो अनेक शिव्या-शापांच्या सह ठाण्यापर्यन्त तरी चालू होता, ) एकीने विचारलं " यानं काय व्हनार? त्याला पोलिस कायम जेलात टाकतील असं काय असलं तुमच्याकडे फारम तर सांगा". विचारणारी निरुत्तर.
लेडीज स्पेशल ट्रेन हा एक मनाला रीचार्ज करणारा प्रवास आहे ,ही बहुतेक जणींनी आवर्जुन लिहिलं आणि हा फॉर्म घरी दाखवायला आवडेल का तर एकजात नाही उत्तर आलं.. कारण -"आपलीच माणसं आहेत", "तसे सगळेच माया करतात, कशाला दुखवा?" "हे आपलं -मैत्रिणींच सिक्रेट आहे" "तसं काही फार नाही हे,चालायचच" अशी उत्तर मिळाली.
इथे असणार्या स्त्री सभासद तर हे समजुन घेतील्,(कदाचित यातील काही प्रसंग अनुभवत असतील,) पण इतरांना सांगावस वाटतं, या सर्वात कदाचित तुमची पण बायको, वहीनी,बहीण किंवा आई असेल (किंवा नसेल तरी ..).. बघा तरी स्वतःशी विचार करून , खरच असं आहे का तुमच्या ही घरात??
वाचने
5352
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
...
कशी काय तीच उत्तरे? बायको
In reply to ... by रामपुरी
+1 सहमत
In reply to कशी काय तीच उत्तरे? बायको by रेवती
घरोघरी त्याच परी
मी पण सहमत आहे.
In reply to घरोघरी त्याच परी by पैसा
विनंती केली आणि तुम्ही लगेच
लोकल ट्रेन मधील सख्या
लेडीज स्पेशल
...... खूप खूप गहन आणि
पुरुषांचा सहभाग....
होऊ द्या जरा मन मोकळं.
In reply to पुरुषांचा सहभाग.... by बहुगुणी
अत्यंत ज्वालाग्राही विषय, तरी
स्त्रीला स्वतःच आयुष्य असं
+१ सहमत
In reply to स्त्रीला स्वतःच आयुष्य असं by मनीषा
+१ टु टुकुल - विशेषतः या
कोणत्या तरी कवितेतील ओळ
.
+ ∞
In reply to . by आदिजोशी
जोपर्यंत बायका आपल्याहून
In reply to . by आदिजोशी
बिनबुडाचा
In reply to . by आदिजोशी
+१ टु आदिजोशी, आणि लायकी जर
In reply to बिनबुडाचा by स्मिता.
प्रकाटाआ
Missing युयुत्सु......
:-)
In reply to Missing युयुत्सु...... by मन१
मी स्वतःला हे प्रश्न पुन्हा
लकी
मी पण