Skip to main content

गजरा...!!!

गजरा...!!!

Published on सोमवार, 31/10/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
गजरा मला ती आवडायची आणि तिला गजरा .... वेड लावायचा तिचा तो गजरा .... उगीचच सगळे रुसवे फुगवे , गुंतलेले भाव ते सारे हळवे हळवे , वेड लावणारी ओढ ती खरी ,,,आणि ..आणि खरा तो गजरा... फिरायला गेलो होतो बर्फामध्ये मखमली बर्फ आणि उन वरती कोवळे तिचे रूपच गोरे, माझे जरा सावळे रंग मात्र वेगळाच घेऊन यायचा तिचा तो गजरा .... इतकी छान मोगऱ्याची फुले शुभ्र तो रंग अजूनच खुले , अबोलीचा पण तसाच तोरा फुलांच्या संगतीने माळलेला दोरा असा तो असा तो ,,,,गजरा मला ती आवडायची आणि तिला गजरा ....
लेखनविषय:

याद्या 2096
प्रतिक्रिया 4

मस्त जमलीये... पण अजून काहीतरी हवे आहे त्यात...

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

मस्तयं राव कविता. पण अजून काही पाहिजे होते असेच वाटते. -दिलीप बिरुटे

खूप छान - फिरायला गेलो होतो बर्फामध्ये मखमली बर्फ आणि उन वरती कोवळे तिचे रूपच गोरे, माझे जरा सावळे रंग मात्र वेगळाच घेऊन यायचा तिचा तो गजरा .... पु.क.शु.

गजरा एक एक फुलाने बनतो!! कितिहि फुले माळलि तरि अपुरा च असतो ....!!! पण हा गजरा मि करेल पुर्ण. !! धन्यवाद !!