Skip to main content

कर्तव्यतत्पर पोलिस!

लेखक हुप्प्या यांनी मंगळवार, 25/10/2011 06:08 या दिवशी प्रकाशित केले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10478831.cms बदलापूरचे पोलिस कसे कर्तव्यदक्ष आहेत ह्याची एक झलक. एक तरूण आपल्या आईला डबलसीट नेत असताना एका खड्ड्याला अडखळून त्याची मोटरसायकल आदळली. त्यात त्याची आई दगावली. ताबडतोब आपल्या कर्तव्यतत्परतेची जाणीव असणार्‍या बदलापूर पोलिस विभागाने ह्या दुर्दैवी तरूणाला "निष्काळजीपणे वाहन हाकल्याबद्दल" अटक केली. त्याबद्दल त्यांना छानसे पदकच द्यावे असे वाटते. अर्थातच हा आईला मारण्याचा कट असणार. कारण भारतातील रस्ते कसे तलम गुळगुळीत असतात. असा एक दुर्मिळ खड्डा शोधून त्यात आपल्या आईला जिवे मारून आपण जखमी झाल्याचे नाटक करणार्‍या नराधमाला अशीच शिक्षा पाहिजे. सदर खड्ड्याचे शिल्पकार जे कोणी महान कंत्राटदार असतील त्यांना छानसा परमवीर चक्र, महावीर चक्र असा पुरस्कार द्यावा. कारण त्यांच्या बहुमोल मदतीशिवाय अशा नराधमांना पकडणे कठिण होते. यापुढे रस्ते बनवणार्‍यांना अधिकाधिक जीवघेणे खड्डे बनवायला उत्तेजन द्यावे जेणेकरून आपल्या मुलाला, बायकोला, आईला, बापाला, काकाला, मामाला, पुतण्याला, भाच्याला, आज्याला, नातवाला मारणारे तमाम नराधम गजाआड होतील.

वाचने 2960
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

कधीकाळी एकाच ठिकाणी पाच पाच वर्षे, प्रत्येक वर्षी नवीन रस्ता बांधून ते ठिकाण तरी देखील पायवाटच रहाण्याचा चमत्कार झाल्याचे ऐकीवात आहे. खड्ड्यांपुढे अशा पाऊलवाटा बर्‍या असे म्हणायची वेळ आली.

बहुतेक आज लोकसत्ते मध्ये ही माहिती आली आहे,माजुरडे राजकारणी,पोसलेले कंत्राटदार आणि कर्तव्यतत्पर पोलिस असल्याल्या आपल्या देशात सामान्य जनतेला हीच वागणुक मिळणार ना ? यात नवल ते काय ? (रस्ते समजुन खड्ड्यात दुचाकी चालवणारा)

आजच्याच 'लोकसत्ता'मध्ये या धाग्यात दिलेली बातमी आहे, व त्याच्यावरील बातमी मात्र एकदम परस्परविरोधी आहे. पहिली बातमी अपघाताची जबाबदारी वाहनचालकावर दाखवते तर दुसरी बातमी ही जबाबदारी पालिका व राज्य सरकारची असल्याचे सांगते. - दिपोटी

अरे रे, वाईट वाटते. त्या मातेच्या आत्म्यास शांती लाभो व त्या मुलाची पोलिसांच्या तावडीतून सुखरुप सुटका होवो. देवा, दररोज अशा दुर्दैवी घटनांना समोर्‍या जाणार्‍या आपल्या समाज बंधवांना पुढील निवडणुकीत सुबुद्धी दे.

In reply to by भास्कर केन्डे

दररोज अशा दुर्दैवी घटनांना समोर्‍या जाणार्‍या आपल्या समाज बंधवांना पुढील निवडणुकीत सुबुद्धी दे. शहरांतर्गत रस्ते ही स्थानिक पालिकेची जबाबदारी असते. मुंबई-ठाण्यात गेली अनेक वर्षे सेनेचीच सत्ता आहे. पुढील निवडणूकीत नागरीकांना सुबुद्धी मिळू दे! :) (ठाण्यातील मतदार) सुनील

ही तक्रार नक्की बदलापूर पोलिसांनीच नोंदवली आहे काय ? माझ्या माहितीनुसार ही तक्रार डोंबिवलीतील मानपाडा पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे. महेश पाटील यांची लवकरात लवकर सुटका व्हावी असे वाटते. बाकी पोलिसांबद्दल काय बोलणार ? जाउंद्यात.

ह्म्म्म.. पोलिसांबद्दल आजकाल बरेच एकांगी लेखन आजकाल वर्तमानपत्रांतुन येत असते. त्याला इतके महत्त्व देण्याची गरज नाही. लक्ष द्यायचे असले तर पॉझिटिव्ह गोष्टींकडे द्या.

पोलीस म्ह्णजे काय? चला व्याख्या सांगा आपापल्या शब्दात,