http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10478831.cms
बदलापूरचे पोलिस कसे कर्तव्यदक्ष आहेत ह्याची एक झलक.
एक तरूण आपल्या आईला डबलसीट नेत असताना एका खड्ड्याला अडखळून त्याची मोटरसायकल आदळली. त्यात त्याची आई दगावली.
ताबडतोब आपल्या कर्तव्यतत्परतेची जाणीव असणार्या बदलापूर पोलिस विभागाने ह्या दुर्दैवी तरूणाला "निष्काळजीपणे वाहन हाकल्याबद्दल" अटक केली. त्याबद्दल त्यांना छानसे पदकच द्यावे असे वाटते. अर्थातच हा आईला मारण्याचा कट असणार. कारण भारतातील रस्ते कसे तलम गुळगुळीत असतात. असा एक दुर्मिळ खड्डा शोधून त्यात आपल्या आईला जिवे मारून आपण जखमी झाल्याचे नाटक करणार्या नराधमाला अशीच शिक्षा पाहिजे.
सदर खड्ड्याचे शिल्पकार जे कोणी महान कंत्राटदार असतील त्यांना छानसा परमवीर चक्र, महावीर चक्र असा पुरस्कार द्यावा. कारण त्यांच्या बहुमोल मदतीशिवाय अशा नराधमांना पकडणे कठिण होते.
यापुढे रस्ते बनवणार्यांना अधिकाधिक जीवघेणे खड्डे बनवायला उत्तेजन द्यावे जेणेकरून आपल्या मुलाला, बायकोला, आईला, बापाला, काकाला, मामाला, पुतण्याला, भाच्याला, आज्याला, नातवाला मारणारे तमाम नराधम गजाआड होतील.
वाचने
2961
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
...
बहुतेक आज लोकसत्ते मध्ये ही
परस्परविरोधी बातम्या!
मुलभूत गरजा
खरे आहे!
In reply to मुलभूत गरजा by भास्कर केन्डे
ही तक्रार नक्की बदलापूर
एकांगी
सन्नी प्राजींनी पोलिस दलाबाबत
पोलीस
उध्धवा - - - - - - -