बोटपेडव्याचा मोटला.
साहित्यः-१)२०-२५ बोटपेडवे.
२)खवलेलं खोबरं.
३)हळद.
४)लाल तिखट.
५)एक चमचा धणे.
६)चिंच.
७)२-३ हिरव्या मिरच्या.
८)एक चमचा बारीक चिरलेलं आलं.(आवडत असल्यास जास्त घतलं तरी चालेल)
९)३-४ हळदीची पाने.
१०)१०-१५ तिरफळं.
११)मिठ.
कृती :-प्रथम बोटपेडवे साफ करून त्याला मिठ लाऊन ठेवावे.मिक्सरच्या भांड्यात खवलेलं खोबरे घेऊन त्यात
हळद्,लाल तिखट,धणे,चिंच व थोडे पाणी घालून जाडसर वाटून घ्यावे.नंतर त्यातच तिरफळं घालून एक
फेरा फिरवावा.एका भांड्यात हळदीची पाने पसरून लावावी व त्यावर धुतलेले बोटपेडवे पसरून ठेवावे. त्यावर
चिरलेल्या हिरव्या मिरच्या,वाटलेले वाटण,मिठ्,बारीक चिरलेलं आलं घालून हलक्या हाताने ढवळून घ्यावे.
त्यावर परत दोन हळदीची पाने ठेवून मंद गॅसवर १० मिनिटांसाठी शिजत ठेवावे.
वाचने
4500
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
बोटपेडवा... माश्याचा प्रकार
In reply to बोटपेडवा... माश्याचा प्रकार by प्राजु
बोटपेडवे म्हणजे लहान पेडवे.व
छान!
मस्तच.
सह्ही... मस्त पाकृ!