Skip to main content

अगदी नेहमीसारखेच…..

लेखक फिझा यांनी सोमवार, 24/10/2011 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
आजही तो तिथेच वाट बघत उभा होता अगदी नेहमीसारखेच….. मी मात्र ना थाबायचा निर्धार केला होता अगदी नेहमीसारखेच….. का असा आहेस रे तू….. इतका विश्वास तुझ्या डोळ्यात इतकी आर्तता तुझ्या हृदयात नजर फिरवून आणि काहीसा निर्धार करून मला जायचे होते खूप दूर निघून कशी उत्तर देऊ मी तुला रे…. विसरावे म्हटले तरी विसरता येत नाही, दिवस संपून जातो पण मन कुठंच लागत नाही, पाऊस पडून गेला तरी आठवणींचे आभाळ मोकळ होत नाही, आठवण आली नाही असे कधी होताच नाही… नेहमीसारखेच …. अगदी नेहमीसारखेच ….. आठवायला विसरावे लागत, पण विसरता कधी येताच नाही, वाट संपून जाते पण प्रवास कधी संपतच नाही, वाटेत या तुझी साथ हवी आहे !! नेहमीसारखेच ….. अगदी नेहमीसारखेच…..
लेखनविषय:

वाचने 1200
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया