Skip to main content

चला छतावर

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 24/10/2011 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
चला छतावर
पुनवची रात आज आली तुमी आला चला राया चला छतावरती झोपायला ||धृ|| चांदणं पडलंय ह्या रातीचं पाहू लुकलुक तार्‍यांनी शेज ती सजवू वरतीच राहू दोघं तिसरं न्हायी कुनी पहायला चला राया चला छतावरती झोपायला ||१|| हातामधी सरळ धरा अत्तरदानी हळूच खाली सोडा मच्छरदानी इश्काच्या मैदानी उडवा तुमच्या जोरदार तोफेला चला राया चला छतावरती झोपायला ||२|| पाटंला थोडी थंडी गुलाबी पडल अंगावर पांघरून म्हणून तुमाला ओढल तुमीबी जवळ ओढा मला, होईल उबार्‍याला चला राया चला छतावरती झोपायला ||३|| गाठ चोळीची आत्ताच तटली साडी अंगाची का हो फिटली? थोडं सबूरीनं घ्यावं वेळ द्या मला सजायला चला राया चला छतावरती झोपायला ||४|| - पाषाणभेद
काव्यरस

वाचने 1954
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

पाषाणभेदा -झक्कास ..!! चांदणं पडलंय ह्या रातीचं पाहू लुकलुक तार्‍यांनी शेज ती सजवू वरतीच राहू दोघं तिसरं न्हायी कुनी पहायला चला राया चला छतावरती झोपायला ||१|| मस्त आवडली...!!