Skip to main content

जीवन मी जगून गेलो

लेखक स्वाती फडणीस यांनी सोमवार, 14/07/2008 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
जीवन मी जगून गेलो . एकसे सुख दु:खा लेखून गेलो जीवनी असा मी जगून गेलो पाहिली मी दिवास्वप्ने कधी जी साकारण्या तया गढून गेलो आनंद दिला-घेतला असा की सुगंध बागेस देऊन गेलो ऊन-पावसात हसलो सदा मी मैफलीत गीत गाऊन गेलो म्हणती कुणी सटकला कधी हा साथ अशी तुला देऊन गेलो करशिल मजवर आरोप कसे तू जगणे तुला मी शिकवून गेलो ========================= स्वाती फडणीस ....................... २२-०५-२००८
लेखनविषय:

वाचने 2781
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

सुगंध बागेस देऊन गेलो. या ओळी मला खूप आवडल्या.

आनंद दिला-घेतला असा की सुगंध बागेस देऊन गेलो हे फार आवडल.. मदनबाण.....

करशिल मजवर आरोप कसे तू जगणे तुला मी शिकवून गेलो हे फारच आवडलं अप्रतिम.

कविता ठीक वाटली... पुलेशु.... तात्या.

म्हणती लोक पिशाच्च हो झालो करतो कविता आहे जरी मेलो हसु नको ऋषीकेशा हा मी आलो टाकाया प्रतिसाद मी कधी नाही म्हणालो कृ. ह. घ्या. ;-)

हे एक कै. वडीलांनी धरतीवासी मुलाला उद्देशुन केलेले स्वगत आहे. किंवा मला जाणवलेल त्या व्यक्तीच जगण..:)