मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कसे आयुष्य फुलून जाते ..!!

प्रकाश१११ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
कशी अचानक गाठ पडते..? कसे आयुष्य फुलून जाते..! ती आली की , कसे ऋतू बदलून जातात अगदी हवेहवेसे होऊन जातात आयुष्य म्हणजे कविता होऊन जाते मस्त सूर नि ताल मन कसे गाऊन जाते ....!! कशी अचानक फुलापाखारासारखी येते मनाच्या आभाळात गिरकी घेत झुलत राहते कसे मनसोक्त सूर लागतात सूर कसे ताल धरतात सगळेच कसे बदलून जाते निळ्या निळ्या आभाळाचे छान कसे गाणे होते ...? ती आठवली की मन कसे सैरभैर होते शरीरावर रोमांच उठून जातात कसे रक्तामध्ये दिवे पेटून जातात कोणीतरी काळीज ओंजळीत घेऊन कुणालातरी देऊन टाकते ती दिसली की असेच होते असेच होऊन जाते आपण सर्वस्वी तिचे होऊन जातो काळीज आपले हरवून बसतो शप्पत हे खरे असते हरवल्याचा हिशेब कोणी ठेवीत नाही ती आपली झाली की खरेच असे होते हरवण्यात देखील गम्मत असते ..!!

वाचने 1538 वाचनखूण प्रतिक्रिया 6

पाषाणभेद 21/10/2011 - 10:06
कवितेमुळे एकदम हरवून गेलो. माझ्याही मनात काल असलेच सोज्वळ विचार येत होते. पण त्यानंतर मी एक लावणी लिहीली. (सवय! दुसरं काय?) आता येथे टाकत नाही त्यामुळे काळजी करू नका.

मदनबाण 21/10/2011 - 10:16
त्यानंतर मी एक लावणी लिहीली. खी खी खी... येउ दे दफोराव. ;) हल्ली लावण्या पाहण्याची लयं आवड उत्पन्न झाली हाय बघा ! ;) गुरु ठाकुर इतक्या मस्त लावण्या लिहतो की इचारु नका ! :) नटरंग मधे त्यानी लिहलेली सर्व गाणी / लावण्या क्लासच आहेत. :)

विदेश 21/10/2011 - 11:03
ती आली की, ... आयुष्य म्हणजे कविता होऊन जाते छान !