गद्दाफी...लिबया....भारत......
गद्दाफी हा आतापर्यंतचा लिबयाचा प्रमुख धरला गेल्याची बातमी येत आहे. आता लिबया म्हणजे काय?
लिबया म्हणजे उत्तर आफ्रिकेतले एक अरब राष्ट्र. Moor नावाचे इस्लामी योद्धे म्हणे ह्याच भूब्व्हागाच्या आसपासच्या भागातून आख्ख्या युरोपवर चढाई करत गेले होते. आख्खा स्पेन्,पोर्तुगाल ह्यांनी इथून जिंकला व काही शे वर्षे नियंत्रणात ठेवला. भूमध्य समुद्राच्या काठावर, दक्षिणेला आफ्रिका खंड सुरु होतो.
तिथे दोन देश इजिप्त आणि लिबया अगदि strategic location वर आहेत. युरोप, मध्य्पूर्व आशिया व आफ्रिका ह्या तीन्ही भूभागांची व समाजाची आपापली वैशिष्ट्य आहेत. तीन्ही ठिकाणी नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने ह्याचे निर्विवाद महत्व आहे.आफ्रिकेतील सर्वाधिक तेल्साठा सणारा देश. जगातील नवव्या क्रमांकाचा तेलसाठा असणारा देश.
ते ठिक आहे, पण गद्दाफी कोण?
लिबियाचा आतापर्यंतचा तीनेक दशकाहून अधिक काळ असलेला हुकूमशहा.काश्मीर पाकिस्तानला देउन टाकावे हे अत्यंत नि:संदिग्ध व स्प्ष्ट शब्दांत आंतरराष्ट्रिय समुदायात, विशेषतः अरब लीग मध्ये उच्च आवाजात सांगणारा इसम.गेल्या काही दिवसात लिबियात सुरु असलेल्या बंडाळीत्/उठावात्/यादवीत पराभूत झालेला शासक. हा धरला गेला म्हणताहेत.
मग, पुढे काय?
जगाच्या नकाशावर एक नजर टाकून पाहिल्यास काय दिसतं? लिबिया गेला बंडखोरांच्या ताब्यात. ह्यांना म्हणे अमेरिकेचा/NATOचा पाठिंबा आहे. इजिप्तमध्ये आधी अमेरिकेच्या मर्जीत असलेले होस्नी मुबारक होते. आता त्यांच्याविरुद्धही असाच "उठाव" आयोजित अमेरिकेने केला असेल, तर का? दे जाणे.
हे दोन देश सोडले की लगेच आशिया सुरु होतो. तिकडे सौदी अरेबिया,इराक इथे शासनात अमेरिकेची पकड आहेच्.इराक, अफगाणीस्तान,पाकिस्तान इथे खुद्द अमेरिकेचे सैन्यच उभे आहे. मधे उरतो तो फक्त एक देश.........
इ रा ण.
जर हा जिंकला तर सलग एक मोठा अरब जगतातला भूभाग अमेरिकेचा अंकित होइल.
इराणवर आता "इशारे","खलिते" व पेरलेल्या बातम्या इत्यादींचा वर्षाव का होतोय ह्याचा अंदाज यावा.
आंतरराष्ट्रिय राजकारणात दीर्घकाळ चालणारे असे काहिसे राजकारण आकार घेत आहे.......
तिकडं रशिया आणि चीन अधिकाधिक जवळ येताहेत. रशिया पूर्वी होता तितका घनिष्ठ मित्र म्हणून भारताचा राहिल असे वाटत नाही.
ह्यात भारताचे काय होइल?
आपल्याला फायदा कसा करून घेता येइल?
आपल्याला लागणार्या इंधनाचं काय होइल?
(फक्त तीसेक टक्के आपण स्वतः उत्पादित करतो, बाकी सगळं आयात!)
प्रतिक्रिया
पकडले नाही हो ...
भारताबद्दल
View Larger Map भारताने काय करावे या संदर्भात एक लेख वाचनात आला होता. तो गद्दाफीवर हल्ला चालू झाला तेंव्हाचा आहे. त्यातील खालील भाग वाचण्यासारखा आहे: When Pranab Mukherjee visited Libya in 2007 — the first high-powered visit since Indira Gandhi’s in 1984 — Gaddafi waxed eloquent about the sky being “the limit for cooperation between the two countries.” Matching his exuberance, Mukherjee declared India’s “unlimited interest” in promoting “the historical friendship” and broadening ties “in the economic, commercial, cultural, and joint investment fields.” An Indian multi-product business delegation last March, followed in July by the eighth session of the Indo-Libyan Joint Commission, confirmed the promise of partnership in oil and petroleum, IT, education and human resource development. त्या लेखात भारत नंतर केवळ गद्दाफीला विरोधक आलेत आणि अमेरीकेशी मैत्री ठेवण्यासाठी म्हणून त्याच्या विरोधात गेला असा सूर आहे. तसे (एकंदरीतच पश्चिम आशियाच्या बाबतीत आणि लगतच्या तेलाने श्रीमंत असलेल्या राष्ट्रांच्या संदर्भात) करू नये असे देखील आर्थिक वास्तवतेमुळे म्हणलेले आहे. जो गद्दाफी काश्मीरच्या संदर्भात भारताच्या विरोधात आहे, २००९ साली (म्हणजे मुखर्जींच्या भेटीनंतर) युनो मध्ये भारताच्या विरोधात बोलत पाकीस्तानला पण सुरक्षासमितीत जागा मिळाली पाहीजे म्हणतो तेंव्हा कसली आली मैत्री? पण मुद्दा वेगळा आहे. भारताने कधी स्वतःचे म्हणून ठोस परराष्ट्र धोरण ठरवलेले दिसलेले नाही. किमान वरकरणीतरी. कुठेतरी वाटते की आपण स्वतःला अजूनही लहान समजतो, दुर्बल समजतो आणि न बोलता, चोरी चोरी चुपके चुपके जे काही स्वतःसाठी करता येईल ते करायचा प्रयत्न करत रहातो. पण हे एका खंबीर आणि मोठ्या राष्ट्राचे लक्षण नाही... आज गद्दाफी मेला, उद्या अजून कोणीतरी येईल, मग कधीतरी अंबानी-टाटा कसे लिबियात उद्योग मिळवू लागलेत याच्या बातम्या येतील. पण त्याच्या चाव्या मात्र देशाबाहेरच राहतील.
म्येलं
मन व विकास यांनी दिलेली
+१ असेच म्हणतो. वाचतो आहे.
ध चा मा करावा.
भारताने आता महासत्तेप्रमाणे
उर्दू वृत्तपत्राचा कानोसा
भारत म्हणजे आंतर्राष्ट्रीय
नथुराम ??
धारिष्ट्य कसले शाहिर भाऊ?
सर्वांचे आभार....
ठ्ठ्या.....
जगाचा हुकूमशहा अमेरिकन जनता लोकशाही मार्गाने निवडून देते!
@चीन तिथे आपल्या मागुन येउन
@मन१
अली तरहौनी
गडाफी युगाचा अंत( उपसंहार अमेरिका ,नाटो ,चीन ,भारत )और मनमोहन
शंका...
काल मी बांगलादेश व बर्मा
इराकचे भारताशी मैत्रीपूर्ण
तेल के लिये खेल !
अगदी हेच म्हणायचे होते !
आजकाल
क्रांती ?
+१
अमेरिकेचे नेतृत्व
चांगला विषय आणि अभ्यासपूर्ण प्रतिसाद.
हा दुवा देखील पहा. गडाफी
नांव
अमेरिकेला लिबियाची काळजी?
सौर ऊर्जेचे स्तोम?
सौरऊर्जेची तारीफ
सौरऊर्जा आणि महाराष्ट्र
काहीही म्हणा गदाफी ( का
+
गडाफी ( भारताचा दोस्त ) अश्या