निधर्मी देशात ..!!
ह्या निधर्मी देशात धर्माचे अड्डे खूप आहेत
शंभर कोटीच्या देशात देवळे भरपूर
नि देवपण महामूर आहेत
महाराज अगणित
प्रत्येकाचे तंबू मस्त आहेत
भक्त खेचण्यास जो तो आपला आपला तरबेज आहे
महाराज होण्यास शिक्षण नको
फक्त तरबेज अशी जीभ हवी
नजरेत लगामाची ताकद
नागासारखी तेज हवी
जाती भरपूर
नि जातीत सुद्धा पोटजाती
सगळेच गणित अवघड आहे
सुटता सुटत नाही असे हे सगळे अवघड आहे
ह्या निधर्मी देशात धर्माचे अड्डे खूप आहेत
देव धर्म कर्मकांड येथे खूप आहे
जो तो दलालाला दक्षिणा देऊन
देवाला पटवतो आहे
देव बिचारा गप्प
आपलाच आपल्यात मग्न आहे
ह्या निधर्मी देशात धर्माचे अड्डे खूप आहेत
एवढे धार्मिक असून सुद्धा
येथे गरिबी श्रीमंत आहे
हा गरीबांचा देश आहे
पुण्य पुण्य करता करता
नुसते पाप साचत आहे
ह्या निधर्मी देशात धर्माचे अड्डे खूप आहेत
लेखनविषय:
याद्या
1605
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
मार्मिक!!
छान...
आपण व्यक्त केलेली सगळी कळकळ
निषेध.आपण देश निधर्मी
आवल्डी
च्यायला !
परीकथेतील राजकुमारा -धन्यवाद
प्रकाश जी, अप्रतिम काव्य खुप