१९०७ मधली, ब्रिटनमधील एका लहानशा गावात घडलेली ही एक गोष्ट आहे.
त्या गावात एक जत्रा भरली होती. पंचक्रोशीतले शेतकरी, व्यापारी, पशुपक्षी पालन करणारे अशांनी तिथे आपले स्टॉल थाटले होते. लोक भटकत होते, खातपीत होते आणि खरेदी विक्री चालू होती.
एका स्टॉलवर मांस विकणारा एक शेतकरी होता. गर्दी जमवायला त्याने एक शक्कल लढवली. एक चांगला धष्टपुष्ट बैल स्टॉलवर बांधला. त्याचे वजन अचूक ओळखणार्याला अमके एक पौंड बक्षीस लावले. त्याने चिठ्ठ्या बनवल्या होत्या. त्यावर आपले नाव आणि आपले उत्तर लिहून द्यायचे. संध्याकाळी जत्रा संपायच्या वेळेस बक्षीस जाहीर होणार होते.
अर्थातच त्याची शक्कल कामी आली. त्या स्टॉलवर चिक्कार लोक येऊन वजन ओळखायचा प्रयत्न करुन गेले. ते बक्षीस एका जुन्या जाणत्या खाटकाने जिंकले. प्राण्याचे वजन ओळखायचे कसे हे तो अनुभवाने चांगले शिकला होता.
योगायोगाने ह्या जत्रेत सोशोलॉजीचा एक प्रोफेसर आला होता. त्यानेही आपले नशीब अजमावून पाहिले. पण लोकांनी काय काय उत्तरे दिली ह्याविषयी त्याला जास्त कुतुहल होते. स्टॉलमालकाशी बोलून त्याने संध्याकाळी स्पर्धा संपल्यावर सगळ्या चिठ्ठ्या ताब्यात घेतल्या. सगळ्या उत्तरांची आकडेमोड केली. आणि त्या सगळ्यांची सरासरी (अव्हरेज) काढल्यावर त्याच्या असे लक्षात आले की खुद्द विजेत्याच्या उत्तरापेक्षा हे उत्तर अचूक होते! खर्या उत्तरापेक्षा (म्हणजे बैलाचे वजन केल्यावर जितके भरले त्यापेक्षा) केवळ एक पौंडाने उत्तर चुकले होते. ह्या प्रोफेसराची अशी अपेक्षा नव्हती. अठरापगड प्रकारचे लोक येणार ते आपापल्या कुवतीनुसार उत्तर देणार. शेतकरी, बँकेत काम करणारे, पोस्ट ऑफिसातले, रेल्वेत काम करणारे, विद्यार्थी, शिक्षक असे अनेक लोक, बहुतेकांना बैलाच्या वजनाचा अंदाज येण्याचे आजिबात कारण नव्हते. त्यामुळे सरासरी उत्तर अगदीच चुकीचे असेल अशी त्याची अटकळ होती. पण तसे न होता उलटेच झाले.
त्यावर त्याने असे स्पष्टीकरण दिले की झुंडशाही न करता, स्वतंत्र प्रकारे विचार करून इतक्या लोकांनी आपापली उत्तरे लिहिली त्यामुळे त्यांच्या चुका झाकल्या गेल्या आणि सरासरी अचूक उत्तराच्या इतकी जवळ आली.
म्हणजे समजा एकाचे उत्तर १० पौंडाने वर गेले तर दुसर्याचे १० पौंडाने खाली गेले. चार लोकांचे ३ पौंडाने वर गेले तर दुसर्या चारांचे तितकेच खाली गेले असावे. थोडक्यात शेकडो लोकांच्या चुका बेरजेत झाकल्या गेल्या आणि म्हणून उत्तर अचूक होण्यास मदत झाली.
एका पुस्तकात ही गोष्ट वाचली आणि इथे बाकी वाचकांपर्यंत पोचवावी असे वाटले.
वाचने
8935
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
लोकशाही ...
प्रत्येकाला आपापल्या परिने
एक फरक आहे
मूळ तत्व ...
In reply to एक फरक आहे by हुप्प्या
मरा॑ठी शब्द.
In reply to एक फरक आहे by हुप्प्या
त्यावर त्याने असे स्पष्टीकरण
बहुधा....
In reply to त्यावर त्याने असे स्पष्टीकरण by अत्रुप्त आत्मा
@-एकाच्या उत्तराचा
In reply to बहुधा.... by हुप्प्या
लोकशाही किंवा झुंडशाही पेक्षा
हिंदू धर्म
निष्कर्ष चुकीचा वाटला.
काहीतरी गफलत होतेय
In reply to निष्कर्ष चुकीचा वाटला. by गवि
ते बक्षीस एका जुन्या जाणत्या
In reply to काहीतरी गफलत होतेय by हुप्प्या
शोभून दिसेल
टिमवर्क म्हणजे नक्की काय असतं
एखादी गोश्ट एकाने
In reply to टिमवर्क म्हणजे नक्की काय असतं by ५० फक्त
कंपूबाजी???
In reply to एखादी गोश्ट एकाने by आत्मशून्य
आहे.
In reply to कंपूबाजी??? by मी-सौरभ
असं छातीठोकपणे सगळ्यांसमोर
In reply to आहे. by प्रचेतस
मग काय...!.
In reply to असं छातीठोकपणे सगळ्यांसमोर by शिल्पा ब
टिमवर्क चित्रातुन
In reply to मग काय...!. by प्रचेतस
+१
In reply to मग काय...!. by प्रचेतस
साधासुधासौरभ यांनी विचारलेला
In reply to मग काय...!. by प्रचेतस
योगायोग
यंत्रं, त्रुटी वगैरे
हृदयावर ऑपरेशन करायचं असेल तर
In reply to यंत्रं, त्रुटी वगैरे by राजेश घासकडवी
काही संभाव्य उपयोग
दोन अर्धवट शहाणे जमा केले
एक गोष्ट म्हणुन आवडली. व्यती
गमतीदार कथा : प्रयोग करायला हरकत नाही
पूर्वग्रह?
In reply to गमतीदार कथा : प्रयोग करायला हरकत नाही by धनंजय
उत्तम कल्पना.. या पानावर वरती
In reply to गमतीदार कथा : प्रयोग करायला हरकत नाही by धनंजय
माझा अंदाज : लांबी:रुंदी =
In reply to उत्तम कल्पना.. या पानावर वरती by गवि
७.९ : १
In reply to माझा अंदाज : लांबी:रुंदी = by विश्वनाथ मेहेंदळे
माझा अंदाज ९.६ : १
In reply to उत्तम कल्पना.. या पानावर वरती by गवि
माझा अंदाज
In reply to उत्तम कल्पना.. या पानावर वरती by गवि
६:१
In reply to उत्तम कल्पना.. या पानावर वरती by गवि
माझा अंदाज
In reply to उत्तम कल्पना.. या पानावर वरती by गवि
@ गवि
वा.छान. धन्यु.वीसेक अंदाज
माझा अन्दाज
माझा अंदाज
श्री. धनंजय यांनी म्हटलेला
माहिती रोचक >> "सत्यापेक्षा
गवि विश्लेषण टिप्पणी
कौन बनेगा करोडपती
हे केबीसी उदाहरण धाग्यावर
In reply to कौन बनेगा करोडपती by हुप्प्या
हो आणि नाहीही!
In reply to हे केबीसी उदाहरण धाग्यावर by गवि