कोडं
नमस्कार मिपाकरहो,
लहान असताना जयंत नारळीकरांच्या "गणितातल्या गमती-जमती" पुस्तकात वाचलेलं एक गणिती कोडं आठवलं.
एका राज्यात प्रधानाच वय झाल्यामुळे तो निवृत्त होणार असतो. राजा मग राज्यात दवंडी पिटून सांगतो की प्रधानाच्या जागेवरती योग्य व्यक्तीची निवड करायची आहे तरी हुशार लोकानी दरबारत हजर व्हावं. राजा प्रधान बनण्यासाठी आलेल्या लोकांची मुलाखत घेतो. खुप लोकं पहिल्या फेरीतच बाद होतात. अस करत करत शेवटच्या फेरीत तीन माणसं उरतात. राजा खुप प्रयत्न करुनही त्यापैकी सर्वात हुशार उमेद्वार निवडू शकत नाही. मग राजा त्यांना प्रधानाकडे पाठवतो.
प्रधान त्यांना एका खोलीत नेतो, एका गोल टेबला भोवती बसवतो आणि त्यांचे डोळे कापडाने बांधतो आणि म्हणतो, "मी आता प्रत्येकाच्या कपाळावर लाल किंवा पाढरा गंध लावणार आहे". तो मग प्रत्येकाच्या कपाळावर पांढरा गंध लावतो. नंतर तो म्हणतो "आता मी तुमच्या डोळ्यावरचे कापड काढणार आहे. या खोलीत कुठेही आरसा नाही, त्यामुळे तुम्हाला स्वतःचा गंध दिसणार नाही." तो मग तिघांच्या डोळ्यावरचं कापड काढतो आणि म्हणतो "ज्या कुणाला एकाच्या किंवा दोघांच्या कपाळावर पांढरा गंध दिसेल, त्यांनी हात वर करा". अर्थातच प्रत्येकाला समोरच्या दोघांचा पांढरा गंध दिसत असल्यामुळे तीघेजणंही हात वर करतात. तो म्हणतो "आता ओळखा पाहू स्वतःच्या कपाळाचा गंध".
जो सर्वात हुशार असतो, तो थोड्या वेळाने सांगतो की त्याच्या कपाळावर पांढरा गंध आहे म्हणून.
तर आता प्रश्न असा आहे की त्यानं कोणता युक्तीवाद केला असेल?
__________________________________________________________________
वि.सु.: माझा इथे मोठ्ठा धागा टाकण्याचा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे सांभाळून घ्या. :)
प्रतिक्रिया
मस्त धागा...
असे असावे काहीसे
>> ज्या कुणाला एकाच्या किंवा
पुरेशी माहिती
+ १
>>>"ज्या कुणाला एकाच्या किंवा
नाही
युक्तीवाद
ज्या कुणाला एकाच्या किंवा
पुढे काय? समजले नसल्यास युक्तीवाद परत वाचा...
उमजले!
लालच का ?
लालच का हे ज्याला समजले तो परीक्षा उत्तीर्ण झाला
ते ठीक आहे
>>जर सर्वांनीच हा विचार केला
"तीघेजणंही हात वर करतात",
प्र्.का.टा.आ.
बरोबर
दुसरा मार्ग...
किंवा त्याच्या बोटांना फक्त पांढरेच गंध लागलेले असेल.
गृहितक.
तसं म्हटलं तर आरशात बघता
तर्कशास्त्र
सर्व उमेदवार तर्कशास्त्र-पारंगत असण्याचि गरज नाही.
कबूल !
हम्म...
>>पण बाकिच्यांना विचार करायला
हुशार कशाला पाहिजेत? आंधळे
आवडले
एक प्रश्न ::
हो
मस्त कोडं आहे हो कोंडके..
मस्त उत्तर दिले आहे नेत्रेश
गोंधळ.
प्रभाकर जी, माझ्या अगदी वरील
वेगळ्या शब्दात
इथे दोन क्लूज (टेकू) वर
सहमत
पुन्हा काही प्रश्न ::
मस्त कोडे. ह्या कोड्यातला छान
हात वर केल्यामुळे काही शिक्षा