अंधेर नगरी चौपट राजा
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
अंधेर नगरीत एका महान योगीराजांचे आगमन झाले .
चौपट राजाने त्यांचे अगत्याने स्वागत केले .
योगीराजांना भूत , वर्तमान , भविष्य त्रिकालात सर्वकाही बघू शकण्याची सिद्धी प्राप्त होती .
राजाने त्यांना सन्मानपूर्वक दरबारात विराजित करून आपले भविष्य विचारले .
योगीराज क्षणात समाधिस्थ झाले .
जागृत होऊन त्यांनी राजाच्या कानात सांगितले " हे राजा लवकरच तुझा सर्वनाश अटळ आहे , प्रजा तुझ्या कुशासनाला कंटाळली आहे . तुझ्या दरबारातसुद्धा षडयंत्र शिजत आहे , अनेक लोक तुझे सिंहासन उलथून पाडण्याची स्वप्ने बघत आहेत ."
राजा हादरला .
यथोचित बिदागी घेऊन योगीराज मार्गस्थ झाले .
राजाने त्वरीत सर्व संशयितांना जेरबंद केले , आणि वरुन प्रजेत कुणीही स्वप्ने बघू नये असा हुकुम काढला .
सर्वत्र एकच कल्लोळ माजला .
लहान मुले सगळ्यात जास्त अस्वस्थ झालीत . आभ्यासाचा ताण आणि मोठया लोकांच्या रागवण्या कडे दुर्लक्ष करून सुखस्वप्नात रंगून जाणे हाच मुलांचा एकमात्र विरंगुळा होता .
आता त्यांची सतत चीडचीड अन रडारड सुरु झाली .
त्यांच्या आई बापांना आपली कारटी मोठी होऊन उतारवयात आपला संभाळ करतील अशी स्वप्ने दिसेनात ,
तेही निराश झाले .
म्हाता-या , कोता-यांची आयुष्यात एकदा तरी तीर्थयात्रा ( काशी , रामेश्वर अथवा युरोप , अमेरिका काळानुरूप ) घडण्याचे स्वप्न नष्टं झाले .
ती आता नवीन पिढीच्या नावाने कडाकडा बोटे मोडून उरलेले दिवस कंठू लागली .
निम्नवर्गीयांचे मध्यमवर्गीय होण्याचे मध्यमवर्गीयांचे उच्चवर्गीय होण्याचे आणि उच्चवर्गीयांचे निरंकुश सत्ता प्राप्त करण्याचे स्वप्न भंगले .
सर्वात खालची बहुसंख्य निर्धन प्रजा तर अनादीकाळा पासून आपल्याला नाही तर आपल्या मुलाबाळांना तरी कधी पोटभर जेवण मिळेल ह्या स्वप्नाच्या भरवश्यावर पिढयानपिढया अर्धपोटी जगुन मरून जात होती .
त्यांचा तर शेवटचा आधारही खुंटला .
सर्वत्र हाहाकार उडाला .
विदेशी शक्ती तर असल्या संधीची वाट पहात टपून बसलेल्या होत्याच .
प्रजेच्या असंतोषाचा फायदा घेउन शत्रु राष्ट्राने आक्रमण केले .
चौपट राजाचा पाडाव करून त्याला कठोर शासन करण्यात आले .
नवीन राजाने राज्यरोहणा नंतर लगेच स्वप्ने बघण्या वरची बंदी उठवली .
तो तर स्वत:च पुढाकार घेउन प्रजेला मोठमोठी स्वप्ने दाखवू लागला .
लवकरच सर्वकाही सुरळीत झाले .
दाहक वास्तवाची जाणीव कमी कमी होउ लागली .
प्रजा पुन्हा स्वप्नात तरंगू लागली .
नवीन राजानेच नव्हे तर त्याच्या घराण्यानेही चिरकाल सुखनैव राज्य केले .
( समाप्त )
प्रतिक्रिया
????????
खास जयनीत स्टाईलचे लिखांणं,
डोक्यावरून गेला
अप्रतीम
तो योगीराज हा शत्रुपक्षाचा
गणेशा ......
गणेशा ......
@-नवीन राजानेच नव्हे तर
मला काहीच म्हणजे काहीच्च कळलं नै.
काही कळले नाही किंवा अर्धवट