Skip to main content

कधी कधी स्वप्ने छान पडतात ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 10/10/2011 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी स्वप्ने छान पडतात हवी हवी अशी मस्त वाटतात स्वप्नात आपले वय दिसत नसते जसे स्वप्न तसे वय होऊन जाते कधी असतो आपण मस्त तरुण मन सुद्धा जाते गाणे गाऊन प्रेम सुद्धां अगदी छान जमून जाते प्रेमामध्ये मन हरवून जाते कशी मस्त मस्त ती दिसत असते अगदी हवी तशी वाटत असते रंगी बेरंगी फुलपाखरासारखी मनात कशी झुलत बसते ...? अशी स्वप्ने अशी स्वप्ने कशी अलगद अलगद येतात .? साखर झोपेत कशी गाणी गाऊन जातात अशी स्वप्न मोडू नये असे खूप वाटून जाते पण स्वप्नाना शेवट असतो हे खूप खरे असते तरीही काही स्वप्ने खूप काही देऊन जातात तुमचे मन टवटवीत नि सकाळ छान करून जातात ...!!
लेखनविषय:

वाचने 1595
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

कविता वाचुन फ्रेश झालो

ही कविता म्हणजे "साखरझोपेतलं स्वप्न!"

अशी स्वप्न मोडू नये असे खूप वाटून जाते पण स्वप्नाना शेवट असतो हे खूप खरे असते
आवडली!!

स्वप्न काव्य! आजच मला एक स्वप्न पडले. एका किल्यातल्या एका खोलीचे दार मी उघडतो तर त्यातून एक भुतासारखा माणूस बाहेर पडतो. तो खडकांवरून जातो. नंतर एका माणसाला तेच भुत स्पायडरमॅनसारख्या दोरांनी पुढे ओढते व त्या माणसाच्या दोन बुरखा घातलेल्या बायका त्याला वाचवण्यासाठी मागे ओढतात. नंतर मी उडी मारून ते दोर कापून टाकतो व तो माणूस वाचतो.