✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

'ज्ञानपीठा'साठी केवळ तीनच मराठी साहित्यिक पात्र?

द
दिपोटी यांनी
Sat, 10/08/2011 - 03:09  ·  लेख
लेख
कालच्या 'सकाळ' मध्ये कामिल पारखे यांच्या या लेखात 'ज्ञानपीठ' पारितोषिकाने सन्मानित होण्यात मराठी साहित्यिक मागे पडतो या वस्तुस्थितीबद्दल थोडे विचार व थोडासा उहापोह चांगल्या रीतीने मांडण्यात आला आहे. http://www.esakal.com/esakal/20111007/5255712661125493679.htm हाच विचार पुढे नेऊन 'या वस्तुस्थितीमागील कारणे' या विषयावर थोडी विस्तृत चर्चा व्हावी, काथ्याकूट व्हावा म्हणून हा धागा काढला आहे. 'सकाळ'मधील लेखाच्या लेखकाने मांडलेले मुद्दे योग्य आहेत. जर भारतातील अनेक भाषांपैकी मराठी (व बंगाली) भाषांतील साहित्य अधिक अभिजात, समृध्द व दर्जेदार मानले जाते तर याचे प्रतिबिंब 'ज्ञानपीठ' पारितोषिकाने सन्मानित झालेल्या-होणार्‍या साहित्यिकांच्या यादीत का बरे दिसत नाही? बंगाली साहित्यिकांच्याबाबतीत हे चित्र कसे काय आहे? विजय तेंडुलकर यांनी त्यांच्या 'आणि मी' या अत्यंत वाचनीय अशा लेखसंग्रहातील 'सन्मान, सम्मान इ.' या अत्यंत वाचनीय लेखात अशा पारितोषिक-पुरस्कार-सन्मानांसाठी प्रतिभा, दर्जेदार साहित्यनिर्मिती, या व अशा इतर आवश्यक निकषांबरोबरच 'पडद्यामागील हालचाली' हा निकष सुध्दा - अर्थात काही पुरस्कारांच्याबाबतीत - लागू पडतो असे लिहिल्याचे आठवते. माझ्या वैयक्तिक मते तर विजय तेंडुलकर, पुल देशपांडे, जयवंत दळवी, चिंत्र्यं खानोलकर ही मंडळी या मानदंडासाठी निश्चित पात्र आहेत / होती ('ज्ञानपीठ' पुरस्कार मरणोत्तर दिला जातो की नाही याबद्दल माहिती नाही). आपले काय मत आहे?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
27084 वाचन

💬 प्रतिसाद (108)

प्रतिक्रिया

गैरसमज माझा नव्हे आपला...

चेतन सुभाष गुगळे
Mon, 10/10/2011 - 15:55 नवीन
<< पण, ज्या शब्दात आपण आपला प्रतिसाद बांधाला आहे त्यावरून 'बहुसंख्यांच्या प्रवाहापेक्षाही माझे सूचविणे अधिक प्रभावी आहे' असा आपलाच गैरसमज झाल्याचे जाणवल्याने आपणास प्रतिसाद दिला आहे. >> माझ्या प्रतिसादातून माझा गैरसमज झाला आहे असा जो आपला गैरसमज झाला आहे त्याबद्दलचे हे स्पष्टीकरण:- नाही मला माझ्या त्या प्रतिसादातून असे सूचवायचे होते की श्री. कुलकर्णी ह्यांचा अभिप्राय निर्भीड व प्रांजळ असतो. त्यामुळे हे दोन्ही चित्रपट त्यांनी स्वत: पाहावे व आपला अभिप्राय मांडावा. तो मी मांडलेल्या अभिप्रायाच्या अनुकूल / प्रतिकूल कसाही असला तरी मी त्या अभिप्रायाचा निश्चित आदर करील. बाय द वे - आपल्या ज्येष्ठते विषयी पूर्ण आदर बाळगूनही असे म्हणतो की मी श्री. कुलकर्णी यांना काही सूचविले असेल तर ते कुठल्या तरी गैरसमजाने असा जो आपण तर्क बांधलात आणि इथे मांडलात तो माझ्या व श्री. कुलकर्णी यांच्या संवादात शिरून आपण केलेला एक प्रकारे औचित्यभंग ठरतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

औचित्यभंग?!

दिपोटी
Mon, 10/10/2011 - 16:37 नवीन
... असा जो आपण तर्क बांधलात आणि इथे मांडलात तो माझ्या व श्री. कुलकर्णी यांच्या संवादात शिरून आपण केलेला एक प्रकारे औचित्यभंग ठरतो
बाप रे बाप!! औचित्यभंग ?!! श्रीयुत गुगळे, या व अशा संस्थळावरील एखाद्या खुल्या धाग्यावर दिलेल्या आपल्या खुल्या प्रतिसादाला इतर कोणीही तसाच खुला प्रतिसाद दिला तर तो औचित्यभंग ठरत नाही किंवा यात गैर काहीही नाही. आपण सर्व या संस्थळावर येतो व प्रतिसाद देतो ते चर्चेत सहभागी होण्यासाठी येतो. खुल्या धाग्यावर खुली चर्चा होते - येथे खाजगी संवाद (वा खाजगी इतर काहीही) नाही. कोणाचाही कोणताही प्रतिसाद हा कोणालाही उलटा प्रतिसाद देण्यासाठी मोकळा आहे. खाजगी संवादासाठी व्यनिची सोय आहे हे लक्षात ठेवल्यास सर्वांनाच बरे. - दिपोटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

धन्यवाद..

प्रभाकर पेठकर
Mon, 10/10/2011 - 16:41 नवीन
धन्यवाद श्री.दिपोटीसाहेब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपोटी

आणखी एक मुद्दा ...

दिपोटी
Mon, 10/10/2011 - 16:52 नवीन
श्रीयुत गुगळे, बाय द वे - एक मैत्रीपूर्वक सल्ला ... श्रीयुत प्रभाकर पेठकर यांना उद्देशून लिहिलेला 'औचित्यभंगा'चा प्रस्ताव आपणच मागे घेतल्यास बरे नपेक्षा प्रतिसादांची ही जी वरील विशिष्ठ फांदी प्रभाकर पेठकर व यशवंत एकनाथ यांच्या प्रतिसादाने सुरु झाली आहे, या त्यांच्या संवादात शिरुन आपण दिलेला आपला या फांदीवरील पहिला प्रतिसाद हा मग आपल्या व्याख्येनुसार (मात्र माझ्या व्याख्येनुसार निश्चितच नाही) आपण केलेला एक प्रकारे औचित्यभंग ठरतो ... काय म्हणता? - दिपोटी खुद के साथ बातां : धागा भरकटला आहेच, तो परत कसा आणावे बरे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

औचित्यभंग?

चेतन सुभाष गुगळे
Mon, 10/10/2011 - 17:14 नवीन
<< प्रतिसादांची ही जी वरील विशिष्ठ फांदी प्रभाकर पेठकर व यशवंत एकनाथ यांच्या प्रतिसादाने सुरु झाली आहे, या त्यांच्या संवादात शिरुन आपण दिलेला आपला या फांदीवरील पहिला प्रतिसाद हा मग आपल्या व्याख्येनुसार (मात्र माझ्या व्याख्येनुसार निश्चितच नाही) आपण केलेला एक प्रकारे औचित्यभंग ठरतो ... काय म्हणता? >> तसं अजिबात म्हणता येणार नाही कारण अर्धसत्य विषयी मी जी काही मतं मांडली होती त्याविषयी श्री. पेठकर यांनी आपल्या प्रतिसादातील १ ल्या परिच्छेदात काही मुद्दे मांडले होते. त्यांना उत्तर देणे मला क्रमप्राप्त होते. श्री. कुलकर्णी यांनी त्यांच्या २ र्‍या परिच्छेदा विषयी सहमती दर्शविली होती. मी त्या संदर्भात संवादात शिरलोच नाही. श्री. कुलकर्णी यांनी अर्धसत्य पाहिला नव्हता व श्री. पेठकर यांनी त्यांना तो पाहा असे सूचविले होते. श्री. कुलकर्णी यांना संदर्भाकरिता मी कमला व अर्धसत्य च्या लिंक दिल्या हा औचित्यभंग ठरत नाही. << खुद के साथ बातां : धागा भरकटला आहेच, तो परत कसा आणावे बरे ? >> आधी तुम्ही मला सूचविलेत की इथे खासगी काही नसते. खासगी हवे असेल तर व्य नि करावा. इथे तुम्ही स्वत:शी साधलेला संवाद टंकलाय तेव्हा त्याबद्दल मी काही अभिप्राय व्यक्त केल्यास तो तुमच्या व्याख्येनुसार औचित्यभंग ठरणार नाही असे समजून लिहीत आहे. धागा भरकटला आहेच पण तो नेमका http://www.misalpav.com/node/19366#comment-345143 या प्रतिसादामुळे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपोटी

हम्म !

दिपोटी
Mon, 10/10/2011 - 17:35 नवीन
श्रीयुत गुगळे, __/\__ प्रभाकर पेठकर व यशवंत एकनाथ यांच्या संवादात आपण शिरणे हे (आपल्या काही कारणांमुळे) आपल्याला 'क्रमप्राप्त' ठरते तर यशवंत एकनाथ व आपण यांच्या संवादात श्री पेठकर यांनी शिरणे हा (त्यांची काहीही कारणे असली तरी) एकदम त्यांनी केलेला 'औचित्यभंग' ठरतो. हम्म ... वैयक्तिक सोयीनुसार व्याख्या बदलतात असे दिसते! - दिपोटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

विषय आपण अधिकच भरकटवताय...

चेतन सुभाष गुगळे
Mon, 10/10/2011 - 17:57 नवीन
मी माझ्या प्रतिसादातील मुद्यांना उत्तर दिले आणि संदर्भाकरिता माहिती (चित्रपटांचे दुवे) पुरविली याला आपण औचित्यभंग म्हणताय. ज्यात मी कुठेही श्री. कुलकर्णी व श्री. पेठकर यांच्या संवादात शिरलो नव्हतो. याउलट श्री. पेठकर यांनी मी श्री. कुलकर्णी यांना मला स्वत:ला सोयीस्कर असा अभिप्राय मांडण्यास सूचवितो आहे असा आरोप माझ्यावर केला होता. असा आरोप एकवेळ श्री. कुलकर्णी त्यांना वाटल्यास करू शकतात. परंतू असा आरोप श्री. पेठकर यांनी माझेवर करणे यास मी औचित्यभंग म्हंटले होते. इथूनच धागा अवांतर भरकटला. खरे तर आपण मूळ धागा लेखक असल्याने आपण हा अवांतर प्रकार ताणायला नकोय. तसेही आपल्या << माझ्या वैयक्तिक मते तर विजय तेंडुलकर, पुल देशपांडे, जयवंत दळवी, चिंत्र्यं खानोलकर ही मंडळी या मानदंडासाठी निश्चित पात्र आहेत / होती ('ज्ञानपीठ' पुरस्कार मरणोत्तर दिला जातो की नाही याबद्दल माहिती नाही). आपले काय मत आहे?>> धाग्यात हा प्रश्न असूनही मी जेव्हा या प्रश्नातील दोन पर्यायांकरिता नकारात्मक उत्तर दिलं ते आपणांस रूचलं नाही. माझ्या त्या प्रश्नाच्या उत्तराला आपण << पुरस्काराला कोण पात्र वाटते यावर दहा जणांना विचारले असता अकरा मते मिळू शकतील ... प्रत्येकाचे वाचन व प्रत्येकाचा व्यासंग निराळा असतो. मला पात्र वाटणारे साहित्यिक इतरांना वाटतील असे जरुरी नाही. तेव्हा 'कोण पात्र आहे' हा मुद्दा या धाग्यासाठी (पूर्ण गौण नसला तरी) तसा दुय्यम आहे. >> असं उत्तर दिलंत. जर आपल्याला हा मुद्दा खरंच गौण वाटत होता तर आपण मूळ धाग्यात नावं सूचविलीच नसतीत तर इतका वादविवाद झडलाच नसता. कारण सूचविलेल्या नावांचे समर्थन करणारे असतात तसे त्यांचा विरोध करणारे ही असणारच की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपोटी

युध्दविराम ...

दिपोटी
Mon, 10/10/2011 - 18:53 नवीन
मी आपल्या (व इतर कोणाच्याही प्रतिसादाला) औचित्यभंग मानलेले नाही, तर आपणच श्री पेठकरांच्या प्रतिसादाला 'औचित्यभंग' म्हणण्यात (व स्वतःच्या प्रतिसादाला मात्र 'क्रमप्राप्त' म्हणण्यात) असलेली विसंगती दाखवली आहे. पेठकरांच्या (वा कोणाच्याही या व अशा खुल्या संस्थळांवरील खुल्या व सभ्य भाषेतल्या) प्रतिसादाला 'औचित्यभंग' म्हणणे निश्चितच खटकण्याजोगे आहे व म्हणूनच हा प्रकार (अवांतर असूनही) ताणला गेला. माझ्या या प्रतिसादाला आपण प्रतिसाद दिला नाही तेव्हा आपली याला अनुमती आहे असे समजतो. असो. नाही म्हणालो तरी धाग्याचे थोडेफार धिरडे झाले आहेच. आतापर्यंतच्या प्रतिसादांबद्दल तरीही धन्यवाद. आपण सर्वांनीच थोडा संयम राखून व किंचित थोडासा विश्राम घेऊन इतरही नवीन प्रतिसादकर्त्यांना प्रतिसादाची संधी दिली तर थोडे नवीन विचार येण्याची शक्यता आहे नाहीतर तेच ते चर्वितचर्वण होण्याचा संभव अधिक आहे. 'सूचवलेल्या नावांचे समर्थन करणारे असतात तसेच विरोधही करणारे असतात' हा आपला मुद्दा मात्र पटला. असे असायला निश्चितच हवे. मात्र वर माझ्या काही प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे ''ज्ञानपीठ' पुरस्कारास पात्र अशी नावे सूचवा' असा धाग्याचा मुख्य विषय नसून 'मराठी भाषेला आजपावेतो तीन पुरस्कार लाभले ते या भाषेतील - आपल्या मायबोलीतील - साहित्याच्या गुणवत्तेच्या प्रमाणात / प्रमाणाहून कमी / प्रमाणाहून जास्त लाभले का' आणि त्या अनुषंगाने 'या पुरस्काराच्या निवड-प्रक्रियेत lobbying सारखे (नकारात्मक अर्थाने) प्रकार घडतात का' अशा दोन मुख्य विषयांवर साधक-बाधक चर्चा अपेक्षित होती. अर्थात काही प्रतिसाद या दिशेने वळले परंतु एकंदरीत हा धागा मात्र या पुरस्कारास पात्र/अपात्र अशा वैयक्तिक नावांमध्येच गुरफटून अडकला. (या धाग्यातील अखेरीस माझा प्रश्न 'आपले मत काय आहे' हा मी माझी वैयक्तिक मते म्हणून फक्त उदाहरणार्थ सुचवलेल्या नावांच्या नंतर लगेच न टाकता एका स्वतंत्र ओळीत दिला असता तर हा प्रश्न संपूर्ण धाग्यासाठी आहे - व फक्त पात्र नावे सूचवण्यासाठी नाही - हे कदाचित अधिक स्पष्ट झाले असते. असो.) - दिपोटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

नाही

चेतन सुभाष गुगळे
Mon, 10/10/2011 - 20:33 नवीन
<< माझ्या या (http://www.misalpav.com/node/19366#comment-345350) प्रतिसादाला आपण प्रतिसाद दिला नाही तेव्हा आपली याला अनुमती आहे असे समजतो. >> नाही, मी आपल्या उपरोक्त प्रतिसादाशी अजिबात सहमत नाही. परंतू श्री. पेठकर यांनी स्वतःच हा विषय संपविला असताना त्यावर आता तुम्ही आणि मी चर्चा करावी असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपोटी

माघार....

प्रभाकर पेठकर
Mon, 10/10/2011 - 18:11 नवीन
श्री. दिपोटी साहेब, माझ्या प्रत्येक प्रतिसादाला कारण आहे. उगाचच विषय भरकटवण्यासाठी किंवा एखाद्याला भडकवण्यासाठी कुठलेच प्रतिसाद दिलेले नाहीत. तरी पण, विषय भरकटण्यात अनवधानाने माझा हातभार लागला आहेच. माझे सर्व प्रतिसाद उडविले तरीही हरकत नाही. आपण संपादक मंडळास तशी विनंती करावी. किंवा ह्या प्रतिसादाद्वारे हिच माझी विनंती समजून संपादक मंडळाने योग्य ती कारवाई करावी. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपोटी

साहेब?

दिपोटी
Mon, 10/10/2011 - 18:59 नवीन
श्री पेठकर, 'साहेब' वगैरे म्हणू नका हो ... आपण सगळे या संस्थळावर मित्रच आहोत. मला वाटते विषय भरकटवण्यासाठी माझ्यासकट व इतरांसकट आपल्या सगळ्यांचाच हातभार लागला आहे, तेव्हा आपण माघार घ्यायची काहीही गरज नाही आहे. - दिपोटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

धन्यवाद.

प्रभाकर पेठकर
Mon, 10/10/2011 - 20:56 नवीन
धन्यवाद श्री. दिपोटी. पण आता ह्या चर्चेतून काही निष्पन्न होईलसे दिसत नाही. त्यामुळे इतरांचा ह्या वादविवादात वेळ जाऊ नये आणि मुख्य मुद्द्यावर चर्चा व्हावी अशी इच्छा आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपोटी

शिरवाडकर आणि खांडेकर हे

आशु जोग
Sun, 10/09/2011 - 00:53 नवीन
शिरवाडकर आणि खांडेकर हे निश्चित 'ज्ञानपीठ' च्या योग्यतेचे होते. पण करंदीकरांच्याबद्दल काय बोलावे "देणार्‍याने देत जावे" आणि "सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते" याच्या पलिकडे कुणी माहिती दिली तर बरे होइल
  • Log in or register to post comments

अरे माझ्या कर्मा !!!!

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 10/09/2011 - 11:30 नवीन
अरे माझ्या कर्मा !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

योग्य निर्णय!

पिवळा डांबिस
Sun, 10/09/2011 - 11:22 नवीन
खांडेकर, शिरवाडकर, आणि करंदीकर हे निश्चितच ज्ञानपीठ मिळविण्याच्या योग्यतेचे साहित्यिक होते.... लेखकाने सुचविलेल्या साहित्यिकांबद्दल काय म्हणू? तो लहान तोंडी मोठा घास ठरायचा! इतकेच म्हणतो की जर मी निवड समितीवर असतो तर त्यांची निवड केली नसती.... ज्ञानपीठ पुरस्कार मरणोत्तर दिले जातात की नाही ते माहिती नाही पण असते तर मी न. र. फाटक, इरावती कर्वे आणि बहिणाबाई चौधरी यांची निवड केली असती.....
  • Log in or register to post comments

आकडेवारी

पैसा
Sun, 10/09/2011 - 11:46 नवीन
विकि वरच्या माहितीप्रमाणे आतापर्यंतच्या ४५ वर्षात एकूण २२ राजभाषांपैकी फक्त १० भाषांमधे हा पुरस्कार दिला गेला आहे. हे पाहता मराठीत ३ ही संख्या कमी वाटू नये. आणखी अनेक कवी, लेखकाना हा पुरस्कार मिळायला हवा होता हेही खरंच पण तसाच दावा इतर भाषिकही करतील काही लेखक -कवी एकापेक्षा अधिक भाषांमधे लेखन करतात. उदा. कै. बा.भ. बोरकर. पण त्यानाही लायक असून हा पुरस्कार मिळाला नाही. मरणोत्तर पुरस्कार द्यायची प्रथा नाही, नाहीतर पार ४००/५०० वर्षापूर्वीच्या कवी लेखकानासुद्धा हा पुरस्कार द्यावा लागेल!
  • Log in or register to post comments

अरेरे!

पिवळा डांबिस
Sun, 10/09/2011 - 11:55 नवीन
मरणोत्तर पुरस्कार द्यायची प्रथा नाही, अरेरे! म्हणजे 'हाजिर तो वजीर' असा प्रकार आहे म्हणायचा.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हाजिर तो वजीर!

पैसा
Sun, 10/09/2011 - 12:00 नवीन
नाहीतर मेल्या म्हशीला मणभर दूध आहेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

नाहीतर मेल्या म्हशीला मणभर

यकु
Sun, 10/09/2011 - 15:00 नवीन
नाहीतर मेल्या म्हशीला मणभर दूध आहेच!
ते म्हैस कोकणातली की घाटावरची यावर अवलंबून आहे ;-) पण 'या' म्हशींच्या बाबतीत कोकणातल्याच म्हशींना जास्त दुध असते असे उलटे निरिक्षण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ते म्हैस कोकणातली की घाटावरची

llपुण्याचे पेशवेll
Tue, 10/11/2011 - 12:22 नवीन
ते म्हैस कोकणातली की घाटावरची यावर अवलंबून आहे पण 'या' म्हशींच्या बाबतीत कोकणातल्याच म्हशींना जास्त दुध असते असे उलटे निरिक्षण आहे. हा हा हा. सॉलिड निरीक्षण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

''कालाय तस्मय नमः'' मी तर भगत

निनाद मुक्काम …
Sun, 10/09/2011 - 13:08 नवीन
''कालाय तस्मय नमः'' मी तर भगत साहेबांना कधी हा पुरस्कार मिळतोय ह्याची वाट पाहत आहे . हे आडनाव आपल्या मराठीत सुद्धा आहे .त्यामुळे तेवढेच समाधान
  • Log in or register to post comments

चेतन भगत सारख्या सुमार

वपाडाव
Mon, 10/10/2011 - 14:59 नवीन
चेतन भगत सारख्या सुमार दर्जाच्या तद्दन फिल्मी वाटाव्या अशा कथा लिहिणार्‍या माणसाला जर ज्ञानपीठ पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा आपण करत असाल तर आपला ती$$$$$$$व्र निषेध..............
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

सहमत +

चिरोटा
Sun, 10/09/2011 - 14:00 नवीन
डॉक्टरांशी सहमत.
आपण intense lobbying होत असल्याचे सुध्दा मान्य करता. असे lobbying होत असेल व त्यामुळे मराठीच नव्हे तर इतर भाषिक साहित्यिकांवर देखील हा अन्यायच आहे.
Lobbying मध्ये काही गैर आहे असे वाटत नाही. सर्व प्रकारच्या नोबेल पुरस्कारासाठीही lobbying होते.प्रश्न एवढाच की ज्याला ज्ञानपीठ दिले जाते ती व्यक्ती लायक आहे की नाही. समजा आपण निवड समीतीत आहोत आणि आपल्याकडे चार भाषांतील लेखकांची यादी आली तर कोणाची निवड करु ? १)ज्याच्या लेखनात्/काव्यात विविधता/कल्पकता/नाविन्य आहे. २) ज्याचे लेखन समाजाच्या विविध थरांत वाचले गेले आहे. ३)ज्याचे पुस्तक्/पुस्तके विद्यापीठांत संदर्भग्रंथ म्हणून वापरली जातात. ४)भारताबाहेरही त्याच्या लिखाणाची चर्चा होते. ५) ज्याचे थोडेफार लिखाण ईतर भारतिय भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. सध्या किती मराठी लेखक्/कवींची नावे अशी घेता येतील? कोणी सांगु शकेल का? हे सर्व असेल तर lobbying करणे ही पुढची गोष्ट. समजा ह्या चार लेखकांतून दोन पात्र ठरले तर कोणाची निवड करायची?समितीवर एकाहून अधिक सदस्य असल्याने एका अमुक भाषेला डावलले जात असेल असे वाटत नाही.सध्याची निवड समिती बघितलीत तर त्यात एकही कन्नड सदस्य नाही.
  • Log in or register to post comments

गुणवत्ता हा एकच निकष

दिपोटी
Sun, 10/09/2011 - 14:33 नवीन
Lobbying मध्ये काही गैर आहे असे वाटत नाही. सर्व प्रकारच्या नोबेल पुरस्कारासाठीही lobbying होते.
जेव्हा आपण एखादी सिस्टीम सुधारण्याचा वा आदर्श बनवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्यातील गैर बाबी काढून टाकणे हा उद्देश असतो. आता नोबेल वा इतर कोणत्याही पुरस्कारासाठी lobbying होते ही वस्तुस्थिती असली तरी ही वस्तुस्थिती अशा lobbying चे इतरत्र समर्थन करण्यासाठी वापरता येत नाही ... जो गलत है सो गलत है ... कारण शेवटी ही वस्तुस्थिती ही केवळ एखाद्या आदर्श सिस्टीम मधील विसंगती (नाईलाज / तडजोड / fault) म्हणून मानावी-स्वीकारावी लागेल व जेव्हा व जेवढे जमेल तेव्हा व तेवढ्या स्वरुपात ही विसंगती काढून टाकण्याचाच प्रयत्न झाला पाहिजे. असे पुरस्कार विजेते ठरवताना गुणवत्ता हा केवळ एकच निकष मानला पाहिजे. याबरोबरच 'पडद्यामागील हालचाली करण्याची क्षमता' हादेखील निकष असेल, तर गुणवत्तेचा निकष पिछाडीस पडण्याचा धोका संभवतो. उदाहरणार्थ, पंजाबी भाषेतील एखाद्या लेखकाने साहित्याला उत्तम योगदान दिले असेल पण त्याच्याकडे lobbying करण्याची इच्छा वा क्षमता वा दोन्ही नसेल तर त्याचा त्याला हा पुरस्कार मिळण्याच्या शक्यतेवर अजिबात - अगदी थोड्या अंशाने सुध्दा - परिणाम होता कामा नये. अगदी याच कारणामुळे 'ज्ञानपीठ' पुरस्काराच्या पात्रतेसाठी (आपल्याच वरील एका प्रतिसादात नमूद केल्याप्रमाणे) कोणत्याही भारतीय भाषेवर असलेले ३ वर्षांचे बंधन सुध्दा कृत्रिम व म्हणून अर्थहीन वाटते. गुणवत्ता - व केवळ गुणवत्ता - हा एकच निकष मानला तर एखाद्या भाषेतील दहा साहित्यिक इतर भाषांतील साहित्यिकांच्या तुलनेत उजवे ठरले तर त्या सर्वांना सलग दहा वर्षात हा पुरस्कार देणे यात तात्विक दृष्ट्या काहीही गैर नाही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

लॉबिंग

चिरोटा
Mon, 10/10/2011 - 11:27 नवीन
Lobbying चांगल्या अर्थाने अपेक्षित आहे. आधिचे विजेते बघितलेत तर सर्वजण ज्ञानपीठ मिळवण्याच्या तोडीचे आहेत हे दिसून येईल.एखादा लेखक लोकांना ज्ञानपीठपात्र वाटत असेल तर लोकांना निवडसमीतीच्या तसे निदर्शानास आणून दाखवावे लागेल. विदा गोळाकरुन्/समाजातील ईतर लेखकांकडून्,विद्यापीठांकडून्,समी़क्षकांकडून वगैरे... मराठी वा बंगाली लेखकांना ज्ञानपीठ मिळत नाही तेव्हा हे असे lobbying होते नसावे किंवा ईतर भाषिक लेखकांचे लॉबिंग मोठ्या प्रमाणावर होते असावे किंवा आधि चर्चिलेली शक्यता- somebody else is more capable then them.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपोटी

लॉबिंग

दिपोटी
Mon, 10/10/2011 - 14:55 नवीन
'लॉबिंग'च्या अर्थाबाबत थोडी संदिग्धता येऊ शकते, ती आधी दूर करुया. 'लॉबिंग'चा अर्थ - निदान माझ्या माहितीप्रमाणे तरी - सर्वसाधारणपणे नकारात्मक घेतला जातो. दुसर्‍या शब्दात सांगायचे झाले तर : (श्री गुगळे यांच्या वरील एका प्रतिसादातील आयती तयार यादी घेऊन) "जात, धर्म, लिंग, वय, प्रादेशिकता, भाषा, वैयक्तिक संबंध (चांगले अथवा वाईट), आर्थिक अथवा शारिरीक प्रलोभन अशा ( थोडक्यात म्हणजे एखाद्या साहित्यिकाच्या साहित्याच्या गुणवत्तेशी अजिबात निगडीत नसलेल्या अशा) भलत्याच निकषांच्या जोरावर त्या साहित्यिकाचे नाव त्याच साहित्यिकाने स्वतः किंवा दुसर्‍या एखाद्या व्यक्तीने पुढे वा मागे ढकलणे" म्हणजे lobbying असा अर्थ मी गृहित धरतो. या नकारात्मक अर्थाचे lobbying होत असेल तर अर्थातच हा (कोणत्याही भाषेतील) इतर साहित्यिकांवर अन्याय आहे हे तरी आपल्याला मान्य व्हावे. हे असे होते का हे निश्चितपणे माहित नाही व तेच शोधण्यासाठी हा प्रपंच. अर्थात असे होत नसेल तर मग प्रश्नच मिटला. 'लॉबिंग'चा वर चिरोटा व चेतन सुभाष गुगळे यांनी लावलेला अर्थ मात्र सकारात्मक आहे. 'एखाद्या साहित्यिकाच्या साहित्याच्या गुणवत्तेच्या जोरावर त्या साहित्यिकाला समर्थन वा विरोध करणे' ... याला मी तरी justification असा सकारात्मक प्रतिशब्द वापरीन. कोणता शब्द वापरावा हा शेवटी फक्त terminology अथवा convention चा भाग आहे, तेव्हा निदान यात तरी खोलात शिरण्याची गरज नाही. कोणताही प्रतिशब्द वापरला तरी असा सकारात्मक प्रचार होणे यात काही गैर दिसत नाही. आता प्रश्न शेवटी असा उरतो की जर 'ज्ञानपीठ' (किंवा इतर कोणत्याही) पुरस्कारासाठी lobbying होत असेल तर ते वरील सकारात्मक ('justification' या) अर्थाने की नकारात्मक ('fielding लावणे' या) अर्थाने? - दिपोटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

वरील प्रतिसादांपैकी श्री.

गवि
Mon, 10/10/2011 - 11:38 नवीन
वरील प्रतिसादांपैकी श्री. गुगळे यांचे प्रथमपासूनचे म्हणणे विषयाला सोडून किंवा भरकटलेलं मुळीच वाटलं नाही. उलट जशी चर्चा व्हायला हवी तशीच त्यांनी केली आहे असं वाटतं. बाकी त्यांच्या मतावर मतमतांतरे होऊ शकतीलच. पु.लं.च्या विषयी: त्यांना ज्ञानपीठ देण्याने काही खास फरक पडेलसे वाटत नाही. जितक्या लोकांच्या मनात ते जिव्हाळ्याच्या ठिकाणी आहेत आणि त्यांना वाचत जितके लोक मोठे झाले आहेत ते पाहून ज्ञानपीठही छोटे ठरावे.
  • Log in or register to post comments

पाठिंब्या बद्दल आभारी आहे

चेतन सुभाष गुगळे
Mon, 10/10/2011 - 12:12 नवीन
धन्यवाद गवि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

तुमच्या दळवी किंवा "तें"

गवि
Mon, 10/10/2011 - 13:41 नवीन
तुमच्या दळवी किंवा "तें" विषयींच्या प्रतिकूल मताला मी पाठिंबा देत नसून तुम्ही जे मुद्दे मांडलेत आणि ज्या पद्धतीने मांडलेत ते अत्यंत वैध असून चर्चा करताना जे अपेक्षित असते तसेच आहेत आणि त्यात मूळ चर्चेला / मुद्द्याला / विषयाला सोडून काही भरकटलेले नाही असं माझं म्हणणं आहे. शिवाय चर्चा म्हटली की काही नवीन मुद्देही येणारच. तुम्ही मांडलेला अँगल मुद्दाम विरोधी म्हणून मांडलेला आहे असं वाटत नाही. त्यात सुस्पष्टपणा असल्याने ते तुमचं प्रामाणिक मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

मला मान्य आहे.

चेतन सुभाष गुगळे
Mon, 10/10/2011 - 14:53 नवीन
<< तुमच्या दळवी किंवा "तें" विषयींच्या प्रतिकूल मताला मी पाठिंबा देत नसून .......सुस्पष्टपणा असल्याने ते तुमचं प्रामाणिक मत आहे. >> होय. हे मी समजून घेतले होतेच. मुख्य म्हणजे मी वर स्पष्टीकरणात मांडलेल्या बी. आर. चोप्रा व गिरीश कर्नाड यांच्या उदाहरणाशी सुसंगत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

पु ल

साधामाणूस
Mon, 10/10/2011 - 18:59 नवीन
पु.लं.च्या विषयी: त्यांना ज्ञानपीठ देण्याने काही खास फरक पडेलसे वाटत नाही. जितक्या लोकांच्या मनात ते जिव्हाळ्याच्या ठिकाणी आहेत आणि त्यांना वाचत जितके लोक मोठे झाले आहेत ते पाहून ज्ञानपीठही छोटे ठरावे. - गवि साहेब अगदी एक नंबर बोललात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मि पा वरुन

कुंदन
Mon, 10/10/2011 - 16:15 नवीन
मि पा वरुन काही नॉमिनेशन्स पाठवावीत का ?
  • Log in or register to post comments

बीसी

चिरोटा
Mon, 10/10/2011 - 16:31 नवीन
बिसीबेळेभात डॉट कॉम आणि दाल रोटी डॉट कॉम वरून निवडसमीतीच्या सदस्यांना दर रविवारी मिठाई,गुलाबगुच्छ पाठवले जातात असे ऐकून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

चांगली चर्चा

चित्रा
Mon, 10/10/2011 - 19:08 नवीन
उत्तम चर्चाविषय. तूर्त जर यामागे थोडे फार काही लॉबी करून होत असले तर ते बाजूला ठेवावे. कारण ते थोडेफार होत जरी असले तरी निवड ही चांगल्याच साहित्यिकांची झाली आहे असे दिसते. माझ्या मते या अशा सन्मानास पात्रतेसाठी एक प्रमाण 'बरेचसे साहित्य कालातीत असावे' असे असावे. काही साहित्य आणि त्याहीपेक्षा साहित्यिक आपल्याला आवडत असले, तरी त्यांचे सर्व साहित्य कालातीत असते असे मला वाटत नाही.
  • Log in or register to post comments

एक माहिती सर्वांसाठी पु. ल.

आशु जोग
Mon, 10/10/2011 - 23:00 नवीन
एक माहिती सर्वांसाठी पु. ल. देशपांडे यांची निवड ज्ञानपीठासाठी होण्याचे घाटत होते. परंतु त्यांच्या साहित्याचे इंग्रजीमधे भाषांतर करणारा कुणी भेटला नाही म्हणजे मराठी टू इंग्रजी. त्यामुळे त्यांचे नाव मागे पडले. अन्यथा त्यांचा दर्जा नि:संशय ज्ञानपीठचा होता
  • Log in or register to post comments

मोलाची आणि नवीन माहिती

चेतन सुभाष गुगळे
Mon, 10/10/2011 - 23:30 नवीन
ही माहिती निदान माझ्याकरिता तरी नवीन आणि अतिशय मोलाची आहे. म्हणजे आपण कल्पनाही करू शकणार नाही अशीही काही कारणे असतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. इथे मांडल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

परंतु त्यांच्या साहित्याचे

गवि
Tue, 10/11/2011 - 10:49 नवीन
परंतु त्यांच्या साहित्याचे इंग्रजीमधे भाषांतर करणारा कुणी भेटला नाही म्हणजे मराठी टू इंग्रजी. बरोबर आहे. "पुढचे दोन तास मी एका हातात घरची वीट आणि दुसर्‍या हातात बाजारची वीट घेऊन त्याच्यामागे त्याचं घर बघत फिरत होतो. एखाद्या गोष्टीचा अतिशय कंटाळा येणे याला वीट येणे का म्हणतात ते मला त्यादिवशी कळलं." कसं करणार भाषांतर..??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

ह्या वरुन एक आठवले. स्वतः

मराठी_माणूस
Tue, 10/11/2011 - 11:21 नवीन
ह्या वरुन एक आठवले. स्वतः पुलंनी त्यांच्या एका लेखात "पाश्चात्यांना खरकटं म्हणजे काय हे कसे समजावणार " असे म्हटले होते. लेफ्टओव्हर वगैरे ठीक आहे , पण खरकटे म्हणल्यावर जो अर्थ ध्वनीत होतो तो कसा काय समजावणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अगदी अगदी..आणि त्यातही नुसते

गवि
Tue, 10/11/2011 - 11:39 नवीन
अगदी अगदी.. आणि त्यातही नुसते लेफ्टओव्हर म्हणजे खरकटे नव्हे. अमुक पदार्थ ताजा, न उष्टावलेला असला तरी त्याचा स्पर्श झालेला हात खरकटा होतो. काही पदार्थांच्या बाबतीत तसं नाही... असंही काहीतरी त्यात आहे... सरळसोट नॅरेटिव्ह कथा कादंबर्‍यांची भाषांतरं त्यातल्यात्यात बरी होतात. पण भाषेवरच (भाषासौंदर्यावरच) आधारित साहित्याचं भाषांतर केलं तरी ते वाचणार्‍याला त्यातली छटा कळणार नाही आणि मोठा पुरस्कार देणाइतकं योग्य ते वाटणारही नाही. बापू काणे सेक्रेटरी जेव्हा म्हणतो "सुशी मेक्स फस्क्लास झुणका" ..... हे वाक्य तर सरळ इंग्रजीतच आहे.. पण त्यामागच्या भावनेला जे संदर्भ लागतात ते कुठून येणार इंग्रजीत? शिवाय पुलं फ्रान्सविषयी एकदा म्हणाले होते की "त्यांची ती द्राक्षसंस्कृती आणि आपली रुद्राक्षसंस्कृती" किंवा आमच्याकडे सर्वजण देशपांडे आहेत आणि ही (सुनिताबाई) तेवढी उपदेशपांडे आहे.. अहो कोट्यांवरच ज्याचा सगळा भार आहे ते भाषांतरित नाहीच होऊ शकत. चिंवि जोशींबाबतही मला वाटतं हेच होईल. मराठीच फार थोर आहे म्हणून नव्हे.. उलट बाजूने इंग्रजीतल्या भाषिक खाचाखोचा मराठी भाषांतरात तरी कशा आणणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

चांगला मुद्दा मांडलात. पण

मराठी_माणूस
Tue, 10/11/2011 - 12:23 नवीन
चांगला मुद्दा मांडलात. पण भाषेवरच (भाषासौंदर्यावरच) आधारित साहित्याचं भाषांतर केलं तरी ते वाचणार्‍याला त्यातली छटा कळणार नाही आणि मोठा पुरस्कार देणाइतकं योग्य ते वाटणारही नाही. "ती फुलराणी" हे भाषाविषय असलेल्या नाटकाचे भाषांतर असुन देखील त्याचा तेव्हढाच आनंद मिळतो हाच पुलंच्या असामान्य प्रतीभेचा अविष्कार .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

>>"ती फुलराणी" हे भाषाविषय

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 10/11/2011 - 14:25 नवीन
>>"ती फुलराणी" हे भाषाविषय असलेल्या नाटकाचे भाषांतर असुन देखील त्याचा तेव्हढाच आनंद मिळतो हाच पुलंच्या असामान्य प्रतीभेचा अविष्कार . ते भाषांतर नसून रुपांतर आहे. उर्वरित वाक्याशी सहमत. अवांतर :- काही तरी गंडले आहे. मी प्रतिसाद देण्याआधीच जे प्रतिसाद इथे होते, ते माझ्या प्रतिसादाचे उपप्रतिसाद म्हणून दिसत आहेत. तरीही मी हा प्रतिसाद संपादित पण करू शकलो. काहीतर गडबड आहे. मिपाच्या तांत्रिक मंडळाने इथे लक्ष द्यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

धन्यवाद. रुपांतर ह शब्दच

मराठी_माणूस
Tue, 10/11/2011 - 14:44 नवीन
धन्यवाद. रुपांतर ह शब्दच योग्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

मध्यंतरी मिपावरच

llपुण्याचे पेशवेll
Tue, 10/11/2011 - 12:25 नवीन
मध्यंतरी मिपावरच तेंडुलकरांच्या घाशीरामची पोर्टेबिलीटी कमी असल्याबद्द्लची चर्चा वाचली होती. म्हणजे त्यातली प्रवृत्ती सर्वत्र असेलही पण हे श्राद्ध, कोतवाली इ. भाषिक संदर्भ परकीय भाषांमधे कसे न्यायचे याबद्द्लची चर्चा होती. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

भाषिक खाचाखोचा

आबा
Tue, 10/11/2011 - 17:01 नवीन
या ब्लॉग वर मी चांगलं भाषांतर वाचलं. gauravsabnis.blogspot.com/2009/02/travel-preparations-from-apurvai-by-pl.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

ताज्या बातमीनुसार, चंद्रशेखर

वपाडाव
Tue, 10/11/2011 - 13:54 नवीन
ताज्या बातमीनुसार, चंद्रशेखर कंबरा यांना ह्या वर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे असे वाचण्यात आले आहे..... http://in.news.yahoo.com/blogs/thewatercooler/magic-kambara-writing-100727035.html
  • Log in or register to post comments

अहो

चिरोटा
Tue, 10/11/2011 - 17:59 नवीन
शिळी बातमी आहे ती वपा.! ज्ञानपीठ देताना हिंदी/कन्नडवाल्यांना प्राधान्य मिळते म्हणूनच तर हा धागा काढलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

कन्नडमधे कितीतरी ज्ञानपीठ

आशु जोग
Wed, 10/12/2011 - 01:32 नवीन
कन्नडमधे कितीतरी ज्ञानपीठ विजेते होउन गेले पण त्या लोकांचे एकच दु:ख आहे. तिकडे वाचणाराच कुणी नाही सुधा मूर्ति यांच्या काही पुस्तकाच्या मराठी भाषांतराच्या ९ आवृत्त्या खपल्या पण कन्नडमधील पहिलीच आवृत्ती अजून संपली नाहीये
  • Log in or register to post comments

इंट्रेस्टिंग.. हे माहीत

गवि
Wed, 10/12/2011 - 09:44 नवीन
इंट्रेस्टिंग.. हे माहीत नव्हतं.. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

कुतुहल

सुनील
Wed, 10/12/2011 - 10:10 नवीन
सुधा मूर्ति यांच्या काही पुस्तकाच्या मराठी भाषांतराच्या ९ आवृत्त्या खपल्या पण कन्नडमधील पहिलीच आवृत्ती अजून संपली नाहीये कन्नड तसेच मराठी आवृत्तीं किती प्रतींच्या होत्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

खरे आहे

चिरोटा
Wed, 10/12/2011 - 14:32 नवीन
पण त्या लोकांचे एकच दु:ख आहे. तिकडे वाचणाराच कुणी नाही
खरे आहे. बेंगळूरमध्ये पहाल तर जुने कन्नड ग्रंथ मिळायची मारामार असते. पूर्ण शहरात १० हून अधिक दुकाने नसतील कन्नड ग्रंथ विकणारी.अनेक जण मैसूरला जातात पुस्तके घ्यायला.अनेक उच्चशिक्षित लोक ज्ञानपीठ काय्,साहित्य अकादमी काय ,संगीत वगैरे बाबतीत अनभिज्ञ असलेले मी पाहिले आहेत. मी,माझे काम्,माझे कुटूंब एवढाच विचार असतो. पं.भीमसेन जोशींचे निधन झाले तेव्हा तरुण पिढीला ते कन्नडिगा आहेत आणी त्यांनी कन्नड गाणी गायली आहेत हे माहित नव्हते,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा