हत्यार्यांचे विविध प्रकार असतात. युध्दात वापरली जाणारी ह्त्यार, किचन मध्ये वापरली जाणारी हत्यारे (सुरी, विळी) अजुन बर्यच क्षेत्रात हत्यारे वापरली जातात. तशिच शेतकर्यांची हत्यारे वर्षभर शेतकर्यांच्या सोबत राबत असतात. त्यांना निवांतपणा मिळतो तो दसर्याच्या दिवशी. ह्या शेतीतून अन्न धान्य पिकवण्यासाठी ही हत्यार जी कष्ट करतात त्यांचे आभार, त्यांच्याबद्दलच्या पुज्य भावना दसर्याच्या दिवशी हत्यार पुजन करुन केले जाते.
माझे माहेर शेतकरी कुटुंबातले. त्यामुळे आईने पुजलेली हत्यारे मी अगदी बालपणापासुन पाहत आले. सासरची शेती पेण गावाला आहे. पण सासु-सासरे नोकरी निमित्त गावोगावी फिरले. त्यामुळे शेतीअवजारांच्या पुजेशी त्यांचा संबंध आला नाही. मात्र बाकी सगळ्या पुजा, सणवार माझ्या सासरी होतात. मी लग्न होऊन आले. पहिल वर्ष माहेरीच असत. त्यामुळे ते वर्ष चुकल. दुसर्या वर्षी आमचे सगळे कुटुंब नविन वाडीत शिफ्ट झाल. तिथे सासर्यांनी वाडीसाठी हत्यार घेतलीच होती. मी स्वतः सुद्धा ती हत्यारे छोट्या मोठ्या कामांसाठी वापरत होते. त्यामुळे दसर्याच्या त्या दुसर्या वर्षी रहावले नाही. जाऊन सगळी हत्यारे गोळा केली आणि स्वच्छ धुवून पुसुन आणुन पाटावर मांडली. सासरे आणि सासूबाई पाहत बसले ही काय करते. पण जे करत होते त्यामुळे दोघेही खुष झाले. सासुबाई म्हणाल्या शेतकरीण आहे ना ती म्हणून शाब्बासकी दिली. सासर्यांच्या चेहर्यावर त्या दिवशी मी वेगळाच आनंद पाहीला.
माझे सासरे खुप मितभाषी होते फार कमी बोलत. ते ४ वर्षापुर्वी वारले. पण प्रत्येक दसर्याला ही पुजा करताना मला त्यांना त्या दिवशी हत्यारे पुजल्यामुळे झालेल्या समाधानाची आठवण येते.
ह्या वर्षी केलेले हत्यार पुजन. हत्यारांमध्ये पिकाव, कुर्हाड, फावडा, कुदळी,नारळ सोलण्याचे यंत्र भिंतिला टेकुन आहे तर पुढे खरळ, हातोडी, कचरा काढण्याचा खुरपा, कोयता, सुरी, काती आहे.
ही सरस्वती माझ्या मुलीसाठी सासुबाईंनी काढून दिली काल. श्रावणीने पुजन केले सरस्वतीचे.
ही सरस्वती माझ्या मुलीसाठी सासुबाईंनी काढून दिली काल. श्रावणीने पुजन केले सरस्वतीचे.
वाचने
8083
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान माहिती जागुतै
छान....
:)
हो ग ...
In reply to :) by विशाखा राऊत
मस्त फोटो!
धन्यवाद...
In reply to मस्त फोटो! by पैसा
पैसा कोळशाने ही पाटी काळी
धन्यवाद..
In reply to पैसा कोळशाने ही पाटी काळी by जागु
छान
या धाग्याने जुन्या आठवणी
शमी की आपटा?
In reply to या धाग्याने जुन्या आठवणी by रेवती
रेवतीतै + १०० टु शेवटची ओळ,
मयूरारूढ सरस्वती
In reply to रेवतीतै + १०० टु शेवटची ओळ, by ५० फक्त
धन्यवाद, मी हा प्रश्न आज
In reply to मयूरारूढ सरस्वती by राही
५० शोध काढते आता. रेवती अग
इथे पण दसर्याच्या दिवशी
आम्ही गुमान जाउन
राही छान माहीती. त्या
पैसा कोळशाने ही पाटी काळी