Skip to main content

उगीच अबोला ---

लेखक पुष्कराज यांनी गुरुवार, 10/07/2008 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
उगीच अबोला उगीच भांडणे अशीच गेली संध्याकाळ वाळूवरती रेघा मारीत उगीच दवडला आपुला वेळ दोनच घटकेचे हे यौवन त्यातही आपुले केवळ दो क्षण सखे भांडणे हवीत थोडी प्रेमाची पण केवळ दो क्षण सखे नदी ती पाहतेस ना ओढीने बघ वहात जाते सागराच्या कुशीत शिरूनी शांत होउनी मिसळून जाते एकरूपता अशी पाहीजे दोन जीवांची दोन मनांची भेटही आपुली अशीच व्हावी असेल जरी ती दोन क्षणांची
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2802
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

'भेटही आपुली अशीच व्हावी असेल जरी ती दोन क्षणांच' या दोन ओळी तर खल्लास ... (भेटीसाठी उत्सुक) पुण्याचे पेशवे

तीस-चाळीस वर्षांपूर्वीचं गजानन वाटवेंच एखादं भावगीत वाटावं अशी आहे अगदि.

उगीच अबोला उगीच भांडणे अशीच गेली संध्याकाळ वाळूवरती रेघा मारीत उगीच दवडला आपुला वेळ हे मस्तच..... एकरूपता अशी पाहीजे दोन जीवांची दोन मनांची भेटही आपुली अशीच व्हावी असेल जरी ती दोन क्षणांची ए वन !!!!! (प्रत्येक क्षणी आनंद शोधणारा) मदनबाण.....

साधी व सुंदर कविता...!

In reply to by विसोबा खेचर

सहज उतरली आहे. (सहज)बेसनलाडू पहिल्या कडव्यात २र्‍या व ४थ्या ओळीत यमक जुळण्यात जराशी(च) गोची झाली असे वाटते. (निरीक्षक)बेसनलाडू

तात्याशी सहमत. :) कविता आवडली.

मस्त कविता! -('मिसळ'लेला) ऋषिकेश