Skip to main content

मूर्ती विरुद्ध भगत

लेखक विकास यांनी मंगळवार, 04/10/2011 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
ऑक्टोबरच्या १-२ तारखेस न्यूयॉर्कमध्ये आय आय टीच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन होते. त्या वेळेस नारायण मूर्ती (आय आय टीचे माजी विद्यार्थी) यांनी "आपल्या भाषणात कोचिंग क्लासेसमुळे कुठल्याही मुलांना आय आय टी त प्रवेश मिळू लागला असल्याने तिथल्या मुलांची शिक्षणोत्तर नोकरीतील आणि उच्च शिक्षणातील गुणवत्ता घसरली आहे" अशी खंत व्यक्त केली. टाईम्समधील बातमी प्रमाणे: "Thanks to the coaching classes today, the quality of students entering IITs has gone lower and lower," Murthy said, receiving a thundering applause from his audience. ..."They somehow get through the joint entrance examination. But their performance in IITs, at jobs or when they come for higher education in institutes in the US is not as good as it used to be. " ... त्यावर आज चेतन भगत यांनी ट्वीटरद्वारा खालील वक्तव्य केले आहे: "It is ironic when someone who runs a body shopping company and calls it hi-tech, makes sweeping comments on the quality of IIT students." Bhagat furhter writes, "Mr Murthy had a point, but wish he wasn't so sweepingly high handed. Fix the system. No point judging students." वास्तवीक क्लासेसचे पेव आधी देखील होतेच, फक्त ते सगळ्यांना मिळण्यासाठी सर्वत्र नव्हते. मध्यंतरी मी ऐकले की आंध्रमधे एक जे ई ई साठीचा क्लास तिथल्या सक्सेस रेट मुळे इतका पॉप्यूलर झाला की त्यांना त्यांचीच प्रवेश (क्लास मधे प्रवेश मिळवण्यासाठी) चालू करावी लागली! हे ऐकून आश्चर्य वाटायच्या आत पुढे असेही समजले की त्या क्लासच्या प्रवेश परीक्षेत यश मिळून क्लासला अ‍ॅडमिशन मिळण्यासाठी म्हणून आता नवीन क्लासेस चालू झाले आहेत! पण हा वेगळा मुद्दा आहे. आता इतकेच विचारावेसे वाटते की मूर्तींच्या दृष्टीकोनातून कामाला योग्य आणि अमेरीकन विद्यापिठात योग्य असणे इतकेच आय आय टीअनचे महत्व आहे का? आय आय टीअन्सच कशाला पण आपण सगळ्याच विद्यार्थ्यांचा केवळ टेक्निकल क्लर्कशिपसाठीच विचार करतो का? जगात इनोवेशन हा शब्द सध्या जास्तच वापरला जात असताना आपण अजूनही बॉडीशॉपमधेच अडकलेले आहोत का?

वाचने 18788
प्रतिक्रिया 87

प्रतिक्रिया

मी स्वता एका आय.आय.टी. इंजिनीअर्ला सपोर्ट प्रोजेच्त वर बघीतले आहे तेही इन्फी बेन्गलुरु मधे

In reply to by टवाळ कार्टा

त्यात काय झालं? आयायटी इंजिनीयरने सपोर्ट प्रोजेक्टवर काम केलं तर त्यात काय बिघडलं? जाता जाता, तुमी इन्फी मदे कुते असता? :)

In reply to by कुंदन

development आणि Production Support या दोन्ही गोष्टींचा अनुभव असल्याने म्हणावेसे वाटते. development is पाटया टाकणं and Production Support is एन्ड युजरला थुकपट्टी देणं. म्हणून तर दोन्ही दुकानं मजबूत चालतात. ;)

देवाची मुर्ती कशीही असली तरी तिच्या पूजेने सर्वसामान्यांना आणि पैसेवाल्यांना मनाला शांती मिळते. भगताचं काय जातंय बोंबलायला. त्याला आपल्या थातूर मातुर पुजा सांगून लोकांकडून पैसे उकळायचे असतात.

त्यांचा ऑडियन्स होता माजी आयायटीयनांचा, जे अमेरिकेत येऊन यशस्वी झालेले आहेत. त्यांना 'तुमच्या काळी आयायटीत शिरणं कठीण होतं, त्यावेळी हुशारच लोक आत जायचे आणि बाहेर पडणाऱ्यांना मान होता. आता काय कोणी सोम्यागोम्या जातो' असं ऐकायला बरं वाटतं. त्यामुळे असं विधान यावं यात काही विशेष नाही. खरी गोष्ट अशी आहे की पंचवीस वर्षांपूर्वीही क्लासेस, करस्पॉंडन्स कोर्सेस वगैरे जोरात होते. आयायटीत शिरणारा जवळपास प्रत्येकजण काही ना काही क्लास, कोर्स करूनच शिरत असे. आणि अशा क्लासेस, कोर्सेसना जाणारे जेमतेम ५ टक्के आयायटीत शिरायचे. त्यामुळे तेव्हाही जवळपास सॅचुरेशन होतं. आयायटीत शिरल्यावर खालच्या ८० टक्क्यांना जड जात असेच. म्हणून मूर्तींचं विधान स्वीपिंग आहे, हे भगतांचं बरोबर वाटतं. मात्र 'बॉडिशॉपवाल्याने असं म्हणावं ही आयरनी आहे' हे अनाठायी आहे. मूर्तींनी शॉपबॉडीज पलिकडे संशोधन वगैरे होण्यासाठी काय करावं याविषयीही काही विचार मांडले आहेत. ते विचार बरोबर असोत नसोत, त्यांचा हेतू निश्चित चांगला आहे.

In reply to by राजेश घासकडवी

मात्र 'बॉडिशॉपवाल्याने असं म्हणावं ही आयरनी आहे' हे अनाठायी आहे.
हेच खटकलं. कारण नसताना केलेली चिखलफेक आहे ही. कुणी ताणून धरलं तर भगत साहेब अशी माघार घेतीलच.

In reply to by राजेश घासकडवी

मात्र 'बॉडिशॉपवाल्याने असं म्हणावं ही आयरनी आहे' हे अनाठायी आहे. मला देखील हे खटकले. हा शब्द येथेच नाही तर एकंदरीतच खटकतो. कदाचीत १४० अक्षरांमधे ते बसत असावे म्हणून भगतसाहेबांनी घातले असावे. मूर्तींनी शॉपबॉडीज पलिकडे संशोधन वगैरे होण्यासाठी काय करावं याविषयीही काही विचार मांडले आहेत. ते विचार बरोबर असोत नसोत, त्यांचा हेतू निश्चित चांगला आहे. बोलण्यातला हेतू चांगला असावा यात शंका नाही पण जर तसे (संशोधनाचे वातावरण प्रत्यक्षात इन्फोसिसमधे नसेल तर त्यांचे बोलणे वरकरणी ठरते. तसे आहे का हे तेथे काम करणारे थोडेफार सांगू शकतील. पण असले तरी फक्त ते केवळ इन्फोसिससाठीच लागू नाही असे वाटते/

In reply to by विकास

पण जर तसे (संशोधनाचे वातावरण प्रत्यक्षात इन्फोसिसमधे नसेल तर त्यांचे बोलणे वरकरणी ठरते.
इन्फोसिस ही काही विशिष्ट ध्येयं साध्य करणारी संस्था आहे. आयायटींची ध्येयं वेगळी आहेत. आयायटीची ध्येयं गाठण्यासाठी आयायटीत अमुक तमुक हवं असं जर मूर्तींनी म्हटलं तर 'कायरे, तुमच्या इन्फोसिसमध्ये आहे का ते अमुक तमुक?' असा प्रश्न विचारणं योग्य नाही. प्रत्येक संस्थेत सुधारणेला जागा असते, मग ती कंपनी असो किंवा युनिवर्सिटी. पण दोन्हीत समान गोष्टी आवश्यक आहेत असं का म्हणावं? उद्या ते भारतीय आर्मीविषयी म्हणाले की आजकाल सैनिक कमकुवत असतात, त्यांना भरपूर व्यायाम दिला पाहिजे. तर तसाच व्यायाम इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांनाही त्यांनी दिला पाहिजे म्हणणं बरोबर ठरणार नाही. सैनिक खरंच कमकुवत आहेत का, असल्यास व्यायामाची कमतरता हे कारण आहे का वगैरे प्रश्न चर्चिले जाऊ शकतात.

In reply to by राजेश घासकडवी

या मुद्याशी सहमतच. इन्फोसिस आणि व्यायामाचे उदाहरण एकदम चपखल. माझ्या डोक्यात तो प्रतिसाद लिहीताना जे चालले होते त्याचे थोडे स्पष्टीकरणः चार वर्षांच्या शिक्षणानंतर जर मुलगा/मुलगी केवळ आपल्याला नोकरी कुठे लागणार इतकाच विचार करत असेल. आणि त्यातही मॅनेजमेंट कन्सल्टंट का सॉफ्टवेअर कन्सल्टंट तर मग संशोधनाच्या ट्रेनिंगचा फायदा काय? शेवटी तिथल्या प्राध्यापकांना देखील आपली मुले कशी यशस्वी झालीत हे दाखवायचे असते. आणि संशोधनाचे वेड असलेल्याला व्यावहारीक यशाच्या संध्या मिळून काय होणार. म्हणून संशोधनाच्या वातावरणावर बोलत होतो. हे केवळ आय आय टीतील विद्यार्थ्यांनाच लागू नाही तर इतर मान्यवर आणि व्यावहारीक संस्थांना देखील लागू होते. इंटरेस्टींगली, गेल्या शनीवारीच एका नवीन venture बद्दल ऐकत असताना समजले की एम आय टी आणि इतर आयव्हीलीग स्कूल्स मधे देखील ४७% विद्यार्थी हे गोल्डमन सॅक्स पासून मेकेन्झीसाठीच धडपडत असतात...

In reply to by राजेश घासकडवी

राजेश आणि पिडाकाकांच्या प्रतिसादांशी सहमत. "समीक्षकांनी टीका करण्याआधी एवढंतरी लिहून दाखवावं", असा कांगावा करणार्‍या लेखकूंसारखं वाटतं हे! भगत, मूर्ती ही नावं आणि धागप्रवर्तक विकास अशा काँबिनेशनमुळे धागा उघडावा का न उघडावा असा प्रश्न पडला. पण धागाप्रवर्तकाची पूर्वपुण्याई चिक्कार असल्यामुळे धागा उघडलाच. ;-)

In reply to by विकास

संशोधनाचे वातावरण प्रत्यक्षात इन्फोसिसमधे नसेल तर त्यांचे बोलणे वरकरणी ठरते. तसे आहे का हे तेथे काम करणारे थोडेफार सांगू शकतील.
अगदी R & D गुणवत्तेचे नाही परंतू नविन काही करुन बघण्यासाठी स्वतंत्र टीम आहेत आणि त्यांना ग्राहकाची कामे दिली जात नाहीत हे माहिती आहे.

In reply to by राजेश घासकडवी

त्यांचा ऑडियन्स होता माजी आयायटीयनांचा, जे अमेरिकेत येऊन यशस्वी झालेले आहेत. त्यांना 'तुमच्या काळी आयायटीत शिरणं कठीण होतं, त्यावेळी हुशारच लोक आत जायचे आणि बाहेर पडणाऱ्यांना मान होता. आता काय कोणी सोम्यागोम्या जातो' असं ऐकायला बरं वाटतं. त्यामुळे असं विधान यावं यात काही विशेष नाही. याला यजमानांनी केलेल्या आतिथ्याला जागणं असं म्हणतात. आणि यात गैर काही नाही. फक्त "आता काय कोणी सोम्यागोम्या जातो'"अशा अर्थाचं विधान मूर्तींनी केलं नसतं तर (जर प्रत्यक्षात केलं असेल तर) भगतांना (आणि विकासला) वाईट वाटलं नसतं, इतकंच! ;) खरी गोष्ट अशी आहे की पंचवीस वर्षांपूर्वीही क्लासेस, करस्पॉंडन्स कोर्सेस वगैरे जोरात होते. खरं आहे. १९७५-८०च्या काळातही मुंबईत अग्रवाल क्लासेस वगैरे होतेच. आमच्या बरोबरची ज्यांना इंजिनियरिंगला जायचं आहे अशी मुलं तिथे जातच होती आणि त्या काळीही त्या क्लासची फी त्या काळच्यामानाने जबरदस्त होतीच!! बाकी युएस मध्ये उच्च शिक्षण/ जॉब वगैरेबद्दल म्हणाल तर माणसाने कुठल्या संस्थेतून शिक्षण घेतलं आहे याचा फायदा त्याच्या लगेच पुढच्या अ‍ॅडमिशनसाठी किंवा पहिल्या जॉबसाठी अवश्य होतो. पण त्यानंतर मग तुमचा करंट परफॉर्मन्स बघून तुमचं परीक्षण केलं जातं. विशेषतः जर इंजिनियरींगमधील जॉब असेल तर आयायटीच्या इंजिनियरला नक्कीच प्राधान्य मिळतं. परंतु जर इतर क्षेत्रातील जॉब असेल विशेषतः मॅनेजमेंट (जो बहुसंख्य आयायटियन्सना हवा असतो असं पाहण्यात आलं आहे) त्यात उमेदवार कधी काळी आयायटीत गेला होता याचा विशेष फायदा दिसून येत नाही. बाकी "आयायटी पूर्वी काय बुवा बुद्धिमंतांचं आगर होतं, आता काय राहिलं नाही", अशा अर्थाच्या बोलण्यात नॉस्टाल्जिया सोडला तर बाकी काही अर्थ नाही असं मला वाटतं.... उदा. "आमच्या काळी मुंबई काय झकास होती, आता साली नुसती वाट लागलीये!!" "पूर्वीचं पुणं राहिलं नाही राव, च्यायला, आमच्या काळी हे असं नव्हतं!!!" "पूर्वी मिपा काय छान होतं, आता नुसत्या येडपट कविता आणि बुद्रुक पाकक्रिया!!!" :)

वास्तवीक क्लासेसचे पेव आधी देखील होतेच आंध्रात असलेल्या क्लाससारखाच कुठला तरी क्लास कोटा, राजस्थानात आहे म्हणे! माझ्या मैत्रिणीच्या सासूसासर्‍यांचा व्यवसाय हाच की त्यांच्या घराला लागून त्यांनी आठ खोल्या बांधून घेतल्यात आणि तिथे ठिकठिकाणांहून आलेली मुलं राहतात आणि या क्लासला जातात. त्यांच्यामते या मुलांची तिथल्या थोडक्या वास्तव्यातही अनेक लफडी असतात. ती कधीकधी यांना निस्तरावी लागतात. लफडी म्हणजे मुलगी इन्व्हॉल्व असेलच असे नाही पण हुषार मुलाला परिक्षेला बसता येऊ नये म्हणून शक्यतेतली सगळी काळी कृत्ये करणे. कित्येकांचे आईवडील आपल्या मुला/मुलीच्या संरक्षणासाठी येऊन रहतात. असे कितीतरी प्रकार त्या बाई सांगत होत्या. महाराष्ट्रीयन मुले त्यातल्यात्यात बरी असतात. प्रकरणांपासून जरा तरी लांब असतात. बाकी मूर्ती म्हणताहेत ते मला तरी पटते.

In reply to by रेवती

तै, उप-प्रतिसाद गुर्जींच्या प्रतिसादाला पडण्याऐवजी तुमच्या प्रतिसादाला पडला. म्हणून काढून टाकला. बाकी काही नाही. तुम्ही अंमळ हळव्या दिसता. इतके हळवेपणा जालावर चालत नाही, हे आम्ही का तुम्हाला सांगायचं. :)

In reply to by धन्या

हळवेपणाचा प्रश्न नाही. प्र. का. टा. आ. हे वेगळ्या अर्थानेही वापरले गेले असल्याचे उदाहरणे आहेत. तोच अर्थ असावा असे समजून विचारले. अतोनात हळवी असते तर एव्हाना पळून गेले असते.

In reply to by शिल्पा ब

तुम्ही धाग्या-धाग्यांवर देत असलेल्या प्रतिसादांवरुन मुळीच वाटत नाही की तुम्ही हळव्या आहात म्हणून. :)

In reply to by शिल्पा ब

शिल्पातै, तुमच्यासारख्या मिपाकरांच्या प्रतिक्रियांना पुरुन उरायचं म्हटलं की ईतका चिवटपणा लागतोच. बाकी तुम्ही आम्हाला दिलेलं नविन आडनाव आवडल्या गेल्या आहे. तसाही वाकडे आणि वागळे यामध्ये फारसा फरक नाही. (इथे वाकडे हा शब्द विशेषण म्हणून वापरला आहे ;) )

In reply to by प्रचेतस

आम्हाला कुणा एका वागळेचा उल्लेख अपेक्षित नव्हता. आम्ही सार्‍या महानगराचा आयबीएन लोकमतवाले करतील तसा विचार केला होता. ;)

In reply to by धन्या

वागळे म्हणजे एक आपल्यासारखाच सर्वसामान्य पापभीरू माणूस. त्याची दुनिया ती आपलीच की. :) तेव्हा मी आख्या आपल्या दुनियेचा विचार करतोय आणि तुम्ही फक्त महानगराचाच. ;)

In reply to by धन्या

तसाही वाकडे आणि वागळे यामध्ये फारसा फरक नाही. त्यांना *"वेगळे'' म्हणायचे होते. चुकुन वागळे म्हणाल्या त्या ;) * संदर्भः चौकट राजा ;)

In reply to by मृत्युन्जय

त्यांना *"वेगळे'' म्हणायचे होते. चुकुन वागळे म्हणाल्या त्या * संदर्भः चौकट राजा
चौकट राजा म्हणजे दिलिप प्रभावळकर आणि स्मिता तळवळकर यांनी काम केलेला सिनेमा का इथपासून सुरुवात झाली. :)

In reply to by मृत्युन्जय

आम्ही परवाच एका व्यनित म्हटलं होतं की आम्हाला क्रिकेटमधलं काहीही कळत नाही. इथून पुढे क्रिकेटचे संदर्भ वापरणे नाही. :)

In reply to by मृत्युन्जय

धागा भरकटायला लागला की प्रतिसाद उजवीकडे सरकतात अशी काही खास व्यवस्था आहे की काय मिपावर ? ---- तिरशिंग भरकटणे

In reply to by रेवती

>लफडी म्हणजे ..इन्व्हॉल्व असेलच असे नाही पण हुषार मुलाला परिक्षेला बसता येऊ नये म्हणून >शक्यतेतली सगळी काळी कृत्ये करणे. कित्येकांचे आईवडील आपल्या मुला/मुलीच्या संरक्षणासाठी >येऊन रहतात. रेवती, आपल्या मुलाचे प्रेमात पडणे झाकण्यासाठी तर असे आईवडिल बोलत नसतील ना? खरे तर पंधरासोळाच्या मुलांनी खर्‍याखोट्या प्रेमात नाही पडले तरच मी आश्चर्य करेन. असो. पण आईवडिलांनी संरक्षण करायचे म्हणजे काय? तुझ्या सोळा वर्षाच्या मुलीपासून मी माझ्या सोळा वर्षाच्या मुलाचे रक्षण करतो असे? हा प्रतिसाद तुला उद्देशून नाही, पण नक्कीच अशा भ्रामक समजुती आईवडिल स्वत:च्याच करून घेत असावे असे वाटते. किंवा लोकांसमोर आपल्या मुलाचा 'पाय घसरला', तो कोणाच्या तरी 'जाळ्यात अडकला' इ. बर्‍याच लोकांकडून ऐकले आहे. ही किती फसवणूक असते आणि ती कोण, कोणाची आणि का करत असते हा जरा गोंधळच आहे. बाकी आयआयटीवरून वाचताना अचानक काही जुने आयडी आठवले. कहां गये वो लोग असे काही झाले आहे खरे.

In reply to by चित्रा

बाकी आयआयटीवरून वाचताना अचानक काही जुने आयडी आठवले. कहां गये वो लोग असे काही झाले आहे खरे.
छे, तुमचं आपलं काहीतरीच. आवसे पुनवेला जनसामान्यांना सावध करण्याचं महान कार्य केवळ आयायटीयनच करत आहेत. इतरही अद्वैतवादी आयायटीयन इथे आहेत असं ऐकून आहे. खरं खोटं प. पू. गुरुवर्य घासुरुद्ध जाणोत.

In reply to by चित्रा

नाही गं, तसं नाही. प्रेमात पडतच असतील (किंवा नसतीलही).;) मुलांच्या मारामार्‍या असतात. जायबंदी करण्याइतपत. आता जर मी दिल्ली, पंजाबकरांबद्दल बोलले तर त्यावर वेगळा धागा निघेल असे वाद होतील.;) आयायटीवरून तर मला असा आयडी नेहमी आठवतो.........ती ष्टोरी फोन होईल तेंव्हा सांगीन.

In reply to by रेवती

अशा मुलांना आयायटीमध्ये प्रवेश नाहीच मिळाला तर पुढे जाऊन ती एखादी नवनिर्माण सेना काढतील आणि दुसर्‍या राज्यांमधील लोक आपल्या राज्यात एखादया सरकारी नोकरीच्या परीक्षेला आले की त्यांना रेल्वे स्टेशनवरच ठोकतील. :)

आयआयटी हाच एक मोठा कोचिंग क्लास असल्याने मुर्ती व भगत यांची विधाने अनावश्यक आहेत.

In reply to by मुक्तसुनीत

+१०० टु क्रेमर आणि मुसुकाका. आयआय्टित न गेलेला पण एका अतिशय उत्तम आयआयटियनच्या हाताखाली नोकरीतल्या धंद्याच्या राजकारणाची गणितं शिकलेला, सध्या त्या गणितांचा वापर करुन माझ्या बॅचच्या आयआय्टियनपेक्षा जास्त यशस्वि असलेला,

'भगत'च 'मूर्तीं'विरुद्ध जायला लागले तर अवघड आहे! :) (मूर्तिपूजकभगत) रंगास्वामी

साठी महत्वाकांक्षी उद्दीष्ट ठेवत आहेत हे चांगलेच आहे.. १०-२० वर्ष काय काय काम करायचे हे दिशा दर्शन महत्वाचे ठरते.. त्यांचा दुरदर्शी पणा कलामांच्या पठडीतला आहे... बाकी चेतन भगत उंची वाढविण्याच्या प्रयत्नात आहेत असे वाटते...

>> जगात इनोवेशन हा शब्द सध्या जास्तच वापरला जात असताना आपण अजूनही बॉडीशॉपमधेच अडकलेले आहोत का? >> जोपर्यंत बेसिक गरजा - प्रदूषणमुक्त हवा, सार्वजनिक स्वच्छतागृहे , कमी गर्दी अर्थात पुरेशी पर्सनल स्पेस दुसर्‍या देशात मिळते तोपर्यंत (काही!!!!) लोकांचा ओढा अन्य देशांकडे रहाणारच. दुसर्‍या देशात जाऊन फारसा तीरही मारता येत नाही. खूपशी उर्जा स्वतःला, कुटुंबाला स्थिरस्थावर करण्यात, परिस्थितीशी जुळवून घेण्यातच जाते. त्यामुळे बॉडीशॉप, क्लेरीकल वर्क यापलीकडे जाता येत नाही बहुतेक.

भगत यांच्याशी सहमत आहे. राजेश घासकडवी यांनी मूर्ती यांच्या बोलण्याचा जो उद्देश सांगितला आहे (जुन्या आयआयटीयन्सना सुखावणारे बोलणे) तोच बरोबर वाटतो. वेळोवेळी आपल्या देशात होली काऊज निर्माण होतात. मग त्यांनी बोललेले काहीतरी खूप महत्त्वाचे आहे असा आभास निर्माण होतो. नारायणमूर्ती ही अशीच एक होली काऊ आहे. बाकी क्रेमर यांच्याही प्रतिसादाशी पूर्ण सहमत आहे. . . . . . (शरीरविक्रयात* एकदा भाड्याने गेलेला सायबर कुली) नितिन थत्ते *शरीरविक्रय = Body Shopping :)

In reply to by नितिन थत्ते

वेळोवेळी आपल्या देशात होली काऊज निर्माण होतात
सहमत. आयआयटी हीसुद्धा एक 'होली काऊ'च आहे आणि या होली काऊवाल्यांचं 'होलीयर दॅन दाऊ' हे आवडतं घोषवाक्य आहे.

In reply to by नगरीनिरंजन

आयआयटी हीसुद्धा एक 'होली काऊ'च आहे आणि या होली काऊवाल्यांचं 'होलीयर दॅन दाऊ' हे आवडतं घोषवाक्य आहे.
प्रचंड सहमत आहे. सुंदर मुर्ती घडवण्यासाठी भगताला कदाचित पुढचे सात जन्मही कमी पडतील. त्याने लोकांना हरिदासाच्या कथा सांगूनच आपली शेखी मिरवावी. :)

In reply to by नगरीनिरंजन

आयआयटी हीसुद्धा एक 'होली काऊ'च आहे असेच म्हणतो. किंबहुना सगळीच नावाजलेली कॉलेजेस जसे - आय आयटी, व्हीजेटीआय, सिओईपी इत्यादी ही होली( काउ आहेत. अन्यथा या ठिकाणीच कँपस सिलेक्शन व्हावीत आणि लोकल कॉलेजमधले विद्यार्थी स्वस्तात काम करण्यासाठी तयार असताना कंपन्यांनी (यात इन्फोसिस सुद्धा आहेच) त्यांच्याकडे ढुंकूनसुद्धा पाहू नये असं झालं नसतं.

In reply to by नितिन थत्ते

नारायणमूर्ती ही अशीच एक होली काऊ आहे.
थत्तेचाचा, बोलणं खुप सोपं असतं हो. तुमच्याच भाषेत सांगायचं तर शरीरविक्रयात भाडयाने जाण्यासाठी सायबर कुली रक्त आटवत असतात. आणि एकदा का तसं झालं की स्वर्ग हाताला लागल्याचं समाधान मिळत असतं. कदाचित तुम्हीही अशा अनुभवातून गेला असाल. कुणा एका सायबर कुलीची ही अवस्था तर अशा हजारो सायबर कुलींना भाडयाने पाठवणारा अगदी महान नसला तरी कर्तृत्ववान नक्कीच असला पाहिजे ना. ;)

In reply to by धन्या

अशा हजारो सायबर कुलींना भाडयाने पाठवणारा अगदी महान नसला तरी कर्तृत्ववान नक्कीच असला पाहिजे ना सत्यम चा राजु हा पण एक तसाच कर्तुत्ववान.

In reply to by मराठी_माणूस

मी शेण खाल्लं याचा अर्थ माझ्यासारखे हजारो आय टी हमाल शेण खातात असा होत नाही. माझं शेण खाणं हे माझ्यापुरतंच मर्यादीत असेल, त्याचं सारे सॉफ्टवेअर इंजिनीयर शेण खातात असं जनरलायझेशन होऊ शकत नाही. बरोबर ना?

In reply to by नितिन थत्ते

वेळोवेळी आपल्या देशात होली काऊज निर्माण होतात. मग त्यांनी बोललेले काहीतरी खूप महत्त्वाचे आहे असा आभास निर्माण होतो. नारायणमूर्ती ही अशीच एक होली काऊ आहे.
सहमत.

भगतचा शेरा हिणकस वाटला तरी ती वस्तुस्थिती आहे. एव्हढी कॅश रिच कंपनी असुन , आजतागायत त्यांच्याकडुन , ऑपेरटींग सिस्टीम, कंपायलर, डेटाबेस, ईआरपी ह्या सारखे एकही सॉफ्टवेअर बनवण्याच्या प्रयत्न झालेला दिसत नाही. दुसरे म्हणजे मुर्तींच्या शिक्षणावरच्या मताला एव्हढे महत्व का? त्यांचा ह्या क्षेत्रातील काही अनुभव आही का ?

क्रेमर यांचा प्रतिसाद आवडेश ! :) बाकी चतुर रामलिंगम सारखे नमुने अश्या संस्थात किती असावेत / यातुन बाहेर पडत असावेत ? असा सहज विचार आला बाँ. ;) बाकी बुद्धीमत्ता आणि शिक्षण संस्था यांचा संबंध असायलाच हवा असे वाटत नाही. अनेक मोठे मोठे शोध लावणारे/ कर्तुत्व असलेले, कोणत्याच विद्यापिठात किंवा तत्सम शिक्षण संस्थात गेले नव्हते अशी बरीच उदाहरणे आढळुन येतील. :) यातलेच एक उदा:--- Luther Burbank http://en.wikipedia.org/wiki/Luther_Burbank

घासकडवींच्या प्रतिसादाशी सहमत. मागे २००३ साली Brand IIT हा प्रोग्रॅम अमेरिकेतल्या एका चॅनेलवर लागला होता. मूर्ती मुलाखतीत म्हणाले होते- माझ्या मुलाला आय.आय.टी.ला प्रवेश नाही मिळाला पण कॉर्नेलला मात्र प्रवेश मिळाला.संचालिकेने एकदम मोठा आ करुन "बापरे आय आय टी, जगातली सर्वात कठिण परीक्षा दिस्तेय" असे उद्गार काढले. जगात इनोवेशन हा शब्द सध्या जास्तच वापरला जात असताना आपण अजूनही बॉडीशॉपमधेच अडकलेले आहोत का? भारतात एन्फिच नाही तर अनेक आय्टी कंपन्यांनी ईनोवेशनसाठी प्रयत्न करुन पाहिले गेल्या १० वर्षात्.आवडो वा न आवडो - We are not made for that. ही वस्तुस्थिती आहे.
आजतागायत त्यांच्याकडुन , ऑपेरटींग सिस्टीम, कंपायलर, डेटाबेस, ईआरपी ह्या सारखे एकही सॉफ्टवेअर बनवण्याच्या प्रयत्न झालेला दिसत नाही
अनेक प्रयत्न अनेक कंपन्यांकडून झाले आहेत. हे सगळे बनवून विकण्यासाठी मोठी eco system लागते किंवा बिल जॉय(http://en.wikipedia.org/wiki/Bill_Joy ) स्टीव वॉझ (http://en.wikipedia.org/wiki/Steve_Wozniak ) सारखे जिनियस लागतात. भारतात ह्या दोन्ही गोष्टींचा अभाव आहे.

In reply to by चिरोटा

आवडो वा न आवडो - We are not made for that. ही वस्तुस्थिती आहे.
सहमत आहे. भारतातील आय टी कंपन्या "जे तुमच्या मनात ते आमच्या दुकानात" या तत्वावर चालतात. भले मग ग्राहकाच्या मनात डेटा टेक्स्ट फाईलमधून उचलून एक्सेल शीटमध्ये का टाकायचा असेना. कारण तेच सोयीचं आहे. इनोवेशन आलं की आपलं उत्पादन लोकांच्या मनात ठसवणं, बाजारातील जीवघेण्या स्पर्धेला तोंड देणं आलं. प्रोडक्ट डेव्हलपर असण्यापेक्षा सर्विस प्रोवायडर असणं हे फायदयाचं गणित आहे. :)

In reply to by धन्या

वाकडोबांशी सहमत. ;) प्रोडक्ट डेव्हलपर असण्यापेक्षा सर्विस प्रोवायडर असणं हे फायदयाचं गणित आहे. :) आमच्या सारख्या आयटी हमालांच्या भाषेत काही घोष वाक्ये/म्हणी :--- १) सपोर्ट द्या बस्स्स्स्स ! २)कंन्सल्टंट जगो वा मरो बिलिंग होनाच मांगता ! ३) मॉनिटरिंग करणे आणि आयुष्याचा कोळसा करणे यात फरक तो काय? ४)२४X७ सपोर्ट देणे म्हणजे आयुष्याची काशी मथुरा करणे. ५) "गो लाईव्ह" म्हणजे "जीव जाई" पर्यंत काम. ६) नेटवर्क डाऊन तो एस्कलेशन चालु.

In reply to by मदनबाण

१ ते ६ सहमत. अजुन एक , आपल्या सणांना ह्यांचे "गो लाईव्ह" "रीलीज" ईत्यादी म्हणजे अगदी कळस . हे म्हणजे दुसरे पारतंत्रच वाटते.

In reply to by मराठी_माणूस

आपल्या सणांना ह्यांचे "गो लाईव्ह" "रीलीज" ईत्यादी म्हणजे अगदी कळस . हे म्हणजे दुसरे पारतंत्रच वाटते. आणि त्यांच्या सणांना यक्स्ट्रा सपोर्ट देणे. घर म्हणजे फक्त झोपायला जाण्यासाठी कंपनीने दिलेली सुट ? :( अश्या पारतंत्र्यात साडेतीन वर्ष घालवली आहेत मी ! ती आयष्यातली वर्ष कुठे गेली याचा अजुन पत्ता लागला नाहीये मला ! ट्रान्स म्हणु का त्याला ? असे वाटते:( काही दिवस मोकळा झालो होतो आता परत तेच होणार! चक्की दळींग अ‍ॅड दळींग अ‍ॅड दळींग ! :(

In reply to by धन्या

बाणा यल्टीआय मध्ये हे वाक्य दिवसातून दहा वेळा तरी ऐकावं लागतं ना रे. खी खी खी... आणि आयुष्यभर हेच ऐकावे लागणार आहे याची खात्री पण आहे. ;) परत तेच पालुपद मनात म्हणायचे ! काम करा बस्स्स्स ! ;)

बर्‍याच आयआयटी आणि आयआयएम च्या पब्लिक बरोबर काम करून त्यातले बरेचसे भिकरोचोट असतात हे मी छाती ठोक पणे सांगू शकतो. :)

In reply to by माझीही शॅम्पेन

मूर्तींनीही तसेच म्हंटले आहे पण सौम्य भाषेत. मा.शॅ्. ह्यांनी संस्थळावर सौम्य भाषा वापरावी ही विनंती.

In reply to by धन्या

अरे मित्रांनो मला प्रतिक्रिया संपादित करता येत नाही , मला विवादित शब्द बदलून भिकार-क्रिएटिव करायचा आहे ! अजुन काही प्रतिक्रिया आल्या तर चपलान्च दुकान टाकाव लागेल :)

In reply to by माझीही शॅम्पेन

>>अरे मित्रांनो मला प्रतिक्रिया संपादित करता येत नाही अजिबात संपादित करू नकोस. असे लिहिल्यामुळे तू जुना-जाणता म्हणून प्रसिद्ध होशील. मग तू इतरांनी संस्थळाचा वाट लावली अशी बोंब ठोकायला मोकळा होशील. >>अजुन काही प्रतिक्रिया आल्या तर चपलान्च दुकान टाकाव लागेल दीड वर्ष झाले तुला इथे, अजून कातडी इतकी मऊ आहे ?? हापिसात कसे पण पी.एल. कम्प्लायंस च्या नावाने बोम्बलला तरी दुर्लक्ष करतो तसे दुर्लक्ष करायचे सरळ. काय बोलतोस, कशी आहे आयडिया ????

माझा अनुभवः गेल्या ३० वर्षात खुप आय आय टी यन महानुभव संपर्कात आले. काही मोजके अपवाद सोडता सर्वजण आपले दिड फुट ह्या अविर्भावात असतात.