दोन्ही प्रकार छानच!
जुन्या फ्याशनचीच दुपटी बरी वाटतात.
अजून काय काय बाळंतविडा केलाय?
माझ्या मुलाच्या बारश्याला माझ्या आत्यानी दुपट्यांवर फुग्याचं पॅचवर्क आणि ट्रेनचंही केलं होतं ते आठवलं.
माझ्या नणदेनीही अगदी दोन वित लांबीच्या सलवार आणि झब्ब्यावर भरतकाम केलं होतं. ते अजून ठेवलय.
तुम्ही विणकाम केलय का?
मध्यंतरी एका बेबी शॉवरला गेले होते. एका सुनेनी दोन ब्लँकेटस विकत आणल्यावर सासूबाईंनी त्यावर बसल्याबसल्या जे काही भरतकाम केलं होतं त्यानं खूपच उठावदार झालं होतं. सगळ्या भेटवस्तूंमध्ये ते कौतुकाचं ठरलं होतं.
छे! काहितरीच.
अगदी तान्ह्या बाळाला रंग नाही कळत असं म्हणतात.
माझा मुलगा चार पाच महिन्यांचा असताना ज्या बाई पोळ्या करायला येत असत त्यांच्या भडक रंगांच्या साड्यांकडे टक लावून पहात असे. म्हणजे रंग कळतो की नाही ते माहित नाही.
म्हणजेच लहान मूल रंगा*कडे आकर्षित होते, भडक रंगा*कडे टक लाऊन बघते असंच नाही का म्हणता येत?
दुसर्या फोटोतल्या रंगसंगतीमध्ये तसा परिणाम होण्याची शक्यता वाटल्याने सदर शंका विचारली गेली होती. पुन्हा त्यावर झोपलेल्या बाळाच्या ही रंगसंगती अगदी डोळ्यालगत येत असण्याच्या शक्यतेने काळजी वाटल्यानेही असं विचारलं होतं.
* इथे 'रंगा' शब्दाने कुणा आयडीचा उल्लेख केलेला नाही हे सू. सां. न ल. ;-)
माझ्या आईनेपण माझ्या मुलीसाठी खूप दुपट्या तय्यार केल्या, त्यापण माझ्याच जुन्या मऊ सूती ओढ्ण्यांपासून. माझ्या आईने त्या माझ्या ओढण्या ईतकी वर्ष जपून ठेवल्या होत्या, बाळाला गोधड्या शिवायला उपयोगी होतील म्हणुन. त्यात तिने भोपळा, पतंग अशा वेगवेगळ्या आकाराच्या गोधड्या बनवल्या.
प्रतिक्रिया
ए मस्त ह ...छान दिसताहेत
ए मस्त ह ...छान दिसताहेत दोन्हीही..!!!!!!!!!
कलर कॉम्बीनेशन छान जमलय..!!
छान जमलय...दुसरं दुपट
छान जमलय...दुसरं दुपट सोंगट्या खेळायचा पट वाटतोय... :-)
दोन्ही प्रकार छानच!जुन्या
दोन्ही प्रकार छानच!
जुन्या फ्याशनचीच दुपटी बरी वाटतात.
अजून काय काय बाळंतविडा केलाय?
माझ्या मुलाच्या बारश्याला माझ्या आत्यानी दुपट्यांवर फुग्याचं पॅचवर्क आणि ट्रेनचंही केलं होतं ते आठवलं.
माझ्या नणदेनीही अगदी दोन वित लांबीच्या सलवार आणि झब्ब्यावर भरतकाम केलं होतं. ते अजून ठेवलय.
तुम्ही विणकाम केलय का?
मध्यंतरी एका बेबी शॉवरला गेले होते. एका सुनेनी दोन ब्लँकेटस विकत आणल्यावर सासूबाईंनी त्यावर बसल्याबसल्या जे काही भरतकाम केलं होतं त्यानं खूपच उठावदार झालं होतं. सगळ्या भेटवस्तूंमध्ये ते कौतुकाचं ठरलं होतं.
छान आहेत. खासकरुन दुसर्या
छान आहेत. खासकरुन दुसर्या दुपट्याची रंगसंगती छान जमलीए.
छान!
पहिलं दुपटं जरा सोपं आहे. दुसर्यात मात्र बरेच बारीक तुकडे जोडून केलेलं दिसतंय. रंगसंगती छान जमलीय.
छान कलाकृती
मला तर पहिलंच दुपटं चांगलं वाटलं.....
आता माझी आपली अज्ञानदर्शक शंका -
दुसर्या दुपट्यातील डिझाईन आणि रंगसंगतीमुळे त्यावरच्या बाळाच्या डोळ्यांना काही त्रास तर होणार नाही ना?
(अज्ञानी)
छे! काहितरीच. अगदी तान्ह्या
In reply to छान कलाकृती by प्रास
छे! काहितरीच.
अगदी तान्ह्या बाळाला रंग नाही कळत असं म्हणतात.
माझा मुलगा चार पाच महिन्यांचा असताना ज्या बाई पोळ्या करायला येत असत त्यांच्या भडक रंगांच्या साड्यांकडे टक लावून पहात असे. म्हणजे रंग कळतो की नाही ते माहित नाही.
(No subject)
In reply to छे! काहितरीच. अगदी तान्ह्या by रेवती
:D
त्या बाळंना तरी सोडा
In reply to (No subject) by स्वानन्द
त्या बाळंना तरी सोडा हो!
पोळीवाल्या आजीबाई होत्या. आणि मुलगा बाळ होता.
अहो रेवतीतै,
In reply to त्या बाळंना तरी सोडा by रेवती
म्हणजेच लहान मूल रंगा*कडे आकर्षित होते, भडक रंगा*कडे टक लाऊन बघते असंच नाही का म्हणता येत?
दुसर्या फोटोतल्या रंगसंगतीमध्ये तसा परिणाम होण्याची शक्यता वाटल्याने सदर शंका विचारली गेली होती. पुन्हा त्यावर झोपलेल्या बाळाच्या ही रंगसंगती अगदी डोळ्यालगत येत असण्याच्या शक्यतेने काळजी वाटल्यानेही असं विचारलं होतं.
* इथे 'रंगा' शब्दाने कुणा आयडीचा उल्लेख केलेला नाही हे सू. सां. न ल. ;-)
मस्त दिसतायत
मस्त दिसतायत दुपटी.
भाऊजींना त्यांच्या
In reply to मस्त दिसतायत by कुंदन
भाऊजींना त्यांच्या चिरंजिवांची दुपटी आठवत असतील.;)
छान
छान! अभिनंदन.
अशा मऊ दुपट्यांत गुंडाळलेली बाळे बघायला आवडतात.
चित्रा तै.
In reply to छान by चित्रा
हे घ्या दुपट्ट्यात गुंडाळलेलं बाळ :)
गोड आहे!! अशी बाळं एकदम
In reply to चित्रा तै. by किसन शिंदे
गोड आहे!! अशी बाळं एकदम बाहुलीसारखी दिसतात. :)
सहमत. फोटू पाहून भारतात सकाळी
In reply to गोड आहे!! अशी बाळं एकदम by शिल्पा ब
सहमत.
फोटू पाहून भारतात सकाळी लवकर तेल लावून अंघोळ घालून ती बाई निघून जाते पण जाण्याअधी बाळाला दुपट्यात गुरफटवून जाते ते आठवले.
फोटू पाहून भारतात सकाळी लवकर
In reply to सहमत. फोटू पाहून भारतात सकाळी by रेवती
सहमत
आमच्या बाळीला (ती लहान होती तेव्हा) दुपट्ट्यात गुंडाळायची जवाबदारी आम्ही स्वखुशीने आमच्या शिरी घेतली होती त्याची आठवण झाली. :)
धन्यवाद.
In reply to चित्रा तै. by किसन शिंदे
किती गोड गोड बाळ जसे कमल उमलले.
https://www.in.com/music/matsyagandha-te-mahananda-vol1/songs-48069.html
कलाकुसर छान आहेच. या
कलाकुसर छान आहेच.
या सध्याच्या 'प्रगतीच्या' काळात असली जुन्या आठवणी येणार्या वस्तू पाहून डोळे पाणावले.
छानच.
माझ्या आईनेपण माझ्या मुलीसाठी खूप दुपट्या तय्यार केल्या, त्यापण माझ्याच जुन्या मऊ सूती ओढ्ण्यांपासून. माझ्या आईने त्या माझ्या ओढण्या ईतकी वर्ष जपून ठेवल्या होत्या, बाळाला गोधड्या शिवायला उपयोगी होतील म्हणुन. त्यात तिने भोपळा, पतंग अशा वेगवेगळ्या आकाराच्या गोधड्या बनवल्या.
धन्यवाद!!!
वरील सर्वांना धन्यवाद
सुंदर आहेत दोन्ही. मुलासाठी
सुंदर आहेत दोन्ही.
मुलासाठी आईने बराच मोठा बाळंतविडा केला होता ते आठवलं.
दोन्हीही आवडले. अधिक असतील
दोन्हीही आवडले. अधिक असतील तरीही इथे टाका.
बाकी काही रंगवलेली वगैरे ?
प्रिया कित्ती गोड आहेत ती
प्रिया कित्ती गोड आहेत ती दुपटी. छानच ग.
छान !
सुंदर दिसताहेत .