गाथा तरंगली का?
परवा आमच्याकडे शरदबोवा आले. हे शरदबोवा कोण असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का ? सांगतो. हे थापा मारतात ; पण अगदी बेमालूम ( हे प्रमाणपत्र मॅडम प्रियाली यांनी दिले आहे तेव्हा ते खरे आहे असे आपण धरून चालू. ) त्यांच्या थापा अगदी विश्वासार्ह वाटतात. आल्यावर त्यांनी एकदम विचारले " काहो, तुकारामांची गाथा इन्द्रायणीतून वर आली, यावर तुमचा विश्वास आहे की नाही ? " मी काही उत्तर देण्याआधीच ते म्हणाले ' घाई करू नका. तुम्हाला पुरावाच देतो " त्यांनी त्यांच्या पोतडीतून काही कागद काढले व म्हणाले " परवा देहूला गेलो होतो, तेथे बूवांची अस्सल गाथा सापडली आहे. त्यातले दोन अभंग मला मिळाले आहेत. हे पहा. " त्यांनी पिवळसर दिसणारे दोन अभंग माझ्यासमोर सरकावले. त्यांना हात न लावता मी विचारले " अहो, पण हे अस्सल कशावरून ? माझा तुकाराम महाराजांवर विश्वास आहे, पण .....". बोवांना मला काय शंका आली आहे याची कल्पना आली. त्यांनी तावातावाने विचारले " मी थापा मारत आहे असे म्हणावयाचे आहे ना ? ठीक आहे. आणा एका बादलीत पाणी. " मी बादली आणली. बोवांनी एक अभंग बादलीत बुडापर्यंत बुडवला. थोडा वेळ तेथे दाबून ठेवला व हात काढला. काय आश्चर्य .. कागद हळूहळू वर येऊन तरंगू लागला. घरातील सगळी माणसे गोळा झाली होती. प्रत्येकाने हाच प्रयोग केला. कागद हळूहळू वर येतच होता.कागदावरची अक्षरे जशीच्या तशीच. आमची लेक फिस्कारली " लॅमिनेट केले असेल !" प्रत्येकाने अगदी काळजीपूर्वक कागद तपासला. लॅमिनेशन नव्हते. मुलाने शंका काढली " व्हार्निशिन्ग केले असेल. " लगेच आर्टपेपरची एक जाहिरात आणून त्याचे तुकडे पाण्यात बुडवले. कागदाला काही झाले नाही पण कागद बूडालेलाच राहिला. तो काही तरंगेना. आमचे बुचकळ्यात पडलेले चेहरे पाहून बोवांचा चेहरा लोणी मिळालेल्या बोक्यासारखा दिसू लागला. बोवा म्हणाले " आता अन्निसच्या कार्यकर्त्यांना बोलवा " आता घाटपांडे काकांना कोथरूडहून बोलवावे असा विचार करत होतो तो बोवाच म्हणाले " तुमच्या त्या पारशी मित्रांना बोलवाना " मी कोड्यात पडलेलो पाहून ते म्हणाले " ते कोण यनावाला सर आहेत ना? बोलवा त्यांनाच ". मी म्हटले " बोवा ते पारशी नाहीत." बोवा म्हणाले "नसतील नसतील, मला वाटले दारूवाला, बंदुकवाला तसे यनावाला ! " आता यनावाला सर रोजच भेटतात. तेव्हा तसे करावयाचे ठरले. त्यांना त्यांच्याच घरी प्रयोग करावयास द्यावयाचे ठरले उगीच आमच्या पाण्यात काही "जड पाणी " (Heavy water) आहे म्हणून अभंग तरंगतो असे वाटावयास नको. बोवा म्हणाले " त्यांना अभंगांची काळजी घ्यावयास सांगा. म्हणजे पाण्यात कितींदाही बुडवा, पाहिजे तर अगदी चवदा दिवस नको पण रात्रभर पाण्यात ठेवा म्हणावे पण नंतर मला माझे अभंग मिळाले पाहीजेत." मला एकदम पटले. आता दूधका दूध, पानीका पानी. (हे यनावाला मिपावरील सर्व वाचकांना माहित नसतील ; प्रा. य.ना. वालावलकर हे अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्राध्यापक होते.आठ वर्षे सकाळमध्ये रोज शब्दकोडी टाकत. उपक्रममधील तर्कक्रीडा ही कोडी लोकप्रिय होती. देव, चमत्कार वगैरेवर ते पोटतिडिकेने लिहतात.अजिबात विश्वास नाही.)
त्याप्रमाणे मी अभंग घेऊन श्री यनावालांच्या घरी गेलो. बरोबर आमचे एक मित्र प्रा. काळे यांनाही घेतले.(साक्षिदार असलेला बरा!) अभंग यनावालांना दिले व काय करावयाचे ते सांगितले. त्यांनाही तसेच आढळले. त्यांनीही कागद तपासून पाहिले. मी त्यांना शरदबोवांबद्दल काही सांगितले नाही. त्यांनी सांगितलेले मान्य केलेले मुद्दे असे :
(१) काजळापासून केलेल्या शाईवर (India Ink)पाण्याचा परिणाम होत नाही. तुकारामाच्या वेळी जर ही शाई मिळत असेल तर अक्षरांवर पाण्याचा परिणाम होणार नाही.
(२) हा कागदाचा विशिष्ट गुण (किंवा विशिष्ट कागदाचा गुण) आहे. जर असा कागद तुकारामांना मिळाला असेल तर अभंग पाण्यातून वर येणे शक्य आहे.
(३) वरील दोन गोष्टी जुळण्याची शक्यता असल्याने " तुकारामांची गाथा तेरा दिवसांनी इंद्रायणीतून वर आली " ही समजूत खरी असणे शक्य आहे. ( तुकाराम महाराज इंद्रायणीकाठी काही न खाता तेरा दिवस बसणेही शक्य आहे ; आमचे अण्णा नाही का दिल्लीत बसले होते ?)
घाटपांडे काकांना फोन केला. ते आले. त्यांनी परिक्षा केली. रिझल्ट तेच. ते प्रतिसाद देतीलच. आणि हो, तुमच्यापैकी कोणाला पुण्यात माझ्या घरी येऊन प्रयोग करावयाचा असेल तर बोवा अभंग परत घेऊन जाईपर्यंत यावयास काहीच हरकत नाही.
मी हल्ली कोणालाही काहीही शिकवत नाही . एकेकाळी कॉलेजातल्या मुलामुलींना शिकवत होतो, पण नंतर लग्न केले व गेली ४५ वर्षे एक शिक्षिका मलाच शिकवत असते ; तेव्हा हल्ली मी फक्त फुकटचे सल्ले देतो. आजही एक देतो.. जर चमत्कार वगैरे गोष्टी आपल्याला पटत नसतील तर " ह्याsss, सगळ्या थापा " असे म्हणावयाच्या आधी " हे शक्य आहे का ? " याचाही विचार करा. अभंगांचे छायाचित्र खाली दिले आहे.
शरद
शरद
वाचने
17395
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
?
?
In reply to ? by नितिन थत्ते
.....
In reply to ? by विनायक प्रभू
हा धागा
In reply to ? by नितिन थत्ते
प्र.का.टा.आ.
सिद्धता
?
In reply to सिद्धता by प्रियाली
म्हैत नै
In reply to ? by नितिन थत्ते
अरे बापरे थत्ते चाचा अनेक
In reply to ? by नितिन थत्ते
अरे बापरे थत्ते चाचा अनेक
In reply to ? by नितिन थत्ते
लोचटपणा पुरे विजू
In reply to अरे बापरे थत्ते चाचा अनेक by विजुभाऊ
अहो, रामाचे निस्ते नांव...
हॅहॅहॅ
In reply to अहो, रामाचे निस्ते नांव... by विसुनाना
त्या कागदावर प्रियालीचे नाव
In reply to हॅहॅहॅ by प्रकाश घाटपांडे
विसुनाना, दुव्यातला दगड मी
In reply to अहो, रामाचे निस्ते नांव... by विसुनाना
काही प्रश्न
ती दोन पाने तुकोबांच्या
In reply to काही प्रश्न by रमताराम
जुन्या हस्तलिखिताच्या
अक्षर
एक शंका
In reply to अक्षर by श्रावण मोडक
माहिती
In reply to एक शंका by पैसा
त्या काळातले
In reply to माहिती by श्रावण मोडक
त्या काळातले ;-)
In reply to त्या काळातले by पैसा
पिवळे कागद किती वेळ बुडून राहिले?
आदरार्थी संबोधा
In reply to पिवळे कागद किती वेळ बुडून राहिले? by धनंजय
आदरार्थी
In reply to आदरार्थी संबोधा by शाहिर
आनंद तरंग
अगदी बरोबर
In reply to आनंद तरंग by नंदन
बुडते हे जन देखवे न डोळा...
हेटाळणी?
In reply to बुडते हे जन देखवे न डोळा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to हेटाळणी? by बद्दु
अर्रर्र....
In reply to हेटाळणी? by बद्दु
मुळात गाथा तरंगून वर आली
प्लॅस्टिकही पाण्यावर
मी लिहिलेली गाथा
प्रदूषण
In reply to मी लिहिलेली गाथा by चतुरंग
रंगाशेट, खरंतर 'पाय' मारेन
In reply to प्रदूषण by प्रियाली
हो खरं आहे
In reply to रंगाशेट, खरंतर 'पाय' मारेन by ३_१४ विक्षिप्त अदिती
अरेरे, सहानुभूती
In reply to हो खरं आहे by चतुरंग
का, त्या कथारुपी व्यथेचा चोथा
In reply to अरेरे, सहानुभूती by ३_१४ विक्षिप्त अदिती
पुढचे व्हर्जन
>> शरदबोवा कोण असा प्रश्न
चक्षुर्वैसत्यम्
आमचे पूर्वज महान
In reply to चक्षुर्वैसत्यम् by यनावाला
@-बघा सांगत नव्हतो?
In reply to आमचे पूर्वज महान by नितिन थत्ते
यावरुन आठवले...
In reply to @-बघा सांगत नव्हतो? by अत्रुप्त आत्मा
आणि हो, तुमच्यापैकी कोणाला
त्या तसल्या कागदावर त्या तसल्या शाईने
गाथा बुडवल्यानंतर वर आली ह्या
अरेरे