Skip to main content

नाड़ी पत्र वाचून झाल्यावर ....

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 30/09/2011 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, हरदासाची कथा मुळपदावर?.... ओकांचा धागा अन "नाडीग्रंथ" विषय आला नाही तर काहींना चुकल्यासारखे वाटून काहींना निराशा वाटली -वाढली...म्हटले गेले म्हणून नाडीचा 'डोस' ... नाडी विषयाचे गांभिर्य मुद्दाम कमी करायसाठी झटणाऱ्यांनी हे लेखन वाचले नाही तरी चालेल. एका धाग्यावरील माहिती विचारताना म्हटले गेले. १) प्रश्न - नाड़ी पत्र वाचून झाल्यावर त्या पत्राचे काय केले जाते ? उत्तर - ती नाडीग्रंथाची ताडपट्टी परत त्याच ताडपट्ट्यांच्या बंडलात गुंडाळून ठेवली जाते. यावर असे का? असा प्रश्न उपस्थित होतो. त्याला उत्तर असे की अनेक पट्ट्य़ात त्याच पट्टीतील काही भागात दुसऱ्या व्यक्तिचे कथन असते म्हणून ते परत दुसऱ्या व्यक्तीसाठी तयार हवे म्हणून होते तसे गुंडाळून ठेवले जाते. अशा पट्ट्या नंतर काही काळाने जीर्ण वा खराब झाल्यास वाहत्या पाण्यात विसर्जन केल्या जातात. असे केंद्रातर्फे सांगतात. त्या अशा पट्ट्या आपल्याला अभ्यासाला देऊ असे आश्वासन मिळते पण प्रत्यक्षात कधी तसे अद्याप घडले नाही, असो. २) प्रश्न - ही पत्रे तमिल भाषेतच असतात का ? संस्कृत भाषेत का नसतात ? उत्तर - याचे उत्तर मी आपणाला विचारतो की तुम्ही मराठीतून का लिहिता? संस्कृत मधून का नाही? यावर आपण उत्तर द्याल की मला जी भाषा येते व ज्या भाषेतून ते कथन करायला शक्य आहे. म्हणून ती भाषा वा माध्यम मी स्वीकारतो. सध्या त्या तमिल नाडीवाचकांच्या हाती आहेत म्हणून कदाचित त्या तमिलमधे असाव्यात. आपला एक समज आहे की संस्कृत हीच सर्व भाषांची भाषा आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतच्या प्रेमापोटी वा आदरापायी आपणास असे वाटत राहते की असे ज्ञानाचे भांडार संस्कृत मधून का नाही? खरे तर असे महर्षींनी म्हटले आहे की भाषा कोणती असली तरी त्याचा आम्हाला फरक पडत नाही. कारण मी अशा ताडपटट्ट्या नव्हे कागद पाहिले आहेत की त्यावर काहीही प्रत्यक्ष लिहिलेले दिसत नाही,(बोल्ड अशासाठी की यावर प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय विश्वास ठेवणे अशक्य आहे असा माझा स्वतःचा अनुभव आहे. हवाईदलातील काही अविश्वासी मित्र तर शर्तीवर मला खोटे पाडायच्या इराद्याने येत. तेथील प्रत्यक्ष अनुभवाने चक्राऊन जात. पाहून अनुभवलेले असूनही प्रांजलपणे मान्य करायला पुर्वग्रहांमुळे संकोच वाटून 'सगळे थोतांड आहे" असे मोघम म्हणून आपली सुटका करत माझे तोंड चुकवत. ) पण वाचकाला त्यात अक्षरे निऑन साईनच्या प्रकाशाप्रमाणे प्रकाशित होऊन दिसतात. (नाडीवाचकाला विचारले की जसे तुम्हाला दिसते तसे इतरांना ही दिसेल का त्यावर ते म्हणाले की हो असे काही जण आहेत त्यांना महर्षींच्या आदेशाने तो मजकूर वाचता येईल. मात्र सरसकट तो वाचावयास येणार नाही असे महर्षींनी बंधन घातले आहे. असे वाचकांनी सांगितले.) मी त्या केंद्रात असे ही अनुभवले की काही वेळा नाडीवाचक म्हणतो की मला खालील ओळीतील तमिळलिपीतील मजकूर वाचता येतो पण अर्थबोध होत नाही. कळत नाही पण महर्षी म्हणतात की प्रश्नकर्त्याला त्याच्या भाषेत उत्तर हवे म्हणून मी त्याला त्याच्या भाषेत उत्तर देत आहे. ते तू त्याला वाचून सांग. तुला कळले नाही तरी. हे घडले तेव्हा प्रश्न फ्रेंच भाषेत विचारला गेला होता. एकदा मी संस्कृतमधून प्रश्न विचारले. त्याची उत्तरे मला त्याच भाषेतून मिळावीत असे म्हटले होते. त्यावर सुरवातीचा काही मजकूर तमिळ मधून आला व त्यात महर्षींनी वाचकाला सांगितले की यापुढील मजकूर पृच्छकाच्या इच्छेखातर त्याला हव्या त्या भाषेत मिळेल. असे म्हणून त्यानंतरचे कथन संस्कृतमधून आले. ते सर्व टेप होत होते. प्रश्न असा विचारला गेला होता की या नाडीग्रंथांच्या कथनाचा इतिहास सांगावा. त्याची सुरवात कुठे, कशी आणि कधी झाली यावर मार्गदर्शन करावे. त्याला उत्तर होते - असे उत्तर एका बैठकीत देता येणार नाही. वारंवार आलास तर थोडे थोडे करून जरूर मिळेल. हे सर्व संस्कृतमधून आले. या प्रश्नाचे उत्तर फक्त मला एकट्याला उपयोगाचे नव्हते. तर सार्वजनिक महत्वाचे होते. घरापासून २५-३० किमीदूर त्या केंद्रात वेळोवेळा जाऊन मी तासंतास बसून माझी प्रश्न विचारायची वेळ येईतोवर अनेकांचे अनुभव तपासत असे. (त्या केंद्रात फी आकारली जात नाही. त्यामुळे भरपूर गर्दी. आपण आपला प्रश्न विचारायच्या आधी आपण बरोबर आणलेली ब्लँक टेप वाचकाला द्यायची. ते आपल्या पुढ्यात ठेवलेल्या टेप रेकॉर्डरमधे ती घालून प्रश्न व काहीही न लिहिलेल्या ब्लँक कागदावरून मिळालेले उत्तर वाचतात. ते टेप होत असते. ती प्रश्नोत्तराची टेप नंतर प्रश्न कर्त्याला परत केली जाते.) माझी इतकी आंतरिक तळमळ पाहून नाडी वाचकाने उत्तराचे कथन माझी वाट न पाहता टेप करून ठेवतो म्हटले. आश्चर्य असे की त्यानंतर त्यानी काहीही केले नाही आणि माझी ती संस्कृत उत्तराची टेप मात्र गहाळ केली. काही गोष्टींना सुयोग्य समय यावा लागतो असे यावरून दिसते. असो. असेच एके ठिकाणी एका केंद्रात प्रश्ना्च्या उत्तरात पुढील काळाच्या संदर्भात महर्षींनी म्हटले आहे की काही काळानंतर हे कथन ताडपट्टयांऐवजी आधुनिक प्रणालीमधून प्रत्ययाला येईल. तेंव्हा त्यातील मजकूर इतरांना त्या त्या भाषेत कळायला लागेल. (जसे सध्या आपणाला माहित नसलेल्या भाषेतील मजकूर कॉम्पवरून आपणांस त्वरित भाषांतरित करून वाचता येऊ शकतो तसे असेल कदाचित.) काही काळाने म्हणजे किती वर्षांनी ते सांगा? असा खोचक प्रश्न विचारताच ते सुयोग्य वेळी कळेल. असे स्मित करून महर्षी सांगते झाले. पेन पासून ओसामा पर्यंत काही ही हरवलय ते शोधून द्या असे महर्षींची परीक्षा घ्यायला आलेल्या वात्रटांना हात धरून बाहेरचा रस्ता दाखवला जात असे. तर काही महत्वाच्या विचारणांना (विदेशी लोकांच्या सुद्धा) उत्तर मिळून त्याचा पडताळा येत असे. पण अशा गोष्टींची वाच्यता केली जात नाही. असो. असे हे महर्षीं कोण? त्यांचे नाव काय? असा प्रश्न पडला तर नवल नाही.....‍......

वाचने 6269
प्रतिक्रिया 35

प्रतिक्रिया

मी प्रश्न विचारले नाहीत, मी उत्तरे वाचणार नाही! ;) ह. घ्या! :) तुमच्या 'लगे रहो' वृत्तीचे मात्र कौतुक वाटते.

In reply to by मेघवेडा

ह्यात कौतुक करण्यासारखं काय आहे? च्यायला, आम्ही असं केलं की लगेच नाक मुरडून लोक निर्लज्जं आहे असं म्हणतात.. ;-)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

शशिकान्त'जी ही माहिती वाचकान्साठी खरोखरच उपयुक्त आहे. नेहमी आपण देत असलेल्या माहितीपेक्षा ही माहिती नक्कीच नवीन आणि औत्सुक्यवर्धक आहे.... अर्थात नदीच्या कडेला बसून पाण्यात नुसतेच खडे मारणार्‍यान्ना नदीच्या खोलीचा अन्दाज कधीच्च येत नाही... हे मात्र सत्य! ........... अजून येऊ देत.....

In reply to by मृगनयनी

अर्थात नदीच्या कडेला बसून पाण्यात नुसतेच खडे मारणार्‍यान्ना नदीच्या खोलीचा अन्दाज कधीच्च येत नाही... हे मात्र सत्य! मारुतीच्या बेंबीत बोट घातल्यावर लई थंड वाटतय की नाही? :) अवांतर- ओसामाला शोधण्यात काय अडचण होती हो? तेवढीच भारतीय नाडीला जगभर प्रसिद्धी मिळाली असती...आणि आम्हाला तुमच्या धाग्यांपासुन मुक्ती

In reply to by भाऊ पाटील

@-मारुतीच्या बेंबीत बोट घातल्यावर लई थंड वाटतय की नाही? खिक्क :bigsmile: अबाबाबाबा... हसू काही केल्या थांबत नाहीये... :-D अगागागा.... छप्पर उडालं...खिडक्या तुटल्या ;-) ....फाट फुट फट्याक....

In reply to by मृगनयनी

नाडीवाले ओकबाबा कि!!!!!!!!!!!!!!! चालु द्या. मिपावरही काही गिर्‍हाइकं मिळालेली दिसतात बाबांना. हाहाहा.... नदीच्या पुरात पोहणारा) भावश्या..

In reply to by मृगनयनी

>>नेहमी आपण देत असलेल्या माहितीपेक्षा ही माहिती नक्कीच नवीन आणि औत्सुक्यवर्धक आहे.... शिवाय ती या वेळी एकाच रंगाच्या अक्षरात टंकलेली आहे. :)

In reply to by मृगनयनी

मृगनयनी (संपादित) हा आय डी नेमक्या अशाच ठिकाणी आणि अशा प्रकारे कशी मताची पिंक टाकतो प्रत्येक वेळी ? बाकी भारताकडे असे हे अमोघ ओकास्त्र असूनसुद्धा आपण त्याचा पाकिस्तान बरोबरच्या दोन्ही लढायांत उपयोग केल्याचे ऐकिवात नाही,त्याचा जर वापर केला असता तर लाहोर कधीच भारताच्या ताब्यात असते आणि आणि आज जग दहशतवाद मुक्त असते !

सध्या त्या तमिल नाडीवाचकांच्या हाती आहेत म्हणून कदाचित त्या तमिलमधे असाव्यात. याचा अर्थ असा धरू शकतो का कि जर उद्या काही कारणास्तव त्या पट्ट्या आफ्रिकन जमातीच्या हातात पडल्या तर त्या पुरातन आफ्रिकन भाषेत आहेत.

मी अशा ताडपटट्ट्या नव्हे कागद पाहिले आहेत की त्यावर काहीही प्रत्यक्ष लिहिलेले दिसत नाही. : : काहीही न लिहिलेल्या ब्लँक कागदावरून मिळालेले उत्तर वाचतात. ते टेप होत असते.
:) मीही काहिहि बोलत नाही. तसही न लिहिलेले नाडी समर्थकांना वाचता येतेच ;)
असे स्मित करून महर्षी सांगते झाले
:) म्हंजे महर्षी दिसतातही? नाही त्यांनी स्मित केलेले तुम्हाला दिसले म्हणून शंका! बाकी, मला मात्र तुमच्या चिकाटीचे अजिबात कौतुक वाटत नाही. भविष्यकथनाचा धंदा उघडून लोकांना लुबाडणार्‍या कामाचा प्रसार करण्याचे अविरत कार्य करणार्‍यांचे कसले आलेय कौतुक

In reply to by ऋषिकेश

जाहिरात पुन्हा-पुन्हा देण्याला सहसा चिकाटी म्हणत नाहीत. इतकेच काय, ज्या ठिकाणी जाहिरात देण्याची कॉलमवार किंमत मोजावी लागत नाही, हँडबिल छपाईचा खर्च करावा लागत नाही, तिथे जाहिरात दररोज केली जात नाही -- हा म्हणजे चिकाटीचा अभाव म्हणावा! (कदाचित जाहिरातीची वारंवारिता किती असली तर ती सर्वाधिक परिणामकारक असते? त्याबाबत चाणाक्ष विचार केलेला असावा.)

In reply to by धनंजय

ऋषिकेश आणि धनंजय यांच्याशी सहमत आहे.
ओकांचा धागा अन "नाडीग्रंथ" विषय आला नाही तर काहींना चुकल्यासारखे वाटून काहींना निराशा वाटली -वाढली...म्हटले गेले म्हणून नाडीचा 'डोस' ...
बोटं घालून ओकार्‍या काढण्यासारखं आहे हे. नाड्या आणि ओकांचं या विषयाबद्दल कौतुक सर्वांनीच थांबवण्याची गरज वाटते.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

यावर तुमचे शास्त्रशुद्ध विवेचन कुठे उपलब्ध आहे ते कळविल्यास नाड्या आणि ओकांचं या विषयाबद्दल कौतुक सर्वांनीच थांबवण्याची गरज वाटते. यावर लवकरात लवकर एकमत होता येइल.

माझी इतकी आंतरिक तळमळ पाहून नाडी वाचकाने उत्तराचे कथन माझी वाट न पाहता टेप करून ठेवतो म्हटले. आश्चर्य असे की त्यानंतर त्यानी काहीही केले नाही आणि माझी ती संस्कृत उत्तराची टेप मात्र गहाळ केली. काही गोष्टींना सुयोग्य समय यावा लागतो असे यावरून दिसते. असो. टेप तुमच्याकडेच ठेवल्यावर गहाळ झाली असती तर एकवेळ समजू शकले असते पण ती टेप वाचकाकडे असताना गहाळ केली म्हणता आणि तरीही तुम्हाला काही समजत नाहीये का? की समजूनच घ्यायचं नाहीये??

In reply to by स्मिता.

त्या अशा पट्ट्या आपल्याला अभ्यासाला देऊ असे आश्वासन मिळते पण प्रत्यक्षात कधी तसे अद्याप घडले नाही कारण मी अशा ताडपटट्ट्या नव्हे कागद पाहिले आहेत की त्यावर काहीही प्रत्यक्ष लिहिलेले दिसत नाही मात्र सरसकट तो वाचावयास येणार नाही असे महर्षींनी बंधन घातले आहे तमिळलिपीतील मजकूर वाचता येतो पण अर्थबोध होत नाही वारंवार आलास तर थोडे थोडे करून जरूर मिळेल असा खोचक प्रश्न विचारताच ते सुयोग्य वेळी कळेल असे स्मित करून महर्षी सांगते झाले हात धरून बाहेरचा रस्ता दाखवला जात असे पण अशा गोष्टींची वाच्यता केली जात नाही अहो एवढ्या सगळ्या याच लेखातल्या वाक्यांवरून सुद्धा त्यांना काही बोध घेता आला नाहीये. एखाद्याने आपलं आयुष्य जर असल्याच गोष्टींमध्ये वाया घालवायचं ठरवलं असेल तर आपण काही करू शकतो का? आता त्यातून आर्थिक फायदा होत असेल तर वेगळी गोष्ट आहे. ओकांचा होत असेलच पण बाकीच्यांना तोटाच होतो. तेंव्हा असल्या भंपक गोष्टींकडे लक्ष न देणेच श्रेयस्कर. असे हे महर्षीं कोण? त्यांचे नाव काय? असा प्रश्न पडला तर नवल नाही.....‍...... असले मुर्खासारखे प्रश्न मलातरी पडले नाहीत. एवढे वरचे तुमचेच मुद्दे वाचून असा प्रश्न पडला तरच नवल.

१)नाडी विषयाचे गांभिर्य मुद्दाम कमी करायसाठी झटणाऱ्यांनी हे लेखन वाचले नाही तरी चालेल.---आपलं हे म्हणण अत्यंत योग्य आहे...फक्त आमची टिप्पणी अशी की, गांभीर्य मुद्दाम कमी करुन कमी होणारही नाही, समाजपरिस्थिती 'स्थिरं' झाली की ते तसही कमी होणारच आहे,किंबहुना तो पर्यंत ते लोप पावलेलं असेल २)त्या अशा पट्ट्या आपल्याला अभ्यासाला देऊ असे आश्वासन मिळते पण प्रत्यक्षात कधी तसे अद्याप घडले नाही, असो.--- अहो असं कसं बरं घडेल? जादुगारानी हेट तपासायला दिली... असं कधी घडतं का? ....अरे....हे$$$ट कायतरिच उगाच तुमचं आपलं? ३) प्रश्न असा विचारला गेला होता की या नाडीग्रंथांच्या कथनाचा इतिहास सांगावा. त्याची सुरवात कुठे, कशी आणि कधी झाली यावर मार्गदर्शन करावे. त्याला उत्तर होते - असे उत्तर एका बैठकीत देता येणार नाही. वारंवार आलास तर थोडे थोडे करून जरूर मिळेल. हम्म...यातले शेवटचे वाक्य तर फारच विचारकरण्या जोगे आहे हो... इथे नाडी महर्षी शास्त्राचा अत्यंतीक नाइलाज झाला आहे असे दिसते... फक्त अश्या वारंवार येणाय्राला विदाऊट फी सोडतात का हो?..सोडायला पाहीजेल ना? उगीच आपल्या चुकीचा गिह्रायकावर का भार? धंद्यातले शास्त्रार्थ असे अप्रामाणिक असतील,तर अर्थशास्त्र तरी प्रामाणिक हवं ना?

ओसीडी. मेडिकल नसला तर सोशल तरी नक्कीच. मूळ नाडी वगैरे बाबींचा वैयक्तिक प्रभाव हा वेगळा मुद्दा. त्याचे हे सार्वजनिकीकरण करण्याचा प्रयत्न ही ओसीडीच. दुर्लक्ष करणे हाच उपाय.

In reply to by श्रावण मोडक

श्रामोंशी असहमत. ही ओसीडी नाहीये. ह्याला जीसीडी म्हणतात. (संपुर्ण अर्थासाठी व्य. नी करा)

In reply to by विनायक प्रभू

हाच प्रतिसाद हवा होता. ;) बरं, मास्तर असं म्हणूया - ही आमची ओसीडी आहे. नाडी किंवा ओक दिसले रे दिसले की धागा उघडायचा, आणि मग त्यातल्या भंपकपणावरून मनस्ताप करून घेत प्रतिक्रिया देत बसायचं. पटतंय? ;)

ओकांची ही जाहिरात आहे आणि नाहीही. जाहिरात तर जाहिरात नाहीतर नुसतीच आग लावून गंमत बघितली असे करतात का अशी शंका येते. फ्रेंच, संस्कृत, मराठी आणि तमिळ अशा भाषा एकाच लेखात येणे ह्यावरून शंका आली. उद्या गरज पडली तर स्वाहिली, किंवा इटालियन अशाही भाषांमध्ये प्रश्न विचारले जाणे किंवा पट्ट्या उपलब्ध होणे असेही ओक आपल्या महर्षींच्या सहाय्याने करतील यात शंका नाही. हे एक थोतांडच आहे.

काय हे? इतकी वर्षे नाडी च्या लेखावर वाचकांच्या जोड्याने मारणा-या प्रतिक्रिया वाचून देखील ओकसाहेबांचे तेच नाडीगु-हाळ चालु असलेले पाहून ओकांना अद्याप इथल्या वाचकांची "नाडी" अचूकपणे ओळखता येत नाहीये का? आता हा विषय खरच बास करावा असे मनापासून सांगावेसे वाटते. मिपावरचा वाचक हा काहि लोकांना चु... वाटतोय का? का दर आठ दहा दिवसानी इथे येऊन तेच तेच गु-हाळ लावायला? मला वाटते की आता मिपावर ह्या विषयावर जाहीरपणे लिहायला/जाहिरात करायला खरच बंदी असावी. जे काही कोणाला जाहिरात/प्रसार करायचा असेल तो त्याने खव वा खाजगी व्यनि च्या माध्यमातून करावा. वा अगदी स्वतःची वेबसाईट काढावी. संपादक मंडळाने ह्या मागणीचा विचार करावा हि विनंती. बाकि काही वाचकांनी ते नेहमीचेच "चिकाटी" वगैरे लिहिणे आता बास करावे. खरच आताशा ह्या असल्या युसलेस नाडी धाग्यांचा अन त्या फुटकळ प्रतिक्रियांचा खुप कंटाळा आला आहे. अभिज्ञ.

In reply to by अभिज्ञ

ओकांना अद्याप इथल्या वाचकांची "नाडी" अचूकपणे ओळखता येत नाहीये का?
उलट मी तर म्हणेन की त्यांनी लोकांची नाडी अचुक हेरली आहे. :)

टोटल अनझेप ... हा काय प्रकार आहे 'नाडीपत्र ', 'नाडीग्रंथ' ?? :-o माझी नाडी तर मला पण कळते ...त्याचा तमिळ भाषा येण्याशी काय संबंध ? ( होपफुली ... याच नाडी बद्दल चर्चा चाललीये )

सध्या हा धागा मी प्रतिसाद देउन वर आणतोय. म्हणजे कस की:- १. साहेबांना पुन्हा वेगळा धागा काढायचे कष्ट नको. २.ज्यांना नाडीपट्टी वगैरे आवडत नाहित, त्यांना नवीन लेख वाचून "आवडला/पटला नाही" वगैरे पुनः पुनः सांगत वाद घालायला नवी जागा शोधायचे कष्ट नको. ३.नाडीपट्टीप्रेमींनाही सारखा सारखा आपला धागा वर बघून आनंद मावेनासा होत गगन पुरेसे न होवो. ह्या बदल्यात काय? तर मला आपला जमेल तेव्हढा हा धागा वर काढत रहावा लागेल. इतके करूनही "काहींना चुकल्यासारखे वाटून काहींना निराशा वाटली -वाढली" असेल तर साहेब अस्साच नवनवीन "डोस" युगानुयुगे देत रहायला समर्थ आहेतच. ओकांच्या चिकाटीपेक्षा त्यांच्याशी तावातावाने वाद घालणारे आणि "चुकल्यासारखे वाटून" साहेबांना आठवण करुन देणारे ह्यांच्या चिकाटीचेच जास्त कौतुक आहे. आणि साहेबांनी नवीन संस्थळ सुरु करावे असे सुचवणार्‍यांना एक आयडीआ:- त्यापेक्षा इतर सगळ्यांनीच इथून पोबारा केला आणि हे स्थळ मुक्तहस्ते नाडीसमर्पित केले तरी तोच effect येणार नाही का? तुमच्याकडे एकत्रितपणे निघून जाण्याचे संघटन नाही म्हणून उगाच विनाकारण साहेबांनाच बंदीची भाषा बोलताय; आनंद आहे!

In reply to by मन१

१. साहेबांना पुन्हा वेगळा धागा काढायचे कष्ट नको.
इतिहासाकडे पाहता ही अडचण असावी असे दिसत नाही. अडचण असली तरी तिचे फळ जास्त गोड असावे कदाचित.
ज्यांना नाडीपट्टी वगैरे आवडत नाहित, त्यांना नवीन लेख वाचून "आवडला/पटला नाही" वगैरे पुनः पुनः सांगत वाद घालायला नवी जागा शोधायचे कष्ट नको.
व्हेरी इंटरेस्टिंग! म्हणजे लोकांना सतत धागा वर दिसून ओकांची जाहिरात होत रहावी असा उद्देश आहे काय तुमचा?
ओकांच्या चिकाटीपेक्षा त्यांच्याशी तावातावाने वाद घालणारे आणि "चुकल्यासारखे वाटून" साहेबांना आठवण करुन देणारे ह्यांच्या चिकाटीचेच जास्त कौतुक आहे.
हम्म. म्हणजे शंभर माणसं एका माणसाला सातत्याने विरोध करत आहेत तरी त्या एकट्या माणसापेक्षा शंभर माणसांची चिकाटी जास्त आहे असं म्हणताय. वा! ग्रेटच आहात राव तुम्ही, गणित कुठे शिकलात हो? ;-)
त्यापेक्षा इतर सगळ्यांनीच इथून पोबारा केला आणि हे स्थळ मुक्तहस्ते नाडीसमर्पित केले तरी तोच effect येणार नाही का?
वा! वा!! वा!!! तुमच्या चिकाटीबद्दल आता काय बोलू! जिनिअस! शंभर जाहिरात न करणार्‍या लोकांनी जाणं हे एका जाहिरातबाजाने जाहिरात बंद करण्यापेक्षा सोपं आहे तर! कमाल आहे राव तुमची, हे आम्हाला का नाही सुचलं कोणास ठावूक! बाकी, हेच लॉजिक वापरून खालील काही उपाय करता येतील काय? गावात कोणी चोर आला तर त्याला पकडून, डांबण्यापेक्षा इतर सर्वांनी गावच सोडू जावे. आपल्या शरीरात व्हायरस इन्फेक्शन झाले तर आत्माल्या शरीर सोडून जाणे सोपे असे सांगावे. भ्रष्ट नेते देशात असतील तर देश सोडून जाणे वगैरे.
तुमच्याकडे एकत्रितपणे निघून जाण्याचे संघटन नाही म्हणून उगाच विनाकारण साहेबांनाच बंदीची भाषा बोलताय; आनंद आहे!
बोंबला तिच्यायला, आमच्याकडे एकत्रित निघून जाण्याइतकं संघटन असतं तर एखाद्याला निघून जायला सांगितलं कशाला असतं? संघटीतपणा वापरून त्या एखाद्याच्या पार्श्वभागावर लाथ घालून हाकलला नसता? *डिस्क्लेमरः सदर प्रतिसादात फक्त तात्विक पातळीवर उहापोह केलेला आहे, कोणाही विषयी वैयक्तिक टिप्पणी केलेली नाही.

In reply to by Nile

>>भ्रष्ट नेते देशात असतील तर देश सोडून जाणे वगैरे. देश सोडून जाणारे लोक प्रिसाइजली हेच कारण देतात असे वाटते. :) (चर्चा नाडी विषयावरून दुसरीकडे वळवण्याचा ही आणि हि प्रयत्न) ;) (हलकट) नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

गोष्टी किती आवाक्यातल्या आहेत त्यावरही बरेच अवलंबून असते मालक. आय डी उडवणे ही अजून अशक्यकोटीतली गोष्ट झालेली नाही. आणि आयडीचे खेळ खेळत बसण्यातून कुठल्याही व्यक्तिला किंवा त्याच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका नाही!

In reply to by Nile

आमचा उपाय चुकलाच. अजून एक उपाय कसा वाटतो बघा :- साहेबांना नक्की किती नाड्यांची रक्कम वर्गणी म्हणून दिली तर त्यांच्या तावडीतून सोडतील हे समजलं तर बरयं. हप्त्यांनी वगैरे द्यायची सोय आहे का. भविष्यात रक्कम द्यायचा एखादा करार केला गेला तर चालेल का?