मित्र हो,
हरदासाची कथा मुळपदावर?....
ओकांचा धागा अन "नाडीग्रंथ" विषय आला नाही तर काहींना चुकल्यासारखे वाटून काहींना निराशा वाटली -वाढली...म्हटले गेले म्हणून नाडीचा 'डोस' ...
नाडी विषयाचे गांभिर्य मुद्दाम कमी करायसाठी झटणाऱ्यांनी हे लेखन वाचले नाही तरी चालेल.
एका धाग्यावरील माहिती विचारताना म्हटले गेले.
१) प्रश्न - नाड़ी पत्र वाचून झाल्यावर त्या पत्राचे काय केले जाते ?
उत्तर - ती नाडीग्रंथाची ताडपट्टी परत त्याच ताडपट्ट्यांच्या बंडलात गुंडाळून ठेवली जाते.
यावर असे का? असा प्रश्न उपस्थित होतो. त्याला उत्तर असे की अनेक पट्ट्य़ात त्याच पट्टीतील काही भागात दुसऱ्या व्यक्तिचे कथन असते म्हणून ते परत दुसऱ्या व्यक्तीसाठी तयार हवे म्हणून होते तसे गुंडाळून ठेवले जाते. अशा पट्ट्या नंतर काही काळाने जीर्ण वा खराब झाल्यास वाहत्या पाण्यात विसर्जन केल्या जातात. असे केंद्रातर्फे सांगतात. त्या अशा पट्ट्या आपल्याला अभ्यासाला देऊ असे आश्वासन मिळते पण प्रत्यक्षात कधी तसे अद्याप घडले नाही, असो.
२) प्रश्न - ही पत्रे तमिल भाषेतच असतात का ? संस्कृत भाषेत का नसतात ?
उत्तर - याचे उत्तर मी आपणाला विचारतो की तुम्ही मराठीतून का लिहिता? संस्कृत मधून का नाही? यावर आपण उत्तर द्याल की मला जी भाषा येते व ज्या भाषेतून ते कथन करायला शक्य आहे. म्हणून ती भाषा वा माध्यम मी स्वीकारतो. सध्या त्या तमिल नाडीवाचकांच्या हाती आहेत म्हणून कदाचित त्या तमिलमधे असाव्यात. आपला एक समज आहे की संस्कृत हीच सर्व भाषांची भाषा आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतच्या प्रेमापोटी वा आदरापायी आपणास असे वाटत राहते की असे ज्ञानाचे भांडार संस्कृत मधून का नाही?
खरे तर असे महर्षींनी म्हटले आहे की भाषा कोणती असली तरी त्याचा आम्हाला फरक पडत नाही. कारण मी अशा ताडपटट्ट्या नव्हे कागद पाहिले आहेत की त्यावर काहीही प्रत्यक्ष लिहिलेले दिसत नाही,(बोल्ड अशासाठी की यावर प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय विश्वास ठेवणे अशक्य आहे असा माझा स्वतःचा अनुभव आहे. हवाईदलातील काही अविश्वासी मित्र तर शर्तीवर मला खोटे पाडायच्या इराद्याने येत. तेथील प्रत्यक्ष अनुभवाने चक्राऊन जात. पाहून अनुभवलेले असूनही प्रांजलपणे मान्य करायला पुर्वग्रहांमुळे संकोच वाटून 'सगळे थोतांड आहे" असे मोघम म्हणून आपली सुटका करत माझे तोंड चुकवत. ) पण वाचकाला त्यात अक्षरे निऑन साईनच्या प्रकाशाप्रमाणे प्रकाशित होऊन दिसतात. (नाडीवाचकाला विचारले की जसे तुम्हाला दिसते तसे इतरांना ही दिसेल का त्यावर ते म्हणाले की हो असे काही जण आहेत त्यांना महर्षींच्या आदेशाने तो मजकूर वाचता येईल. मात्र सरसकट तो वाचावयास येणार नाही असे महर्षींनी बंधन घातले आहे. असे वाचकांनी सांगितले.)
मी त्या केंद्रात असे ही अनुभवले की काही वेळा नाडीवाचक म्हणतो की मला खालील ओळीतील तमिळलिपीतील मजकूर वाचता येतो पण अर्थबोध होत नाही. कळत नाही पण महर्षी म्हणतात की प्रश्नकर्त्याला त्याच्या भाषेत उत्तर हवे म्हणून मी त्याला त्याच्या भाषेत उत्तर देत आहे. ते तू त्याला वाचून सांग. तुला कळले नाही तरी. हे घडले तेव्हा प्रश्न फ्रेंच भाषेत विचारला गेला होता.
एकदा मी संस्कृतमधून प्रश्न विचारले. त्याची उत्तरे मला त्याच भाषेतून मिळावीत असे म्हटले होते. त्यावर सुरवातीचा काही मजकूर तमिळ मधून आला व त्यात महर्षींनी वाचकाला सांगितले की यापुढील मजकूर पृच्छकाच्या इच्छेखातर त्याला हव्या त्या भाषेत मिळेल. असे म्हणून त्यानंतरचे कथन संस्कृतमधून आले. ते सर्व टेप होत होते. प्रश्न असा विचारला गेला होता की या नाडीग्रंथांच्या कथनाचा इतिहास सांगावा. त्याची सुरवात कुठे, कशी आणि कधी झाली यावर मार्गदर्शन करावे. त्याला उत्तर होते - असे उत्तर एका बैठकीत देता येणार नाही. वारंवार आलास तर थोडे थोडे करून जरूर मिळेल. हे सर्व संस्कृतमधून आले. या प्रश्नाचे उत्तर फक्त मला एकट्याला उपयोगाचे नव्हते. तर सार्वजनिक महत्वाचे होते. घरापासून २५-३० किमीदूर त्या केंद्रात वेळोवेळा जाऊन मी तासंतास बसून माझी प्रश्न विचारायची वेळ येईतोवर अनेकांचे अनुभव तपासत असे. (त्या केंद्रात फी आकारली जात नाही. त्यामुळे भरपूर गर्दी. आपण आपला प्रश्न विचारायच्या आधी आपण बरोबर आणलेली ब्लँक टेप वाचकाला द्यायची. ते आपल्या पुढ्यात ठेवलेल्या टेप रेकॉर्डरमधे ती घालून प्रश्न व काहीही न लिहिलेल्या ब्लँक कागदावरून मिळालेले उत्तर वाचतात. ते टेप होत असते. ती प्रश्नोत्तराची टेप नंतर प्रश्न कर्त्याला परत केली जाते.)
माझी इतकी आंतरिक तळमळ पाहून नाडी वाचकाने उत्तराचे कथन माझी वाट न पाहता टेप करून ठेवतो म्हटले. आश्चर्य असे की त्यानंतर त्यानी काहीही केले नाही आणि माझी ती संस्कृत उत्तराची टेप मात्र गहाळ केली. काही गोष्टींना सुयोग्य समय यावा लागतो असे यावरून दिसते. असो.
असेच एके ठिकाणी एका केंद्रात प्रश्ना्च्या उत्तरात पुढील काळाच्या संदर्भात महर्षींनी म्हटले आहे की काही काळानंतर हे कथन ताडपट्टयांऐवजी आधुनिक प्रणालीमधून प्रत्ययाला येईल. तेंव्हा त्यातील मजकूर इतरांना त्या त्या भाषेत कळायला लागेल. (जसे सध्या आपणाला माहित नसलेल्या भाषेतील मजकूर कॉम्पवरून आपणांस त्वरित भाषांतरित करून वाचता येऊ शकतो तसे असेल कदाचित.)
काही काळाने म्हणजे किती वर्षांनी ते सांगा? असा खोचक प्रश्न विचारताच ते सुयोग्य वेळी कळेल. असे स्मित करून महर्षी सांगते झाले. पेन पासून ओसामा पर्यंत काही ही हरवलय ते शोधून द्या असे महर्षींची परीक्षा घ्यायला आलेल्या वात्रटांना हात धरून बाहेरचा रस्ता दाखवला जात असे. तर काही महत्वाच्या विचारणांना (विदेशी लोकांच्या सुद्धा) उत्तर मिळून त्याचा पडताळा येत असे. पण अशा गोष्टींची वाच्यता केली जात नाही. असो.
असे हे महर्षीं कोण? त्यांचे नाव काय? असा प्रश्न पडला तर नवल नाही...........
वाचने
6269
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी प्रश्न विचारले नाहीत, मी
+ १
In reply to मी प्रश्न विचारले नाहीत, मी by बिपिन कार्यकर्ते
कसलं मेलं कौतुक?
In reply to + १ by मेघवेडा
शशिकान्त'जी ही माहिती
In reply to मी प्रश्न विचारले नाहीत, मी by बिपिन कार्यकर्ते
अर्थात नदीच्या कडेला बसून
In reply to शशिकान्त'जी ही माहिती by मृगनयनी
पाटील भाऊ... अवो काय व्हो ह्ये....अगागा $गा $गा खपलो पार
In reply to अर्थात नदीच्या कडेला बसून by भाऊ पाटील
जय हो!!!!!!!!!
In reply to शशिकान्त'जी ही माहिती by मृगनयनी
+
In reply to शशिकान्त'जी ही माहिती by मृगनयनी
हा आय डी
In reply to शशिकान्त'जी ही माहिती by मृगनयनी
ओकसाहेब. प्रथमच सरळसोट
सहमत
In reply to ओकसाहेब. प्रथमच सरळसोट by गवि
सध्या त्या तमिल
:)
+ :-|
In reply to :) by ऋषिकेश
+२
In reply to + :-| by धनंजय
यावर तुमचे शास्त्रशुद्ध
In reply to +२ by ३_१४ विक्षिप्त अदिती
टेप गहाळ
:) :)
In reply to टेप गहाळ by स्मिता.
१)नाडी विषयाचे गांभिर्य
इंटरेस्टींग आहेत किस्से. मजा
ओसीडी
एकदम चूक
In reply to ओसीडी by श्रावण मोडक
हाच
In reply to एकदम चूक by विनायक प्रभू
अरे देवा!
जाहिरात आणि गंमत बघणे
अरेरे....
ओकांना अद्याप इथल्या वाचकांची
In reply to अरेरे.... by अभिज्ञ
टोटल अनझेप
अहो, जरा ओकांचे मागचे पुढचे
In reply to टोटल अनझेप by कुळाचा_दीप
वाचकांना मदत म्हणून एक गोष्ट करतोय.
इंटरेस्टिंग.
In reply to वाचकांना मदत म्हणून एक गोष्ट करतोय. by मन१
देश
In reply to इंटरेस्टिंग. by Nile
गोष्टी
In reply to देश by नितिन थत्ते
१००% मान्य
In reply to इंटरेस्टिंग. by Nile
च्या मारी आता उद्या पास्न