पुढे वाचायला उत्सुक.. (साधारण कथा कशी जाऊ शकेल याचा अंदाज येतो आहे, पण तरी खात्री नाही, आणि उत्सुकता वाटते आहे)
आमच्या शाळेत दुसरीत असताना मुले-मुली फार बोलतात म्हणून दोन मुलांच्या मध्ये एक मुलगी, आणि दोन मुलींमध्ये एक मुलगा अशी रचना केली होती ते आठवते. अर्थात काही उपयोग झाला नव्हता :-)
दंगेखोर, मस्तीखोर प्रियाली,
सह्ही लिहिलं आहेस. वाचता वाचता अचानक खूप वर्ष मागे गेलो अन् हळवा झालो.
लहानपण देगा देवा,
मुंगी साखरेचा रवा
या गाण्याची आठवण झाली!
येऊ द्या अजूनही... वाचायला मौज वाटते आहे! :)
आपला,
(शाळेत प्रचंड मस्ती केलेला, बाकावर उभा, किंवा वर्गाच्या बाहेर!) तात्या.
अवांतर - बाकी पाल हा आमचा अत्यंत लाडका प्राणी आहे. जिवंत पाल पकडून हातात धरून तिच्याशी क्षंणभर गप्पा मारायला मला फार आवडतं! अतिशय गरीब अन् घाबरट प्राणी, परंतु चिलटा-झुरळांपासून घर मात्र अगदी स्वच्छ ठेवतो! :)
आपला,
(पालप्रेमी) तात्या.
मौज बिज वाटेल अशा गोष्टी मी सहसा लिहित नाही हो ;) कोण जाणे, ही देखील तशी नसावी गोष्ट.
पण शाळेत अशी धमाल जाम करायचो आम्ही आणि चित्राने सांगितल्यासारखं बाईंच्या शिक्षाबिक्षांचा काही उपयोग होत नसे.
पूर्वरंग चागली पकड घेतो आहे...
वर्गातल्या काही काकूबाई हे ऐकून काय हिरमुसल्या झाल्या होत्या... बावळट कुठल्या? मला मुलांशेजारी बसायला आवडतं आणि बहुतेक मुलांनाही मुली बाजूला बसलेल्या आवडतात. तसं ते दाखवत नसले म्हणून काय झालं, मला माहित आहे की त्यांना ते आवडतं. उगीच कुठल्यातरी काकूबाई शेजारी बसून "ए तू माझ्या वहीत डोकावू नकोस" नाहीतर "अय्या! तो राजू बघ कसा चोरून बघतो आहे" अशा बायकी गोष्टी करण्यापेक्षा वर्गातल्या एखाद्या उंचपुर्या, थोड्याशा घोगरट आवाजाच्या मुलाशेजारी बसण्यात वेगळीच मजा असते.
व्वा झकास! धिस इज रेअर!! एका शाळकरी मुलीच्या मनातील समवयस्क मुलांबद्दलचे विचार वाचायला गंमत वाटली...
पुढे वाचण्यास उत्सुक!
उंचापुरा, एकेकाळी घोगरट आवाज असलेला, (ह. घ्या)
डांबिसकाका
प्रतिक्रिया
बिचारा गबाळ्या....
रंगतदार
:)
तात्या
In reply to :) by विसोबा खेचर
मजा येते आहे..
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
छान आहे...
काय इब्लिस कार्टी आहे
१००% सहमत
In reply to काय इब्लिस कार्टी आहे by धनंजय
धन्यवाद
+१
In reply to धन्यवाद by प्रियाली