एक किस्सा नरकातला
लेखनप्रकार
या जगात भरपुर पापे वाढली,आणी ........................
लोक मेल्यावर यम आपल्या रेडयावर येवुन सगळयाना चित्रगुप्ताकड नेत होता.चित्रगुप्त आत्माला एकेक करुन बोलवायचा पापाची बेरीज करुन हिशोब करुन, मग त्याप्रमाणॅ स्वर्ग अथवा नरकात पाठवायचा.या जगात भरपुर पापे वाढली,आणी स्वर्ग ओस पडू लागला आणी नरकात खुप गर्दी झाली.स्वर्गात अप्सरा,बागा,मदीरा आणी भरपुर मजा होत्या,तर नरकात होते चाबकाचे फटके,उकळलेले तेल.स्वर्ग आणी या मधे होती एक भिन्त,पापी आत्मे खुप बदमाश.त्याना स्वर्गात काय चालले आहे हे पाहायचे होते, त्या सर्वानी भिन्तीला छीद्र पाडायला सुरवात केली.त्याना स्वर्ग खुप आवडायला लागला ,पण तीकड जाणार कसे? या विचारात असताना अचानक छीद्र मोठे करुन एकेक आत्मा शॉर्टकटने स्वर्गात जावु लागला.हे पाहून चित्रगुप्ताला खूप राग आला,तो त्या पापी आत्म्याना म्हणाला," हे पहा तुम्हाला असे करता येणार नाही''.
त्यावर पापी आत्मे म्हणाले,"काय करशील तू"? तेव्हा चिडलेला चित्रगुप्त म्हणाला,"मी ब्रह्मदेवकडे तुमच्यावर केस फाईल करीन", त्यावर पापी आत्मे म्हणाले,"काळजी नकोस तु केस केलीस तरी सगळे वकील आमच्याकडेच पडून आहेत" !
वाचने
3886
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
:) मस्त !
आत्ताच आलेल्या माहिती नुसार चित्रगुप्ताने तिहार जेलला नरकाच स्वागत कक्ष म्हणून मान्यता दिली आहे :)
अरे वा, छान आहे हं पाकृ. या विकांताला करुन बघेन. पण एक प्रश्न आहे, वरुन तिसरा आणि खालून शेवटचा फोटो असा का आलाय? म्हणजे छान आलाय, परंतू आयएसो जरा वाढवला असता तर स्पष्टं आला असता. आणि शेवटच्या दोन ओळी तर लाजवाब. यमक आहेच, पण वृत्तातही चपखल बसतंय.
In reply to अरे वा, छान आहे हं पाकृ. या by अनामिक
ही पाकृ अंडं न घालता कशी बनवता येइल ते नाही विचारले?
पोट फुटेस्तोवर हसलो. वेडा झालो. वेडेपण्याच्या झटक्यात हे कुविडंबन लिहिले आहे....
----
या जगात भरपुर पुण्यं झालं, सत्कर्मे वाढली, आणी......
लोक मेल्यावर यम आपल्या रेडयावर येवुन सगळयाना चित्रगुप्ताकड नेत होता.चित्रगुप्त आत्म्याला एकेक करुन बोलवायचा पापाची बेरीज करुन हिशोब करुन, मग त्याप्रमाणे स्वर्ग अथवा नरकात पाठवायचा. या जगात भरपुर सत्कर्मे वाढली, आणी नरक ओस पडू लागला आणी स्वर्गात खूप गर्दी झाली. स्वर्गातल्या बागा, मदिरा, इतर मजा आणी अप्सरा सगळ्याच गोष्टी कमी पडू लागल्या. आता काय करावे असा गंभीर पेच देवांसमोर उभा राहिला. शेवटि असा मार्ग निघाला की त्यातल्या त्यात कमी पुण्यंवाण लोकांनां नरकात रिलोकेट करावे. तेव्हा नरक आणी स्वर्गातल्या भिंतीला भोक पाडुन कमी पुण्यवान आत्म्यांना नरकात पाठवणे सुरु झाले. कमी पुण्यवान आत्मे धास्तावले, पण बर्याच दिवसांनी कोणीतरी आले म्हणुन नरकवासीयांनी त्यांचे जंगी स्वागत केले. नरकातली मोकळी चोकळी जागा बघुन हे नवे आत्मेही सुखावले. हळु हळु अजुन कमी पुण्यवान आत्मे स्वर्गातुन नरकात येउ लागले. तशी नरकवासीयांची चिंता वाढायला लागली. हा लोंढा थांबवायचा कसा हा विचार करत असतांनाच त्यांनी अचानक ते मोठे भोक छोटे करुन बुजवुन टाकले. हे पाहुन चित्रगुप्ताला खुप राग आला.
तो नरकातल्या आत्म्यांना म्हणाला "तुम्ही असे करु नका. नाहितर मी नवी भोके पाडिन" त्यावर नरकातले आत्मे म्हणाले "काळजी करु नकोस, काहिही झाले तरी बिल्ड्रर्स नरकातच पडून आहेत".
----
:p हे आमचे मिपावरचे पहिले पातक :p
हाहाहा.. हसुन हसुन मेलो..
- पिंगू
अहो म्याडम .... हे फेसबुक नाही की ऑर्कुट कम्युनिटी नाही .....
उगाच पांचट जोक चे धागे काढू नका. नवीन संकेत स्थळावर आलाय तर इथे कसे लिहीले जाते, कोण लिहीते वगैरे जरा बघा की ... का रजिस्टर केलं की लगेच चार चार ओळीचे पांचट धागे काढायला सुरूवात?
तसा मी विचार करतेय की हा आयडी नवा आहे... पण सदस्य तर जुना नाही ना? मुद्दाम गदारोळ करायला असे धागे
चांगले असतात हेही जुन्या सदस्यांना माहीत असतेच!
In reply to अहो म्याडम .... हे फेसबुक by सविता
उगाच पांचट जोक चे धागे काढू नका. नवीन संकेत स्थळावर आलाय तर इथे कसे लिहीले जाते, कोण लिहीते वगैरे जरा बघा की ... का रजिस्टर केलं की लगेच चार चार ओळीचे पांचट धागे काढायला सुरूवात?सहमत आहे. तुम्ही 'अवलियाशेठ कुठे गेले' किंवा 'माझ्या चौर्याच्या (??) सुरस कथा!!!!' अशा प्रकारच्या लेखनाने सुरुवात करायला हवी होती.
In reply to अगदी अगदी by परिकथेतील राजकुमार
खरं की ... चुक्याच मेरा.....
आधी तुमच्याकडे येऊन विचारायला पाहि़जे होतं.... मग मी पण नाना..चौपाटी..विषयक गहन लेखपण लिहीले असते काय सांगावं?
In reply to अगदी अगदी by परिकथेतील राजकुमार
सातपूर औद्योगीक वसाहतीत वस्तीला असणारांना विचारून बघा बॉ एकदा !!
परत येवु देत अजुन ज्योक.
स्वर्गात अप्सरा,बागा,मदीरा आणी भरपुर मजा होत्या,
आणि भरपूर मजा काय होत्या हे जाणून घ्यायला आवडेल.
बाकी आयुष्यात इतका चांगला विनोद पहिल्यांदाच वाचला म्हणून आभार.
मस्त ! आत्ताच आलेल्या माहिती