रिक्षात बसून अर्थातच उज्वल्ल भवितव्याकडे. जेव्हा देशातली सर्व मुले अशी शाळेत जायला लागतील तेव्हा कदाचित या गुन्ह्यांचे प्रमाण थोडेफार कमी होईल असे वाटते. एका पालकाची चिंता मुलाच्या आणि देशाच्या भवितव्याबद्दलची, आपण उत्तमपणे व्यक्त केली आहे.
पुण्याचे पेशवे
छान कल्पना. गंभीर विचार.
> डोळ्यासमोर तरळत राहते दप्तरांनी लगडलेली रिक्षा
> आणि रिक्षातल्या मुलांचे ते निष्पाप, निरागस, गोड चेहरे...
या दोन ओळी खोडल्यात तर शेवटच्या ओळीचा हिसका मला तरी अधिक बसला असता. या दोन ओळींमध्ये नवे काही नाही, मुलांच्या रिक्षेचे ते हृद्य चित्र आधीच मनावर प्रभावी शब्दांनी बिंबवले आहे - या दोन ओळींनी काही नवीन भावना मला तरी जाणवत नाही. पण "भेडसावणे" प्रतिमेत व्यत्यय आणून शेवटच्या ओळीचा हादरा कमी करतात.
कुठल्याही संवेदनक्षम व्यक्तिला स्पर्श करेल अशी कविता.
एक "यंग पेरेंट" या नात्याने असे प्रश्न सतावत असतातच. आपण आपल्या मुलांना कुठला वारसा देतो आहोत ? त्याना कुठल्या जगात आपण आणले आहे ? इतर काहीशे कोटींबरोबरचे त्यांचे या पृथ्वीवरचे अस्तित्व कसे असेल ?
हा सगळा मनोव्यापार गमतीशीर आहे खरा. मुले होणे ही आपली गरज ; त्यांचे संगोपन, वाढ नीट होणे ही आपलीच गरज, त्यांच्या व्यक्तिगत विकासाची आणि भविष्याची काळजी करणे ही देखील आपली मानसिक गरजच. आणि त्यांच्या व्यक्तिगत सुखदु:खांबरोबर , ते ज्या पीढीचे , काळाचे भाग बनणार त्यातील जग कसे असेल ? त्यांचा निभाव लागेल का ? याचा विचार करत बसणे हेदेखील आपल्याच मानसिक गरजेतून आलेले.
गडकर्यांनी या प्रवृत्तीचे एक वर्णन "चिंतातुर जंतु" असे केले आहे. कुणी म्हणतो , "आप मेला , जग बुडाला !" हे काही असले तरी इतराना आपापल्या काळज्यातून सुटका ही नाहीच !
हम्म्म्म...
कठीण प्रश्न टाकलात!
व्वा!
कविता आवडली.
सुंदर
गंभिर
सुन्न!
अप्रतिम कविता
आहे खरं
कविता आवडली.