मोबाईल बँकिंग बद्दल माहिती हवी होती . एसेमेस द्वारे बँक बलन्स समजतो ,रक्कम जमा /वजा झाल्याचे समजते . इतपत माहिती आहे मला . पण आर्थिक व्यवहार कसे होतात ?खात्यातील पैसे दुसर्यांना कसे देता येतात ? आणखी हे व्यवहार कितपत सेफ /सुरक्षित आहेत ? आपला मोबाईल दुसर्याच्या हातात पडला /किवा चोरी ला गेला तर काही गैर व्यवहार आपल्या खात्यातून होण्याची शक्यता आहे का? मोबाईल बँकिंग ने होणारा व्यवहार क्रेडीट /डेबिट कार्डा पेक्षा सुरक्षित आहे का ?--मोबाईल बदलला कि व्यवहार ठ्ठप होतील का? --ज्या मोबाईल वरून हे व्यवहार करायचे तो स्वतः चाच असला पाहिजे का ?--आणि असल्यास त्या बद्दल बॅंके ला खातरजमा (KYC ) कशी करता येईल जर तो मोबाईल प्रि पेड असेल तर ? असे बरेच से प्रश्न पडले आहेत मला --आणि आता मोबाईल बँकिंग चेच युग सुरु होण्याची चिन्हे दिसत आहेत -म्हणून हि माहिती करून घेण्याची इच्छा आहे ----अजित गद्रे
मिसळपाव
प्रतिक्रिया
थोडा गुगलनेका ना पहिले
थोडा गुगलनेका ना पहिले ;)
हो
In reply to थोडा गुगलनेका ना पहिले by परिकथेतील राजकुमार
हो आणि या साठी गुगळ्यांची परवानगीपण नाही लागत ;)
ह. घ्या.
गुगलून झाले तरी पण
In reply to थोडा गुगलनेका ना पहिले by परिकथेतील राजकुमार
गुगलून झाले तरी पण आपल्या बँकेची मोबाईल बँकिंग सर्विस कितपत चांगली आहे . सुरक्षिततेसाठी काय काय सुविधा ते देतात ते पहा.
आपला चिपळूणकर
ते फार्फार धोकादायक है राव, लांबच रहाणं योग्य.
उगा कोनी रीडायल/सेंट मेसेजेस बटन दाबून तूमच सगळ एक्सेस हैक केले तर ?
;)
गंमत म्हणून प्रतीक्रीया लीहली है
मोबाईल बँकिंग बद्दल मी फेसबुक
मोबाईल बँकिंग बद्दल मी फेसबुक वर दोन ग्रुप मध्ये विचारले होते . तसेच माझ्या काही मित्रांना हि लिहिले होते . त्या पैकी एक मित्र ने एक पीडीएफ फाईल पाठवली आहे . ती आताच मिळाली . समजायला जरा क्लिष्ट वाटत आहे पण मिसळपाव वरील "तज्ञा" ना ती जड जाणार नाही अशी खात्री आहे . . कारण मला समजायला जड जात आहे . तरी तज्ञ त्या वर प्रकाश टाकतील अशी आशा आहे -सोबत धागा दिला आहे ---
https://mail-attachment.googleusercontent.com/attachment?ui=2&ik=de1326…
प्रकाश टाकण्या वरुन आठवल मिपा
In reply to मोबाईल बँकिंग बद्दल मी फेसबुक by अजितजी
प्रकाश टाकण्या वरुन आठवल मिपा वर दोनच समुह आहे एक म्हणजे दिवे लावणारे आणि दुसरे दिवे मालवणारे :)
तुम्ही इतकी गंभीर सामाजिक आणि वैश्विक समस्या मांडली आहे तर सध्या जागा सविस्तर उत्तरा साठी राखून ठेवतो.
स्पष्ट मत
बँकेचे व्यवहार मोबाईलवरून करायला लागावेत अशी परिस्थिती कधीही नसते.
नितिन ...तुझ्या मताशी सहमत
In reply to स्पष्ट मत by नितिन थत्ते
नितिन ...तुझ्या मताशी सहमत .!!!!!!!!