Skip to main content

मोबाईल बँकिंग बद्दल माहिती हवी होती

लेखक अजितजी यांनी बुधवार, 28/09/2011 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाईल बँकिंग बद्दल माहिती हवी होती . एसेमेस द्वारे बँक बलन्स समजतो ,रक्कम जमा /वजा झाल्याचे समजते . इतपत माहिती आहे मला . पण आर्थिक व्यवहार कसे होतात ?खात्यातील पैसे दुसर्यांना कसे देता येतात ? आणखी हे व्यवहार कितपत सेफ /सुरक्षित आहेत ? आपला मोबाईल दुसर्याच्या हातात पडला /किवा चोरी ला गेला तर काही गैर व्यवहार आपल्या खात्यातून होण्याची शक्यता आहे का? मोबाईल बँकिंग ने होणारा व्यवहार क्रेडीट /डेबिट कार्डा पेक्षा सुरक्षित आहे का ?--मोबाईल बदलला कि व्यवहार ठ्ठप होतील का? --ज्या मोबाईल वरून हे व्यवहार करायचे तो स्वतः चाच असला पाहिजे का ?--आणि असल्यास त्या बद्दल बॅंके ला खातरजमा (KYC ) कशी करता येईल जर तो मोबाईल प्रि पेड असेल तर ? असे बरेच से प्रश्न पडले आहेत मला --आणि आता मोबाईल बँकिंग चेच युग सुरु होण्याची चिन्हे दिसत आहेत -म्हणून हि माहिती करून घेण्याची इच्छा आहे ----अजित गद्रे

वाचने 2793
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

In reply to by परिकथेतील राजकुमार

हो आणि या साठी गुगळ्यांची परवानगीपण नाही लागत ;) ह. घ्या.

In reply to by परिकथेतील राजकुमार

गुगलून झाले तरी पण आपल्या बँकेची मोबाईल बँकिंग सर्विस कितपत चांगली आहे . सुरक्षिततेसाठी काय काय सुविधा ते देतात ते पहा. आपला चिपळूणकर

मोबाईल बँकिंग बद्दल मी फेसबुक वर दोन ग्रुप मध्ये विचारले होते . तसेच माझ्या काही मित्रांना हि लिहिले होते . त्या पैकी एक मित्र ने एक पीडीएफ फाईल पाठवली आहे . ती आताच मिळाली . समजायला जरा क्लिष्ट वाटत आहे पण मिसळपाव वरील "तज्ञा" ना ती जड जाणार नाही अशी खात्री आहे . . कारण मला समजायला जड जात आहे . तरी तज्ञ त्या वर प्रकाश टाकतील अशी आशा आहे -सोबत धागा दिला आहे --- https://mail-attachment.googleusercontent.com/attachment?ui=2&ik=de1326…

In reply to by अजितजी

प्रकाश टाकण्या वरुन आठवल मिपा वर दोनच समुह आहे एक म्हणजे दिवे लावणारे आणि दुसरे दिवे मालवणारे :) तुम्ही इतकी गंभीर सामाजिक आणि वैश्विक समस्या मांडली आहे तर सध्या जागा सविस्तर उत्तरा साठी राखून ठेवतो.

बँकेचे व्यवहार मोबाईलवरून करायला लागावेत अशी परिस्थिती कधीही नसते.