व्वा! क्या बात!
आत्ताच "हमे तो लूट लिया मिलके हुस्नवालोंने" हे http://www.youtube.com/watch?v=wWN5GVOS1JY इथे पूर्ण ऐकलं.
मूळचा मी राहणारा औरंगाबादचा. जुनं औरंगाबाद म्हणजे धाकटं हैद्राबादच म्हणता येइल. निजामाची मराठवाडा प्रांताची राजधानी. नवीन औरंगाबाद मध्ये राहिलो तरी तिथली ती खास मोगलाइ ष्टाइल, नवाबी कारभार ह्याचं थोडं थोडं दर्शनही झालच; .
पण ती तिथली खास अशी वाटणारी मुसलमानी भाषा, त्या त्यांच्या टपर्यांवर लागलेल्या वेगवेगळ्या कव्वाल्या....
पुण्यात पोटापाण्यासाठी आल्यापासून कसं चुकल्या चुकल्यासारखं वाटायचं. तिथं रमजानचा भोंगा कधी कधी भल्या पहाटे त्रस्त करतोय असं वाटायचं. पण कधी कधी त्यातल्या लोकांना रमजानच्या "सेहरा"साठी का कशासाठीतरी उठवायला लागलेली काही गाणी, कव्वाल्या, घोषणा ह्याही आवडायच्या.
विशेषतः एखाद्या कव्वालीत सामान्य माणसाच्या मनातले भाव , त्याचे प्रकट केलेले राग्-लोभ मनाला भावतात.
कधी कधी अस्सल उर्दु गझल किंवा कव्वाली उर्दुशी फारसा परिचय नसल्यानं पूर्ण समजली नाही तरी काहितरी आवडतच. "लाहोल मिलाकुवत" किंवा "क्या ब्बाsssत" हे तोंडातून निघुन जातच जातं.
आता वरती दिलेला दुवाच बघा की. सगळ्या लावण्यवतींबद्दल असलेली तक्रार अगदि सुरेल मांडलीए.
गोड दिसणार्या पण दुष्ट, क्रूर( ,पाशवी) आणि नजरेने कत्ल करणार्या रूपगर्वितांबद्दलची तक्रार ह्याहून अचूक ती काय मांडणार?
अगदि साधी पेटी-तबला-डफ अशी वाद्ये वापरलेली दिसताहेत. पण शब्दरचनेसाठी अगदि अचूक ठेका, अचूक चाल!
आपण तर बुवा गाण्यावर फिदा झालोय. बस्स इतकच सांगायचं होतं. आवर्जून ऐका असं सुचवायचं होतं, म्हणून इथे धागा टाकतोय. संगीतातल्या जाणकारांनी भर घातल्यास उत्तम.
Please don't miss this. This is an all time great piece of music.
दुवा पुन्हा देतोयः-http://www.youtube.com/watch?v=wWN5GVOS1JY
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आवडते
धन्यवाद
हो.
कव्वाली साठीचे बहुगुणी यांचे
मस्त मालिका होती.
लो करलो बात.
: )
मराठवाड्या बद्दल अजुन लिहा,
पाकिस्तान म्हणन्यावर आक्षेप आहे काय ?
हम्म्म
सॉरी सर, आपल्याला विसरुन गेलो
आणखी एक
+१
ही कव्वाली
मस्त लिहिलंय रे, अजुन थोडं
छान
+१
क्या बात..
शूटींग ची सोय करा ..ठार मेलो
'काले काले गालोंने, गोरे गोरे
कव्वाली छान आहे! पण तुम्ही